एका सिनेमाचा मृत्यू : आलमआरा

मला माहित आहे शिर्षक गोधळात टाकणारे आहे. सिनेमा कधी मरतो का? तो तर कायम जतन केलेला असतो मग मरणार कसा? पण हे खरंय. आम्हा भारतीयांचा हा कदाचित एक (अव)गुण विशेष असावा. आम्ही अनेक गोष्टी जतन करून ठेवण्याच्या बाबतीत आळशीचं आहोत. पण नको त्या बाद झालेल्या अनेक प्रथा व परंपंरा मात्र जीवा पलिकडे जपतो. असो…. खरं तर या सिनेमाने भारतीय चित्रपटसृष्टीत अनेक पायंडे पाडले. सिनेमा या कलेला सुरूवातीच्या काळात मूकपट असे म्हटले जाई कारण त्यातील पात्रे फक्त कायीक अभिनयाने आपले म्हणणे प्रेक्षकां पर्यंत पोहचवित असत. अभिनेत्यासाठी हे खूपच अवघड काम होते कारण आम्हाला शब्दांची खूप सवय झालेली त्यामुळे शब्दांशिवाय आपले म्हणणे प्रेक्षकांपर्यंत पोहचवायचे तसे अवघडच काम होते. हे काहीसे नृत्य कलेसारखे होते. नृत्यातले भाव विविध शारीरीक हालचाली व भावमुद्रांद्वारे सादर केले जातात. मात्र यात अनेकदा पार्श्वभागी गायन आणि वादन असल्यामुळे त्यातील अर्थ समजणे सोपे जाते. चित्रपटात मात्र हे अवघडच होते आणि यात चॅर्ली चॅपलिन इतके नैप्युण्य कुणाला मिळवता आले नाही असे व्यक्तीश: मला वाटते. चॅर्ली चॅप्लीन या अभिनेत्याच्या भावस्पर्शी बोलक्या डोळ्यात अवघ्या जगातील करूणा एकत्र आल्याचा भास होतो.

raja-harishchandraभारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात दोन तारखानां विशेष महत्व आहे. ३ मे १९१३ आणि १४ मार्च १९३१ या त्या दोन तारखा. यातील पहिली तारीख म्हणजे ३ मे १९१३ ही भारतातील चित्रपटसृष्टीची मूहुर्तमेढ होती कारण या दिवशी “राजा हरीश्चंद्र” हा पहिला पूर्ण लांबीचा भारतीय चित्रपट प्रदर्शीत झाला. ज्याची आठवण आजही दादासाहेब फाळके यांच्या रूपाने जोपासली आहे. मात्र जी दुसरी तारीख १४ मार्च १९३१ ती मात्र आमच्या विस्मृतीत गडप झाली आहे. कदाचित लहानपणा पासून इतिहासातील सनावळ्या पाठ करण्याच्या धसक्यामुळे आम्ही इतिहासाकडे दुर्लक्ष करतो. तारखेपेक्षा घटना या अधिक महत्वाच्या. घटनेत अनेक सामाजिक, ऐतिहासिक,सांस्कृतिक मूल्यें दडलेली असतात जी मानवी संस्कृतीला प्रवाहित करत असतात. तर १४ मार्च १९३१ या दिवशी भारताच्या चित्रपटाने बोलायला सुरूवात केली होती. ‘’आलमआरा’’हा भारताचा पहिला बोलपट प्रदर्शीत झाला होता. वैज्ञानिक शोधाने चित्रपटाला अधिक समृद्ध केले. कारण या बोलणाऱ्या चित्रपटाने सर्व समाजावर प्रचंड प्रभाव टाकला. चित्रपट संगीताची एक भली मोठी जादूई गूहा उघडली गेली.

Old Hindi Filmचित्रपट “टॉकी” झाले आणि चित्रपटगृहाचे “टॉकीज” झाले. गमंत म्हणजे मला लहानपणी पाण्याच्या टाकी सारखी सिनेमाची टाकी असावी असेच वाटत असे. १९३१ नंतर चित्रपटाचा बोलपट झाला. आज आम्हाला काही विशेष वाटत नसेल पण त्या काळातील हे एक नवलं होतं. कारण पडद्यावरचे कलावंत थेट बोलू लागले. नुसतेच बोलू लागले नाही तर चक्क गाऊ पण लागले. तंत्रज्ञानाचे हे एक गारूड होते.या चित्रपटाचे पारशी निर्माते दिग्दर्शक अर्देशीर इराणी यांनी भारतीय चित्रपट बोलता केला. मुंबईतल्या गिरगाव मधील “मॅजेस्टीक” चित्रपटगृहात हा जेव्हा प्रदर्शीत झाला तेव्हा प्रेक्षकांची गर्दी इतकी अनावर झाली की लाठीचार्ज करावा लागला. चार आण्याचे तिकीट चक्क ५ रूपये ब्लॅकने विकले गेले. आज कदाचित हे सिनेमागृह तिथे नसेल. एखादा भव्य व्यावसायिक मॉल किंवा व्यावसायिक कार्पोरेट कंपनीची शिस्तबद्ध वर्दळ तिथे असेल मात्र त्यादिवशी ही दगडी इमारत नक्कीच जीवंत झाली असेल जेव्हा येथे पहिला बोलपट प्रदर्शीत झाला. चित्रपटसृष्टीतील अनेक स्टुडिओज सोबत असे अनेक चित्रपटगृहे देखिल इतिहासाच्या पानात सुकलेल्या फुलांसारखे निर्जीव होऊन पडले असतील.

