आता आर. टी. ओ. मध्ये जाऊन टेस्ट न देताच मिळू शकेल ड्रायविंग लायसन्स

आता आर टी ओ मध्ये जाऊन टेस्ट न देताच मिळू शकेल ड्रायविंग लायसन्स Driving license without test

कसे ते जाणून घ्या ह्या लेखात.

भारतात रस्त्यावर होणाऱ्या अपघातांचे प्रमाण खूप जास्त आहे. जास्त प्रमाणात होणाऱ्या रोड ऍक्सिडण्ट्स मुळे भारत हा जगभरात एक असुरक्षित देश म्हणून ओळखला जातो.

आता भारत सरकारच्या केंद्रीय रस्ते वाहतूक आणि राजमार्ग मंत्रालयाने भारताची ही प्रतिमा बदलण्याचे ठरवले आहे.

रस्त्यावरील वाहतूक अधिक सुरक्षित करण्यासाठी काही नवीन नियम आणले जात आहेत.

ह्या नियमांमध्ये ड्रायविंग टेस्ट न देताच ड्रायविंग लायसन्स driving license मिळू शकेल असा एक नियम देखील आहे. ह्या नियमानुसार आता पूर्वीप्रमाणे आर टी ओ मध्ये जाऊन ड्रायविंग टेस्ट देऊन ड्रायविंग लायसन्स मिळवण्याची गरज नाही.

परंतु ह्याचा अर्थ असा नाही की आता कोणीही लायसन्स शिवाय रस्त्यावर गाडी चालवू शकतो.

त्याउलट सरकारने आता प्रत्येकाला ड्रायविंग ट्रेनिंग सेंटर वर जाऊन गाडी चालवण्याचे प्रशिक्षण घेणे सक्तीचे केले आहे.

शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेऊनच नागरिकांनी गाडी चालवली की आपोआपच ते अधिक सुरक्षितपणे गाडी चालवतील आणि रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण कमी होईल.

मात्र घेतलेले प्रशिक्षण हे सरकारमान्य केंद्रातून घेतलेले असणे आवश्यक आहे. असे प्रशिक्षण पूर्ण केले की त्या नागरिकास तसे सर्टिफिकेट मिळेल जे त्याचे ड्रायविंग लायसन्स आहे असे समजले जाईल.

ह्याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया.

रस्ते अपघातात होणाऱ्या मृत्युंमध्ये भारत पहिल्या क्रमांकावर Road Accidents in India

संपूर्ण भारतात मिळून दर तासाला जवळजवळ ५३ रोड ऍक्सिडण्ट्स होत असतात आणि त्यात दर ४ मिनिटाला एक मृत्यू होतो. हे आकडे जागतिक स्तरावर होणाऱ्या सर्व्हेमधील आहेत. खरे तर भारतात जगभरच्या तुलनेत फक्त १% वाहने आहेत परंतु तरीही आपण रस्त्यावरील अपघातांच्या बाबतीत पहिल्या नंबरवर आहोत. ही फारच चिंताजनक गोष्ट आहे.

भारताशिवाय दक्षिण आफ्रिका हादेखील असाच ड्रायविंगच्या दृष्टीने असुरक्षित देश आहे. एकूण ५६ देशांच्या केलेल्या अभ्यासात हे स्पष्ट झाले आहे. दक्षिण आफ्रिकेत रस्त्यावरील अपघातात मरणाऱ्यांचे प्रमाण ५६% इतके आहे.

नॉर्वे हा देश मात्र ड्रायविंगच्या दृष्टीने सर्वात सुरक्षित देश आढळून आला आहे. असे दिसून आले आहे की तेथील ९५% वाहनचालक प्रशिक्षित असून सीटबेल्ट लावल्याशिवाय गाडी चालवत नाहीत.

ह्यावरुन ह्या अभ्यासात असे निदर्शनास आले आहे की प्रशिक्षित ड्रायवर्स नसल्यामुळे रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण वाढते. लोक स्वतःच गाडी चालवायला शिकून लायसन्स मिळवतात परंतु त्यांच्याकडे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण नसल्यामुळे आणीबाणीच्या परिस्थितीत गाडी चालवताना काय निर्णय घ्यावे हे त्यांना ठरवता येत नाही आणि अपघात होतात.

