खोबरेलतेलाचे हे २० उपयोग तुम्हाला माहित आहेत का?

नारळाचे झाड हे पृथ्वीवरील कल्पवृक्ष मानले गेले आहे. नारळाच्या झाडाची प्रत्येक गोष्ट उपयुक्त आहे.

तर अशा ह्या बहुगुणी असणाऱ्या नारळापासून काढलेले तेल देखील उपयुक्त असणारच. आज आपण नारळाच्या तेलाचे गुणधर्म जाणून घेणार आहोत.

संपूर्ण भारतात विविध कारणांनी नारळाचे तेल लोकप्रिय आहे. ते खाद्यतेल म्हणून वापरले जाते, सहजपणे उपलब्ध होते आणि त्याचे अनेकानेक उपयोग आहेत.

नारळाच्या तेलाचे उपयोग खालीलप्रमाणे

१. UV किरणांपासून त्वचेचे संरक्षण होते

नारळाचे तेल लावले असता आपल्या त्वचेचे सूर्याच्या अल्ट्रा वॉयलेट किरणांपासून काही प्रमाणात संरक्षण होते. त्यामुळे त्वचेच्या कॅन्सरचा धोका कमी होतो. तसेच नारळाच्या तेलामुळे त्वचेवरील सुरकुत्या आणि डाग कमी होतात.

२. चयापचय (मेटॅबॉलीजम) वाढतो

रोजच्या स्वैपाकात नारळाच्या तेलाचा वापर करणे गुणकारी आहे. नारळाच्या तेलात ट्रायग्लिसेराईडस असतात ज्यामुळे पचनाचा तसेच शरीरातील कॅलरीज बर्न होण्याचा वेग वाढतो. म्हणजेच चयापचय होण्याचा वेग वाढतो.त्यामुळे वजन कमी होण्यास देखील मदत होते.

३. जास्त तापमानाला देखील सुरक्षित वापर करता येतो

इतर तेले स्वैपाक करताना जास्त प्रमाणात तापली की त्यांचे टॉक्सिक कंपाऊंडस् मध्ये रूपांतर होते. ते शरीराला हानिकारक असते. विशेषतः एखादा पदार्थ तळताना ही गोष्ट लक्षात येते. त्या तुलनेत नारळाचे तेल खूप तापले तरीही त्यातील सॅच्युरेटेड फॅटस् तसेच राहतात. त्यामुळे स्वैपाक करण्यासाठी विशेषतः तळण्यासाठी नारळाचे तेल हा उत्तम पर्याय आहे.

४. दातांचे आरोग्य वाढते

तोंडातील बॅक्टीरिया ज्यांच्यामुळे दात किडणे, त्यांच्यावर प्लाक निर्माण होणे आणि हिरड्या खराब होणे असे आजार होतात त्या बॅक्टीरियांना नष्ट करणे नारळाच्या तेलामुळे शक्य आहे. नारळाच्या तेलाचा गंडूश घेतला असता तोंडातील बॅक्टीरिया नष्ट होतात. गंडूश ही एक आयुर्वेदिक प्रक्रिया आहे. हयात रिकाम्या पोटी १० मिनिटे तेल तोंडात धरून ठेवायचे असते. दररोज ही क्रिया करणे फार उपयुक्त आहे.

५. त्वचारोगावर गुणकारी

एक्झेमा सारख्या त्वचारोगांवर नारळाचे तेल अतिशय उपयोगी आहे. विशेषतः लहान मुलांना त्वचारोगावर नारळाचे तेल उत्तम उपयोगी पडताना दिसते. तसेच नारळाचे तेल हे त्वचेसाठी उत्तम मॉईश्चरायजर म्हणून काम करते. टाचांच्या भेगांवर देखील ते उपयोगी आहे.

६. मेंदूचे कार्य सुधारते

नारळाचे तेल नियमित सेवन केले असता त्याच्या पचनामुळे शरीरातील कीटॉन्स मध्ये वाढ होते ज्यामुळे मेंदूला जास्त चालना मिळून त्याचे कार्य सुधारते. अल्झायमर आणि एपिलेप्सी सारख्या आजारांवर नारळाचे तेल विशेष उपयोगी आहे.

७. इन्फेक्शन कमी करण्यास मदत करते

वर्जिन कोकोनट ऑइल मध्ये अॅंटीबॅक्टीरियल गुणधर्म असतात, त्यामुळे इन्फेक्शन कमी होण्यास मदत होते. आतडयात असणाऱ्या बॅक्टीरियावर देखील नारळाचे तेल औषधी आहे. त्यामुळे जुलाब कमी होतात. अर्थात हा उपाय औषधांच्या बरोबरीने पूरक म्हणून करण्याचा आहे.

८. शरीरातील चांगले कोलेस्ट्रॉल वाढते

इतर तेलांच्या तुलनेत नारळाच्या तेलामुळे शरीरातील चांगले कोलेस्ट्रॉल (एचडीएल) वाढते. ह्याचा उपयोग स्थूलपणा कमी होण्यासाठी होतो. नारळाचे तेल आहारात असल्याने पोटाभोवतीची चरबी कमी होण्यास मदत होते.