Aalam Aara

एका पारशी नाटकावर बेतलेला हा चित्रपट त्याकाळी अनेक कारणांनी गाजला. एक राजकुमार बाणि एक जिप्सी युवती यांच्या प्रेमकथेवर हा चित्रपट बेतलेला होता. जोसेफ डेव्हीड यांनी पटकथा लिहली तर संवाद मुशी जहीर यांनी लिहले होते. याचे नायक होते मराठी हिंदी चित्रपटातील ही मॅन मा. विठ्ठल (मा.विठ्ठल सुप्रसिद्ध अभिनेते यशवंत दत्त याचे वडील.) व नायिका होती जुबेदा. सोबत पृथ्वीराज कपूर, जिल्लोबाई, सुशीला यांच्याही भूमिका होत्या. मा. विठ्ठल हे अत्यंत सुंदर शरीर सौष्ठव असलेले देखणे अभिनेते होते. मूकपटाचे तर ते ही-मॅन होते. मात्र या बोलपटासाठी त्यानां कोर्टाची पायरी चढावी लागली होती. मा. विठ्ठल अशिक्षित होते त्यामुळे सुरूवातीस त्यानां या चित्रपटातील नायकाची भूमिका देण्यास विरोध झाला. कारण या चित्रपटात त्यानां संवाद बोलयचे होते आणि त्यानां संवाद बोलता येणार नाहीत असे अनेक चित्रपट धुरीणांना वाटत होते.जणूकाही संवाद साधण्याची मक्तेदारी फक्त शिक्षित व्यक्तीकडेच होती. महाराष्ट्रातील सर्वच संत त्या अर्थाने मग अशिक्षित म्हणायला हवे जे ज्ञानाचा जागर आयुष्यभर करत राहिले. गंमत म्हणजे संतानी शब्दबद्ध केलेल्या साहित्यावर याच चित्रपटसृष्टीने अनेकांची पोटे व तिजोरी भरली. पूर्वी अभिनेते महिन्यावर पगारदार असत. जेव्हा मा. विठ्ठलांना भूमिका मिळणार नाही याची जाणीव होऊ लागली त्यांनी कोर्टात दावा ठोकला. यातील एक गमंत म्हणजे त्यांचे वकीलपत्र बॅरीस्टर मंहमद अली जिना यांनी घेतले होते जे त्यावेळचे मुंबईचे प्रसिद्ध बॅरीस्टर होते आणि नतंर पाकिस्तान नावाच्या देशाची निर्मिती त्यांच्यामुळे झाली. अर्थात केस मा. विठ्ठल जिंकले. नंतर स्वत: मा.विठ्ठल यानी संवादावर भरपूर मेहनत घेतल्यामुळे सिनेमा तयार होऊ शकला.

या चित्रपटामुळे दुसरी अत्यंत महत्वाची घटना घडली ती म्हणजे पार्श्व गायनाची सुरूवात याच चित्रपटाने केली. या चित्रपटाचे संगीत फिरोज शहा एम. मिस्त्री व बी. इराणी यानी तयार केले होते. वजीर माहंमद खान या अभिनेत्याने भारतीय चित्रपटसृष्टीतले पहिले पार्श्वगीत गायले. ‘’दे दे खूदा के नाम पर’’ हे या गाण्याचे बोल होते. संगीताची सुरूवातही याच चित्रपटाने केली. यात ७ गाणी होती जी त्याकाळी तबला पेटी या वाद्याद्वारे रेकॉर्ड केली गेली. चित्रपट आणि यातील संगीत तुफान गाजले. ३९० मिलियनचे बजेट असलेल्या या चित्रपटाने २.८९ बिलियनचा व्यवसाय केला. पूर्वीचे मूकपट बहुतांश पौराणिक कथांवर बेतलेले होते. या कथा प्रेक्षकानां आगोदर पासून माहित असल्यामुळे चित्रपट सहज समजुन येत. प्रेक्षक फिचर फिल्म या प्रकाराला सरावले होते. खरे तर याच काळात बंगाल आणि तामिळनाडुत बोलपट तयार झाले होते मात्र सर्वात आगोदर “आलमआरा” प्रदर्शीत झाला. त्याच्या पूढच्याच महिन्यात म्हणजे एप्रिल मध्ये मदन थिएटरचा “जमाई शष्टी” हा बंगाली तर ऑक्टोबर मध्ये “कालीदास” हे तमीळ बोलपट प्रदर्शीत झाला.

वाचण्यासारखे आणखी काही…..

टायटॅनिक….शोकांतिकेची गाथा..(भाग १)
हिंदी सिनेमाची ट्रॅजिडी क्वीन : मीना कुमारी
श्रीदेवी!! कॅमेऱ्या पलीकडची…….

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय