चांगली आर्थिक मदत मिळवून देणाऱ्या विविध सरकारी योजना

संजय गांधी योजना राष्ट्रीय कौटुंबिक मदत योजना श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना 

संजय गांधी योजना’ ह्या नावांतर्गत राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या विविध योजना आहेत. ह्या योजना सर्वसामान्य निराधार जनतेसाठी आहेत.

आज आपण ह्या योजनांविषयी अधिक जाणून घेऊया.

आपल्या समाजात अनेक निराधार, अनाथ, पंगु, अंध व्यक्ती असतात, काही महिला प_रित्य_क्ता (नवऱ्याने सोडून दिलेल्या), वि_धवा, घटस्फोटित निराधार असतात.

काही मुले संपूर्णपणे अनाथ असतात किंवा काही नागरिक मोठ्या आजारपणाला सामोरे जात असतात.

ज्यांना उत्पन्नाचे काहीच साधन नाही अशा सर्व निराधार नागरिकांसाठी सरकारने ह्या आर्थिक मदत करणाऱ्या योजना आणल्या आहेत. त्या योजनांचा लाभ घेण्यासाठी काही निकष आहेत.

आज आपण त्या निकषांची तसेच ह्या योजनांचा लाभ कोणाला व कसा घेता येईल ह्याची संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

१. संजय गांधी निराधार योजना 

योजनेचा हेतु :

निराधार, अनाथ, अंध, पंगु, प_रित्य_क्ता, वि_धवा, दे_ह_विक्री करणाऱ्या महिला, अनाथ बालके ह्या सर्वांना आर्थिक मदत पुरवणे.

पात्रतेचे निकष :

 • लाभार्थीचे वय ६५ वर्षांपेक्षा कमी असावे.
 • लाभार्थीचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न रु. २१०००/- पेक्षा कमी असावे.

आर्थिक मदत :

वरील दोन्ही निकषांमध्ये बसणाऱ्या लाभार्थीला शासनाकडून रु. ६००/- प्रति महिना मदत दिली जाईल. जर एकापेक्षा जास्त लाभार्थी कुटुंबात असतील तर रु. ९००/- प्रति महिना इतकी मदत दिली जाईल. ही मदत लाभार्थी स्वतः अथवा त्या व्यक्तीची मुले कमावती होईपर्यंत किंवा मुले २५ वर्षांची होईपर्यंत दिली जाईल.

आवश्यक कागदपत्रे :

 • ऍप्लीकेशन फॉर्म
 • पत्ता व त्याचे प्रूफ
 • वयाचा दाखला
 • उत्पन्नाचा दाखला
 • अंध, पंगु अथवा आजारी असल्यास सिविल हॉस्पिटलकडून तसे सर्टिफिकेट

संपर्क :

तहसीलदार ऑफिस (लाभार्थी रहात असेल त्या तालुक्याचे )

२. श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना 

योजनेचा हेतु :

 • लाभार्थीचे वय ६५ वर्षांपेक्षा जास्त असावे.
 • लाभार्थीचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न रु. २१०००/- पेक्षा कमी असावे. अथवा लाभार्थी दारिद्र्यरेषेखालील व्यक्ति असावा.
 • लाभार्थी त्या राज्याचा कमीत कमी १५ वर्षे रहिवासी असावा.

आर्थिक मदत :

प्रत्येक लाभार्थीला रु. ६००/- निवृत्तीवेतन + रु. ४०० /- जर लाभार्थी दारिद्र्यरेषेखालील व्यक्ति असेल + रु.२००/- इंदिरा गांधी राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत अशी मदत दिली जाईल.

आवश्यक कागदपत्रे :

 • ऍप्लिकेशन फॉर्म
 • पत्ता व त्याचे प्रूफ
 • वयाचा दाखला
 • उत्पन्नाचा दाखला
 • दारिद्र्यरेषेखालील व्यक्ति असल्यास तसा दाखला

संपर्क :

तहसीलदार ऑफिस (लाभार्थी रहात असेल त्या तालुक्याचे)

३. इंदिरा गांधी राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना 

योजनेचा हेतु :

अनाथ व निराधार जेष्ठ नागरिकांना आर्थिक मदत पुरवणे.

पात्रतेचे निकष :

 • लाभार्थीचे वय ६५ वर्षांपेक्षा जास्त असावे.
 • लाभार्थी दारिद्र्यरेषेखालील व्यक्ति असावा.
 • लाभार्थी त्या राज्याचा कमीत कमी १५ वर्षे रहिवासी असावा.

आर्थिक मदत :

प्रत्येक लाभार्थीला रु. २००/- इंदिरा गांधी राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत + रु. ४०० /- श्रावण बाळ सेवा राज्य योजने अंतर्गत अशी मदत दिली जाईल.