९. केसांना अत्यंत गुणकारी

केसांना नारळाचे तेल लावणे हा आपल्याकडे पिढ्यानपिढ्या केला जाणारा उपाय आहे. नारळाचे तेल केसांसाठी अत्यंत गुणकारी आहे. केसांना कमी पडणारे प्रोटीन नारळाच्या तेलातून मिळते तसेच केस मऊ होण्यासाठी मदत होते.

१०. जखम भरून येण्यास मदत होते

पूर्वापार आपल्याकडे लहान मुलांना खरचटले किंवा लागले की आई, आजी तेलाचे बोट लावून देतात आणि मुलांना बरे देखील वाटते. ह्याचे कारण हेच की नारळाच्या तेलात त्वचेतील कोलाजेन वाढवून जखम भरून आणण्याची शक्ति असते. त्यामुळे त्वचेची आग होणे थांबते आणि जखम लवकर भरून येते.

११. हाडे मजबूत बनतात

एका सर्वेमध्ये असे आढळून आले आहे की जे लोक रोजच्या आहारात नारळाच्या तेलाचा वापर करतात त्यांची हाडे तुलनेने मजबूत आहेत. नारळाच्या तेलामुळे आपले बोन स्ट्रक्चर सुधारण्यास मदत होते. तसेच संधिवात कमी होण्यास देखील मदत होते.

१२. लिव्हरचे आरोग्य सुधारते

अल्कोहोल किंवा टॉक्सिनस् मुळे लिव्हरवर होणारा परिणाम कमी करण्यास नारळाच्या तेलाच्या नियमित सेवनामुळे मदत होते.

१३. हेल्दी मेयोनीज बनवता येते

सध्या लहान मुलांचा अगदी आवडता पदार्थ म्हणजे मेयोनीज. पण बाजारातून आणलेल्या मेयोनीज मध्ये खूप साखर आणि सोयाबीन ऑइल असते जे आरोग्याच्या दृष्टीने चांगले नाही. नारळाचे तेल वापरून आपण घरच्या घरी उत्तम प्रतीचे मेयोनीज बनवू शकतो.

१४. डार्क चॉकलेट बनवता येते

नारळाच्या तेलापासून तयार केलेले डार्क चॉकलेट हा एनर्जिचा एक उत्तम स्त्रोत आहे. डार्क चॉकलेट हे स्ट्रेस आणि डिप्रेशनवर गुणकारी आहे.

१५. कॉस्मेटिक म्हणून वापरता येते

नारळाचे तेल हे कॉस्मेटिक म्हणून वापरले जाते. डोळ्यांचा मेकअप काढताना त्याचा उपयोग होतो. तसेच ओठांना लावण्यासाठी लिप बाम म्हणून उपयोग होतो.

१६. भूक कमी करते

रोजच्या आहारात नारळाच्या तेलाचा वापर केला असता सतत खा खा सुटणे कमी होते. पोट भरलेले असण्याची भावना होते. ह्याचा वजन कमी करण्यासाठी खूप उपयोग होतो.

१७. फर्निचरला चकाकी येते

नारळाच्या तेलाचा हलका हात लाकडी फर्निचरवरुन फिरवला की फर्निचरला अगदी चमक येते. अनेक वर्षे फर्निचर नव्यासारखे चमकते.

१८. डास मारण्यासाठी उपयुक्त

इतर काही तेलांबरोबर मिसळून नारळाचे तेल खोलीत ठेवले असता डास आणि इतर कीटक त्या वासाने निघून जातात. इतर केमिकलयुक्त औषधांपेक्षा हा नॅच्युरल उपाय चांगला आहे.

१९. डाग घालवण्यासाठी उपयोगी

कार्पेट किंवा फर्निचरला पडलेले डाग घालवण्यासाठी नारळाच्या तेलाचा उपयोग होतो. नारळाचे तेल आणि बेकिंग सोडा ह्याची पेस्ट डागांवर लावली की असे डाग निघून जाण्यास मदत होते.

२०. नैसर्गिक डीओडरंट

नारळाच्या तेलापासून नैसर्गिक डीओडरंट बनवता येऊ शकतो. इतर केमिकलयुक्त डीओडरंट वापरण्यापेक्षा हा नैसर्गिक डीओडरंट केव्हाही चांगला.

तर हे आहेत नारळाच्या तेलाचे आपल्याला माहीत नसलेले गुणधर्म. नारळाचे तेल अत्यंत गुणकारी आहे हेच ह्यावरून दिसून येते. त्यामुळे नारळाच्या तेलाचा रोजच्या आहारात जरूर वापर करा आणि त्याच्या ह्या गुणधर्मांचा फायदा घ्या.

ओल्या नारळापासून खोबरेल तेल बनवण्याची घरगुती पद्धत जाणूनघेण्यासाठी येथे क्लिक करा

मनाचे श्लोक

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय