अशी कोणती ५ वाक्ये आहेत जी बोलल्यामुळे आपण समोरच्याचे मन दुखावतो?

marathi-prernadayi

मित्रांनो, “शब्द हेच शस्त्र आहे” किंवा “एखाद्या शस्त्रापेक्षाही जास्त घायाळ माणूस एखाद्याच्या दुखावणाऱ्या शब्दांनी होऊ शकतो” असे अगदी सहजपणे म्हटले जाते. पण खरोखरच ही नुसती म्हणण्याची गोष्ट नव्हे तर अगदी सत्य आहे.

आपल्याही नकळत आपण असे काही बोलून जातो की समोरची व्यक्ती दुखावली जाते आणि आपल्याला त्याचा पत्ताही लागत नाही. म्हणूनच थोरामोठ्यांनी म्हणून ठेवले आहे की ‘शब्द जपून वापरावेत’, ‘समोरच्याचे मन जपावे’.

आज आपण अशी पाच वाक्य जाणून घेणार आहोत जी बोलून आपण आपल्याही नकळत समोरच्याचे मन दुखावतो.

१. मी तुला आधीच म्हणालो/म्हणाले होतो 

अनेक वेळा असे घडते की आपण आपल्या जवळच्या व्यक्तीला एखाद्या परिस्थितीत ‘असे वागू नकोस किंवा असे केल्यामुळे तुला त्रास होईल’ असे सांगतो. परंतु ती व्यक्ती आपले नाव ऐकता तिला हवे तसेच वागते आणि नंतर त्याचे परिणाम भोगावे लागतात. अशावेळी त्या व्यक्तीची परिस्थिती वाईट असताना त्यांना कधीही मी तुला आधीच असे सांगितले होते तरीही तू माझे ऐकले नाहीस असे म्हणू नये. आपल्या अशा म्हणण्यामुळे त्या व्यक्तीच्या दुःखात वाढच होते. त्यांचे मन दुखावले जाते. घटना घडून गेल्यावर त्याविषयी पुन्हा बोलण्यापेक्षा आपण त्यांना त्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी काय मदत करू शकतो ह्याचा विचार करावा.

२. तू नेहमी असेच वागतोस/ वागतेस 

कोणत्याही सिच्युएशन मध्ये समोरच्या व्यक्तीला तू नेहमीच असेच वागतोस किंवा वागतेस असे म्हणणे म्हणजे आहे त्या परिस्थितीचा दोष त्यांना देण्यासारखेच आहे. आपण असे बोलल्यामुळे समोरची व्यक्ती त्या परिस्थितीची दोषी स्वतःलाच मानु लागते. त्यांचे मन दुखावले जाते. म्हणून आपण थेट असे न म्हणता केवळ त्यांनी कसे वागावे हे साध्या शब्दात त्यांना सांगून पहावे. समोरच्याचे मन न दुखावता बोलणे ही एक कला आहे ती सध्या करणे आजच्या युगात अतिशय आवश्यक झाले आहे.

३. मी सांगतो / सांगते तसेच झाले पाहिजे 

अशाप्रकारे बोलणे म्हणजे समोरच्या व्यक्तीवर हुकूम गाजवण्यासारखे आहे. एखाद्या बाबतीत आपल्याला कसे काम करून हवे आहे हे समोरच्याला सौम्य शब्दात सांगणे आवश्यक आहे. त्याऐवजी अशा ठोस, दुखावणाऱ्या शब्दांमध्ये सांगितल्यामुळे समोरच्या व्यक्तीचा काम करण्याचा उत्साह निघून जातो. त्यामुळे थेट असे बोलणे ऐवजी “ मला असे असे काम अपेक्षित आहे, तसे करणे शक्य आहे का?” अशा शब्दात समोरच्याशी बोलावे. आपले बोलणे हुकूमशाही वृत्तीचे न वाटता मित्रत्वाचे वाटले पाहिजे.

४. एखाद्याविषयी दुसऱ्याकडे चुगली करणे 

एखाद्याविषयी दुसऱ्या व्यक्तीकडे बोलणे किंवा आपले निगेटिव्ह मत व्यक्त करणे योग्य नाही. असे बोलणे म्हणजे जणू चुगली करणेच आहे. त्यामुळे ऐकणाऱ्या व्यक्तीच्या मनात ‘ माझ्याबद्दलही ही व्यक्ती माझ्यामागे असेच बोलत असेल’ असे विचार येऊ शकतात. त्यामुळे आपल्या विषयी त्यांच्या मनात कटुता निर्माण होऊ शकते. कोणाही बद्दल त्यांच्या मागे वाईट मते व्यक्त करणे टाळावे. नेहमी सर्वांविषयी चांगले तेच बोलावे.

५. पूर्वग्रहदूषित वाक्य बोलणे 

एखाद्याविषयी आधीच काहीतरी मत बनवून घेऊन त्याबद्दल बोलणे टाळावे. उदाहरण द्यायचे झाले तर ‘एवढा मोठा झाला तरी एवढे समजत नाही’ किंवा ‘इतका हुशार असून इतकी साधी गोष्ट करता येत नाही’ अशा प्रकारची वाक्य बोलणे टाळावे. कुणालाही ओळख होण्याआधीच कुठल्याही प्रकारे जज करू नये अन्यथा आपण समोरच्याचे मन निश्चितपणे दुखावतो.

तर ही आहेत पाच प्रकारची वाक्ये ज्यामुळे समोरच्याचे मन दुखावण्याची शक्यता असते. अशी वाक्ये बोलणे टाळावे. जाणीवपूर्वक चांगले बोलण्याचा प्रयत्न करावा. म्हणजे आपल्यामुळे कुणाचेही मन दुखावणार नाही.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

You may also like...

1 Response

  1. हो झालंय अस. मी जिच्यावर प्रेम करतो ती एका गैरसमजातून किंवा माझ्या चुकीन दुखावली .पण मी अजून एक चूक केली की तिच्या सहरकर्याला मी तिच्याबद्दल विचारलं. ज्यानं अजून ठिणगी पडली. आता तिला मी नकोय अन् मी बसलोय वाट पाहत. पण एका चुकीला माफी तर देवाकडे सुद्धा मिळते ना ?

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!