सकाळी अशा पद्धतीने तुळशीचे पाणी प्या आणि अनेक रोगांना दूर ठेवा

सकाळी अशा पद्धतीने तुळशीचे पाणी प्या आणि अनेक रोगांना दूर ठेवा tulshicha upyog ksa krava

पूर्वापार आपल्याकडे तुळशीची पाने अतिशय आरोग्यदायी आणि उपयुक्त आहेत असे सांगितले जाते.

आपल्याकडे आजीबाईंच्या बटव्यातील उपायांमध्ये सर्दी खोकला झाला की तुळशीचा काढा असतोच.

असे आजार तर तुळशीमुळे बरे होतातच शिवाय प्रतिकारशक्ती देखील वाढते.

आयुर्वेदात तुळशीचा उपयोग प्राचीन काळापासून होत आला आहे. तसेच आपल्याकडे धार्मिक कार्यासाठी देखील तुळस अतिशय आवश्यक असते.

अशी ही बहु गुणकारी तुळस. ही आपल्याला अनेक प्रकारे लाभदायक आहे. आज आपण तुळशीचे उपयोग आणि त्यामुळे दूर होणाऱ्या आजारांबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत.

तुळशीची पाने गुणकारी आहेतच परंतु, जर ती पाने पाण्यात उकळून मग त्या पाण्याचे उपाशीपोटी सेवन केले तर तुळशीचे गुणधर्म कैक पटीने वाढतात.

सकाळी उठून गरम चहा किंवा कॉफी पिण्याआधी जर असे तुळशीची पाने घालून उकळलेले पाणी प्यायले तर त्याचा उत्तम आरोग्यासाठी खूप लाभ होतो.

तुळशीच्या पानांचे पाणी कसे तयार करावे?

एका पातेल्यात ग्लासभर पाणी घेऊन ते उकळू द्यावे. पाणी उकळू लागले की त्यात मूठभर तुळशीची पाने घालावीत आणि ते पाणी निम्मे म्हणजेच अर्धा ग्लास होईपर्यंत उकळू द्यावे. त्यानंतर ते पाणी गाळून त्यात एक चमचा मध घालून त्या पाण्याचे सेवन करावे.

असे पाणी सकाळी उपाशीपोटी प्यायल्याने शरीराचे आरोग्य सुधारण्यास मदत होते आणि अनेक रोगांपासून सुरक्षा मिळते.

असे तुळशीचे पाणी कोणकोणत्या आजारांवर उपयोगी आहे ते पाहूया.

१. रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करते.

सध्या भारत हे मधुमेहाचे केंद्र बनले आहे. परंतु त्यावर हा साधासा उपाय उपलब्ध आहे. तुळशीची पाने घालून उकळलेले पाणी प्यायल्यामुळे शरीराचा मेटाबॉलीजम (चयापचय) रेट वाढतो. त्यामुळे अन्नाचे पचन सुधारते. कार्बोहायड्रेट्स आणि फॅटस् चे पचन अधिक चांगल्या प्रकारे होते. त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते. ह्या गुणधर्मामुळेच मधुमेहाच्या रुग्णांना असे पाणी सकाळी नियमित पिण्याचा सल्ला दिला जातो.

२. स्ट्रेस कमी करते.

सध्याच्या धकाधकीच्या जमान्यात स्ट्रेसशी न झगडणारी व्यक्ती सापडणे मुश्किल आहे. स्ट्रेस वाढत जाऊन पुढे त्याचे रूपांतर अनेक गंभीर आजारांमध्ये होऊ शकते. परंतु तुळशीच्या पानांमध्ये असलेल्या तत्वांमुळे आपल्या शरीरातील कोर्टीसोल नावाचे हॉर्मोन जे स्ट्रेस वाढण्याचे प्रमुख कारण असते त्याची पातळी संतुलित राहते. त्यामुळे स्ट्रेस कमी होण्यास मदत होते. म्हणून खूप स्ट्रेस मध्ये असणाऱ्या लोकांना असे तुळशीची पाने घालून उकळलेले पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो.

३. वजन कमी करण्यास मदत करते.

आजकाल प्रत्येक घरातील किमान एक तरी व्यक्ती स्थूलपणामुळे त्रासलेली दिसते. अतिरिक्त वजन हे आरोग्यासाठी नेहेमीच घातक असते. परंतु वजन कमी करणे ही मात्र मोठी समस्या होऊन बसते. ह्यावर देखील तुळशीची पाने आपल्या मदतीला येतात. तुळशीची पाने घालून उकळलेले पाणी वजन कमी करण्यासाठी खूप उपयोगी ठरते.

४. पचनशक्ती वाढवते.

तुळशीच्या पानांच्या नियमित सेवनाने पचनशक्ती वाढते. त्यामुळे बद्धकोष्ठ, गॅसेस सारखे आजार बरे होतात. तसेच शरीरातील टॉक्सिक पदार्थ बाहेर काढून टाकण्यास मदत होते. असे टॉक्सीन्स बाहेर टाकले गेल्यामुळे अनेक गंभीर आजारांपासून सुरक्षा मिळते.

५. श्वसनाच्या विकारांवर गुणकारी.

तुळशीच्या पानांमुळे आपला श्वसनमार्ग मोकळा राहण्यास मदत होते. तुळशीच्या पानांमध्ये असणारी इम्यूनोमॉडयूलेटरी प्रॉपर्टी श्वासनलिका तसेच सायनसचे ट्रीगर पॉईंट्स ह्यांचे आरोग्य राखण्यास मदत करते. त्यामुळे श्वसनासंबंधीचे विकार बरे होण्यास मदत होते. म्हणूनच सर्दी, खोकला इत्यादीवर हे तुळशीची पाने घालून उकळलेले पाणी पिणे विशेष गुणकारी आहे.

तर हे आहेत सकाळी रिकाम्यापोटी तुळशीची पाने घालून उकळलेले पाणी पिण्याचे फायदे.

इतक्या साध्या आणि सहज करण्याजोग्या उपायाने आपण कितीतरी आजारांपासून आपला बचाव करू शकतो.

चला तर मग मित्रांनो, आपण आपल्या घरात एक तुळशीचे रोप लावूया आणि हा साधासा उपाय रोज करून निरोगी राहुया.

मनाचे श्लोक

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!