ह्या परिस्थितीवर मात करण्यासाठीच भारत सरकारच्या केंद्रीय रस्ते वाहतूक आणि राजमार्ग मंत्रालयाने हा नवीन नियम आणला आहे. ह्या नियमामुळे लोकांना ड्रायविंग स्कूलमध्ये जाऊन प्रशिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन मिळेल.

कसे असेल ड्रायविंग स्कूलचे काम?

सरकारने नियुक्त केलेली मान्यताप्राप्त ड्रायविंग स्कूल्स आता नागरिकांना असे प्रशिक्षण देतील. हयात थियरीबरोबरच प्रॅक्टिकल देखील असेल. ड्रायविंग स्कूलमध्येच प्रत्यक्ष गाडी चालवण्याचा अनुभव उमेदवारास देण्यात येईल. त्याशिवाय आणीबाणीच्या किंवा अपघात सदृश परिस्थितीमध्ये गाडीवरचा कंट्रोल सुटू न देता परिस्थिति कशी नियंत्रणात आणावी हे देखील नीट शिकवले जाईल.

ह्या ड्रायविंग सेंटरमधून अजिबात गाडी न चालवू शकणारे लोक सुद्धा प्रशिक्षण घेऊ शकतात आणि ज्यांना गाडी चालवता येते परंतु आता प्रॅक्टिस राहिली नाही किंवा गर्दीत जाण्याची भीती वाटते असे लोक देखील प्रशिक्षण घेऊ शकतात. मोठ्या शहरात अचानक गाडी चालवण्याआधी ड्राइवर्सना अशा प्रशिक्षणाची गरज भासू शकते.

सर्टिफिकेट कसे मिळेल?

हे वाचून आपला असा समज होऊ शकतो की एकदा का ड्रायविंग सेंटरमध्ये ऍडमिशन घेतली की आपले लायसन्स पक्के.

परंतु तसे नाही. रस्त्यावर गाडी चालवण्याचे सर्टिफिकेट ड्रायविंग स्कूलकडून मिळण्याआधी

उमेदवाराला प्रशिक्षणाचे खालील सर्व टप्पे पार करावे लागतील.

१. थियरी

गाडी चालवण्यासंदर्भात सर्व थियरीचा अभ्यास करावा लागेल. तसेच रस्त्यावरील वाहतुकीचे सर्व नियम पाठ करावे लागतील. रस्त्यावर असणारे सर्व साईन बोर्ड्स ओळखता येणे आवश्यक आहे.

२. प्रॅक्टिकल

ड्रायविंग स्कूलमध्ये असणाऱ्या ड्रायविंग ट्रॅकवर व्यवस्थितपणे गाडी चालवता यायला हवी. कोणत्याही परिस्थितीत गाडीवरील कंट्रोल सुटू न देता ड्रायविंग करता यायला हवे.

३. परीक्षा

सर्व अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर ड्रायविंग सेंटरकडून एक परीक्षा घेतली जाईल. ही परीक्षा पास झाल्यावरच सर्टिफिकेट मिळेल.

हे सर्टिफिकेट ड्रायविंग लायसन्ससारखे वापरता येईल.

कधीपासून लागू होणार हा नियम?

हा नियम ह्या वर्षी जुलै महिन्यापासून लागू होणार आहे. त्यासाठी उत्तम प्रशिक्षण देऊ शकणारी सेंटर्स शोधण्याचे काम सध्या चालू आहे. ही सेंटर्स निवडताना उत्तम ट्रेनर्स, चांगला ड्रायविंग ट्रॅक, बायोमेट्रिक सुविधा इत्यादी गोष्टी ज्यांच्याकडे असतील त्यांचीच निवड केली जाणार आहे.

असे सेंटर शिकाऊ उमेदवारांना उत्तम प्रशिक्षण देऊन चांगले ड्रायवर्स बनवतील आणि आपल्या देशातील अपघातांचे प्रमाण नक्कीच कमी होईल.

मनाचे श्लोक

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय