अंड्याबरोबर हे पदार्थ मुळीच खाऊ नका, होऊ शकते एलर्जि

अंड्याबरोबर हे पदार्थ मुळीच खाऊ नका होऊ शकते एलर्जि चुकूनही अंड्याबरोबर 'हे' पदार्थ खाऊ नका

अंड्याबरोबर हे पदार्थ मुळीच खाऊ नका. होऊ शकते एलर्जि

अंडे हे एक सुपर फूड मानले जाते. दररोज एक अंडे खाणे हे तब्येतीला अतिशय चांगले आहे.

अंडे अतिशय पौष्टिक आहे हे आता सर्वांनीच मान्य केले आहे. अनेक आहारशास्त्र तज्ञ दररोज अंडे खाण्याचा सल्ला देतात.

त्याचे प्रमुख कारण हे की अंड्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन, विटामीन आणि मिनरल्स असतात. तसेच त्यामध्ये कार्बोहायड्रेट्स अगदी कमी प्रमाणात असतात.

त्यामुळे दररोज एक अंडे खाणे हे तुमचे वजन वाढू न देता उत्तम पोषण देते. अतिशय हेल्दी असते.

परंतु हे गुणकारी असणारे अंडे चुकीच्या पद्धतीने खाल्ले असता मात्र अतिशय नुकसान करू शकते.

अनेकदा आपल्या नकळत आपण एकावेळी असे दोन पदार्थ खातो जे एकत्र खाणे चुकीचे आहे. त्यामुळे तब्येतीवर परिणाम होऊ शकतो. आयुर्वेदात देखील अशा पद्धतीचे खाणे निषिद्ध मानले गेले आहे.

निषिद्ध आहारामुळे पचनशक्तीवर परिणाम होतो. तसेच अशक्तपणा, थकवा आणि उलट्या जुलाब देखील होऊ शकतात. म्हणून चुकीच्या कॉम्बिनेशनचे पदार्थ खाणे योग्य नाही.

ह्याच प्रकारे अंडे देखील चुकीच्या पदार्थांबरोबर खाल्ले असता एलर्जिचा त्रास होऊ शकतो. एरवी गुणकारी असणारे अंडे त्यामुळे आपल्या शरीरासाठी टॉक्सिक होऊ शकते. ह्याचा आपल्या प्रकृतीवर वाईट परिणाम होऊ शकतो.

चला तर मग, आपण जाणून घेऊया की कोणत्या पदार्थांबरोबर अंडे खाणे योग्य नाही.

१. साखर 

अंड्याबरोबर कधीही कोणत्याही स्वरूपात साखर खाऊ नये. त्याचे शरीरावर गंभीर परिणाम होऊ शकतात. साखर आणि अंडे ह्या दोन्हीमध्ये अमायनो ऍसिड असते. ह्या दोन्ही गोष्टी एकत्र खाल्ल्या तर शरीरात जास्त प्रमाणात अमायनो अॅसिड जाते जे टॉक्सिक असते आणि त्यापासून रक्तात गुठळी होण्यासारखा गंभीर आजार देखील होऊ शकतो.

२. सोया मिल्क 

सोया मिल्क मध्ये सोया प्रोटीन असते जे अंड्यापासून मिळणाऱ्या प्रोटीनपेक्षा प्रकृतीने वेगळे असते. त्यामुळे जर सोया मिल्क आणि अंडे एकाचवेळी सेवन केले तर हे प्रोटीन शरीरात शोषले जाणे अवघड होते. त्याचा प्रकृतीला त्रास होऊ शकतो.

३. चहा 

बरेच वेळा लोक सकाळी चहा घेतला की लगेच अंडे खाऊन नाश्ता करून घेतात.सकाळी अंडे खाणे तर चांगले आहे परंतु चहावर लगेच अंडे खाणे प्रकृतीच्या दृष्टीने अतिशय हानिकारक आहे. चहा पाठोपाठ खाल्लेले अंडे हे टॉक्सिक बनते आणि ते टॉक्सीन्स शरीरात पसरतात. त्यामुळे पचनशक्तीवर परिणाम होऊन कॉन्स्टिपेशन होऊ शकते.

४. अंडे आणि इतर मांसाहारी पदार्थ 

मांसाहारी लोक बरेचदा दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणात अंडे आणि इतर मांसाहारी पदार्थ बरोबर खातात. परंतु असे दोन्ही पदार्थ एकावेळी खाणे योग्य नाही. जरी त्यामुळे थेट काही अपाय होत नसला तरी अंड्यात तसेच इतर मांसाहारी पदार्थांमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आणि फॅटस् असल्यामुळे ते एकावेळी खाल्ले की शरीरात जडपणा जाणवणे, पचनशक्ती अतिशय कमी होणे, सुस्ती येणे आणि अग्निमांद्य म्हणजेच भूक न लागणे अशी लक्षणे दिसून येतात.

तर हे आहेत असे ४ पदार्थ जे अंड्याबरोबर मुळीच खाऊ नयेत. त्यामुळे अंडे खाण्याचा काही उपयोग तर होत नाहीच शिवाय प्रकृतीला अपाय होतो. आजारी पडण्याची वेळ येऊ शकते.

तर मित्रांनो, पौष्टिक असणारे अंडे दररोज जरूर खा पण योग्य ती काळजी घेऊन.

मनाचे श्लोक

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.