व्हाट्स ऍप च्या जन्माची प्रेरणादायी कहाणी

आजकाल आपण सगळेच Android फोन वापरतो आणि त्यात एक असं अप्लिकेशन असतंच कि ज्याच्याशिवाय अँड्रॉइड फोनचा विचारच आपण करू शकत नाही. आणि ते अप्लिकेशन दुसरे कोणतेही नसून WhatsApp आहे हे तर कोणीही सांगेल….
सकाळी उठल्यावर करदर्शन घ्यावं तसं मोबाईलचं दर्शन घेणं इथूनच बरेच जणांचा दिवस सुरु होतो… आणि त्यात व्हाट्स ऍप मेसेजेस बघणं हे तर आलंच…
या अप्लिकेशनच्या जन्मामागची कहाणी काय सांगून जाते माहित आहे? कुठल्याही अपयशाने खचुन जाऊ नका, अपयशांनंतर यश खेचून आणायची जिद्द ठेऊन कामाला लागलं तर यश तुमचंच आहे…
ब्रायन ऐक्टन / Brian Acton नावाचा एक IT प्रोफेशनल, नोकरीसाठी जसे तुम्ही आम्ही एखाद्या कम्पनित आपली रिझ्युम पाठवून अप्लाय करतो तसाच फेसबुक मध्ये इंटरव्यू साठी जातो पण तेथे इंटरव्यू मध्ये अपयशी झाल्याने फेसबुक त्याला त्यांच्याकडच्या नोकरीसाठी रिजेक्ट करते…
त्यांनतर ब्रायनने ट्विटरमध्ये सुद्धा नोकरी मिळवण्याचा प्रयत्न केला पण पुन्हा त्यांना अपयशच पदरी पडले.
असं सारखं सारखं अपयश आलं तर माणूस निराश होऊन जातो, खचून जातो, आपल्यातल्या योग्यतेवर त्याला स्वतःलाच भरवसा राहत नाही.
पण अपयश आलं तरी न खचता उसळी मारून जो जिद्दीने उभा राहतो तो यश खेचून आणतोच आणतो…
तसाच ब्रायनला स्वतःवर विश्वास होता, काही करून दाखवण्याची इच्छा होती आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आग लागणं म्हणतात ना ती लागली होती…
याच आग लागण्याचा परिणाम आपल्यावर काय करून घ्यायचा हे आपापल्या हातात आहे.
या आग लागण्याने बेचिराख होऊन जायचं कि या आगीतून तावून सुलाखून बाहेर निघायचं हे आपल्या हातात आहे.
तसेच ब्रायन ऐक्टनने काही मित्रांबरोबर मिळून एक अप्लिकेशन बनवले जे सगळ्या जगाने अक्षरशः डोक्यावर घेतले.
हेच २००९ च्या सुरुवातीला बनलेले Whatsapp आज जगभरात दोन बिलियन पेक्षा जास्त लोकांकडून वापरलं जातंय.
ब्रायनला रिजेक्ट करणाऱ्या फेसबुकने ५ वर्षांनंतर ब्रायनचे हे व्हाट्स अँप १९ बिलियन डॉलर किंमत देऊन विकत घेतले. ज्या कम्पनित ब्रायन नोकरी मागायला गेला होता त्याच कम्पनीचा आता एक शेअरहोल्डर झाला.
हा तो आग लागण्याचा दिवस असतो ना, तेव्हा माणसाची जिद्द जागी झाली पाहिजे.
तुमचा स्वतःवर विश्वास असेल, मेहेनत करण्याची तयारी असेल तर कुठल्याही परिस्थितीत सफलता मिळतेच. तुमचा पराजयाकडे बघण्याचा दृष्टिकोन काय आहे यावर तुमची सफलता अवलंबून आहे.
पराजयातून संधी शोधली, तर सफलता हि मिळतेच मिळते.

वाचनकट्टा… नानाविध पुस्तकांचा…
“अटॅक इज द बेस्ट डिफेन्स”- आक्रमक व्हा आणि जिंका!!
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा
'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा