जाणून घ्या तुमचे पॅन कार्ड वैध आहे कि अवैध?

जर तुमच्या मनात शंका असेल की तुमचे पॅन कार्ड खरे आहे का खोटे तर काही मिनिटात सत्य तपासून घ्या.

बँकेचे किंवा इतर कोणतेही आर्थिक व्यवहार असोत, पॅन कार्ड हे त्यासाठी अगदी महत्वाचे डॉक्युमेंट आहे.

पण हल्ली पॅन कार्डच्या बाबतीत देखील फ्रॉड होताना दिसून येत आहेत.

सहसा गवर्नमेंट अथॉरिटीकडून जारी केले गेलेले पॅन कार्ड खरेच असते परंतु सध्या काही लोक मधल्यामध्ये इतरांची फसवणूक करून फ्रॉड करू लागले आहेत. आपल्या बाबतीत असे घडले आहे का हे जाणून घेण्याची सोपी पद्धत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

तसेच लॉकडाऊन आणि त्यानंतरच्या काळात ऑनलाइन व्यवहार करताना दिले जाणारे पॅन नंबर्स खोटे असण्याच्या काही घटना घडून येताना दिसत आहेत. त्यासाठी देखील आपल्याला मिळालेला ग्राहकाचा, खरेदीदाराचा पॅन क्रमांक खरा आहे किंवा नाही हे तपासून पाहणे आवश्यक बनले आहे. खाली सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे तुम्ही हे देखील सहजपणे तपासू शकाल.

पॅन कार्डची वैधता जाणून घेण्यासाठी 

१. पॅन कार्डची वैधता जाणून घेण्यासाठी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या इ-फायलिंग पोर्टलला भेट द्या. तेथे जाऊन लॉग इन करा.

२. तेथे “वेरिफाय यॉर पॅन” ह्या लिंक वर क्लिक करा.

३. तेथे पॅन कार्डचे सर्व डिटेल्स जसे की पॅन नंबर, पॅन कार्ड धारकाचे संपूर्ण नाव आणि जन्मतारीख इत्यादि भरा.

४. योग्य माहिती भरल्यावर ती चेक केली जाईल आणि इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडे असणाऱ्या महितीशी ती जुळली तर लगेचच पॅन कार्ड वैध आहे असा मेसेज स्क्रीनवर येईल. अन्यथा ते पॅन कार्ड अवैध, खोटे आहे असे समजावे.

तर अशा पद्धतीने इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या वेबसाइटवर जाऊन पॅन कार्डची सत्यता तपासून पाहणे अतिशय सोपे आहे.

तसेच त्याच पोर्टलवर नवीन पॅन कार्ड मिळण्यासाठी अर्ज करणे देखील शक्य आहे. तेथे अर्ज करून घरबसल्या पॅन कार्ड मिळवणे सहज शक्य आहे.

तर मित्रांनो, ह्या सुविधांचा जरूर लाभ घ्या आणि फसवणूक होण्यापासून स्वतःला वाचवा.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.