आवश्यक कागदपत्रे :

 • ऍप्लिकेशन फॉर्म
 • पत्ता व त्याचे प्रूफ
 • वयाचा दाखला
 • उत्पन्नाचा दाखला
 • दारिद्र्यरेषेखालील व्यक्ति असल्यास तसा दाखला

संपर्क :

तहसीलदार ऑफिस (लाभार्थी रहात असेल त्या तालुक्याचे)

४. इंदिरा गांधी अनाथ विकलांग/दिव्यांग निवृत्ती वेतन योजना 

योजनेचा हेतु :

अनाथ व निराधार विकलांग व्यक्तींना आर्थिक मदत पुरवणे.

पात्रतेचे निकष :

१. लाभार्थीचे वय १८ ते ६५ वर्ष असावे.
२. लाभार्थी दारिद्र्यरेषेखालील व्यक्ति असावा.
३. लाभार्थी त्या राज्याचा कमीत कमी १५ वर्षे रहिवासी असावा.

आर्थिक मदत :

प्रत्येक लाभार्थीला रु. २००/- + रु. ४०० /- संजय गांधी निराधार अनुदान योजने अंतर्गत अशी मदत दिली जाईल.

आवश्यक कागदपत्रे :

 • ऍप्लिकेशन फॉर्म
 • पत्ता व त्याचे प्रूफ
 • वयाचा दाखला
 • उत्पन्नाचा दाखला
 • दारिद्र्यरेषेखालील व्यक्ति असल्यास तसा दाखला
 • विकलांग/ दिव्यांग असल्याचा सिविल हॉस्पिटलचा दाखला

संपर्क :

तहसीलदार ऑफिस (लाभार्थी रहात असेल त्या तालुक्याचे)

५. इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना 

योजनेचा हेतु :

विधवा महिलांना आर्थिक मदत पुरवणे.

पात्रतेचे निकष :

 • लाभार्थी महिलेचे वय ४० ते ६५ वर्ष असावे.
 • लाभार्थी महिला दारिद्र्यरेषेखालील व्यक्ति असावी.
 • लाभार्थी महिला त्या राज्याची कमीत कमी १५ वर्षे रहिवासी असावी.

आर्थिक मदत :

प्रत्येक लाभार्थी महिलेला रु. २००/- + रु. ४०० /- संजय गांधी निराधार अनुदान योजने अंतर्गत अशी मदत दिली जाईल.

आवश्यक कागदपत्रे :

 • ऍप्लिकेशन फॉर्म
 • पत्ता व त्याचे प्रूफ
 • वयाचा दाखला
 • उत्पन्नाचा दाखला
 • दारिद्र्यरेषेखालील व्यक्ति असल्यास तसा दाखला
 • पतीच्या मृत्यूचा दाखला

संपर्क :

तहसीलदार ऑफिस (लाभार्थी रहात असेल त्या तालुक्याचे)

६. राष्ट्रीय कौटुंबिक मदत योजना 

योजनेचा हेतु :

कुटुंबातील कमावत्या प्रमुख व्यक्तीचे निधन झाल्यास त्या कुटुंबाला एकरकमी आर्थिक मदत पुरवणे.

पात्रतेचे निकष :

१. कुटुंबातील कमावत्या प्रमुख व्यक्तीचे (वय वर्षे १८ ते ६४ ) निधन झालेले असणे व कुटुंब दारिद्र्यरेषेखालील असणे

आर्थिक मदत :

प्रत्येक लाभार्थी कुटुंबाला रु. १००००/- एकरकमी मदत दिली जाईल

आवश्यक कागदपत्रे :

 • ऍप्लिकेशन फॉर्म
 • पत्ता व त्याचे प्रूफ
 • वयाचा दाखला
 • उत्पन्नाचा दाखला
 • दारिद्र्यरेषेखालील कुटुंब असल्याचा दाखला
 • कमावत्या व्यक्तीच्या मृत्यूचा दाखला

संपर्क :

तहसीलदार ऑफिस (लाभार्थी रहात असेल त्या तालुक्याचे)

तर मित्रांनो, ह्या आहेत निराधार लोकांच्या मदतीसाठी सरकारने आणलेल्या विविध योजना. समाजातील गरजू लोकांसाठी ह्या योजना खूपच फायद्याच्या ठरतील परंतु त्यासाठी ह्या योजना सर्वांपर्यंत पोचायला हव्या.

ह्या योजनांची माहिती सर्वांना मिळावी आणि निराधार, गरजू लोकांना त्याचा जास्तीतजास्त लाभ घेता यावा ह्यासाठी हा लेख जास्तीत जास्त शेअर करा आणि समाजाच्या मदतीसाठी आपले योगदान द्या.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

Manachetalks

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

1 Response

 1. Saiprasad Prabhakar Panhalkar says:

  👍

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!