पोर्तुगीजांनी आपल्याला दिलेली भेट, हापूस आणि काय आहे त्याच्या जन्माची कहाणी?

हापूसला गोव्याची हवा मानवली आणि भारतीयांना हापूसची चव. त्यातूनच हापूसचा प्रवास चालू झाला आणि हा आंबा सर्वत्र पोहचला. पण या फळाला दक्षिण कोकणातील हवा पाणी आणि माती जास्तच मानवली त्यामुळे त्याची गोडी आकार आणि सुवास कोकणातील मातीत जास्त खुलला. त्यातूनच हापूस कोकणातीलच फळ आहे असं मानलं जाऊ लागलं. हापूस कोकणासाठी वरदान ठरला.

हापूस

पोर्तुगीजांनी भारताला दिलेली सगळ्यात गोड प्रेमळ भेट म्हणजे हापूस आंबा. हापूस आंब्याचा जम आता जरी कोकणात बसलेला असला तरी त्याचा उगम गोव्या मधील. मग तिकडे उमेदीचा काळ घालवून कोकणातली हवा, पाणी, माती मानवल्यामुळे कोकणात स्थानापन्न झालेला आणि तेथेच प्रसिद्ध पावलेला.

आता तुम्ही म्हणाल आंबा मूळचा भारतीय उपखंडातला कित्तेक वर्ष आमच्या सगळ्या क्रिया कर्मात, उत्सवात आंब्याला स्थान आहे. भरतातील आंब्याचा इतिहास सुमारे सहा हजार वर्ष पूर्वीचा आहे. भारतात जवळ जवळ सर्व भूभागात पिकणारे हे फळ आहे अगदी जंगला पासून अंगणा पर्यंत सगळीकडे आंब्याची झाडे दिसतात. मग माझी हिम्मत कशी झाली म्हणायची कि ‘पोर्तुगीजांनी भारताला दिलेली सगळ्यात गोडं प्रेमळ भेट…’

तुम्ही म्हणताय ते सारं बरोबर आहे. पण मी काय म्हणतोय ते नीट वाचलं तर कळेल. हापूस हि आंब्याची जात एका पोर्तुगीज माणसाने शोधली आणि रुजवली. त्या माणसाचं नाव होतं ‘अफोन्सो द अल्बुक्वेरकु’ (Afonso de Albuquerque). आता तुम्हाला कळले असेल हापूसच इंग्रजी नाव अल्फान्सो का आहे ते. या पोर्तुगीज नावात इंग्रजांनी घोळ केला आणि Afonso च Alfonso झालं.

अफोन्सो द अल्बुक्वेरकु हा कोणी साधा भोळा शेतकरी नव्हता. तो होता एक प्रसिद्ध समुद्री योद्धा होता. पोर्तुगीज राजाने याला दिलेल्या पदव्या होत्या ‘Captain- Major of the Seas of Arabia, Governor of India . म्हणजे हि पोर्तुगीजांच्या आमला खालील भारतातील पदवी होती.

मुख्यतः तो ओळखला जातो ‘First Duke of Goa ‘ म्हणून. हा भारताचा दुसरा पोर्तुगीज गव्हर्नर होता त्याचा कार्यकाळ होता १५०९–१५१५. खूप धाडसी शूर आणि दर्यावर्दी योद्धा होता त्याने पोर्तुगीजांना गोवा, मल्लक्का, मस्कत, अरब प्रदेश, इथोपिया, पर्शियन आखातातील (Persian gulf) बरेच प्रदेश पोर्तुगीज आमला खाली आणले. तो राजाच्या एवढ्या मर्जीतील होता कि त्याच्या मृत्यू नंतर त्याचा दफन विधी पोर्तुगालच्या राजधानी लिस्बन येथे झाला. या योध्याला प्रवासात मिळालेली वेगवेगळी रोपे जमा करण्याचा आणि नन्तर त्यांची कलम करण्याचा छंद होता. पुढे गव्हर्नर झाल्यावर त्याचा कडे भरपूर वेळ होता आणि जमा केलेली रोपे त्यातूनच त्याचे कलमाचे प्रयोग चालू झाले आणि त्यातच जन्म झाला हापूसचा.

हापूस

हापूसला गोव्याची हवा मानवली आणि भारतीयांना हापूसची चव. त्यातूनच हापूसचा प्रवास चालू झाला आणि हा आंबा सर्वत्र पोहचला. पण या फळाला दक्षिण कोकणातील हवा पाणी आणि माती जास्तच मानवली त्यामुळे त्याची गोडी आकार आणि सुवास कोकणातील मातीत जास्त खुलला. त्यातूनच हापूस कोकणातीलच फळ आहे असं मानलं जाऊ लागलं. हापूस कोकणासाठी वरदान ठरला. त्याच सोबत हापूस जगभरात भारताची ओळख झाला अमेरिका, युरोप, रशिया, अरब देशात हापूसला (कोकणातील) खूप मागणी असते. भारतातून निर्यात होणाऱ्या महत्वाचा माला पैकी हापूस हे एक नगदी पीक झालंय. त्याच सोबत हापूस आज काल एक स्टेट्स सिम्बॉल हि होऊन बसलाय.

अशी हि साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण…

वाचण्यासारखे आणखी काही…

खगोल / अंतराळ
ललित
प्रेरणादायी/MOTIVATIONAL

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय