मधमाशी चावली तर करा “हे” घरगुती उपाय 

madhmashi chavlyavar upay

मधमाशीमुळे मिळणारा मध हा जितका गोड असतो तितकाच मधमाशीने केलेला दंश वेदनादायी असतो. मधमाशी चावली की होणाऱ्या वेदना त्या व्यक्तीलाच फक्त समजतात.

मधमाशी चावली की तीव्र वेदना तर होतातच, शिवाय चावलेल्या भागावर सूज येणे आणि ताप येणे अशी लक्षणे दिसतात.

मधमाशा कोणाला मुद्दाम चावत नाहीत. आत्मरक्षण करण्याकरता त्या डंख मारतात. मधमाशीच्या चावण्यामुळे शरीरात विष पसरू शकते.

मधमाशी चावली तर काय होते?

आयुर्वेदात सांगितल्यानुसार मधमाशी चावल्यावर सूज येणे, ताप येणे आणि वेदना होणे अशी लक्षणे दिसतात. मधमाशीचा काटा शरीरात मोडला आणि तसाच राहिला असेल तर त्यामुळे इन्फेक्शन होऊ शकते. तो काटा काढण्यासाठी कोणत्याही टोकदार वस्तूचा उपयोग करू नये. तसे करण्यामुळे इन्फेक्शन जास्त पसरू शकते. त्याऐवजी एखाद्या बोथट वस्तूने तो काटा काढून टाकण्याचा प्रयत्न करावा.

मधमाशी चावली असल्याची लक्षणे 

मधमाशी चावल्यावर सूज आणि ताप येणे याव्यतिरिक्त अनेक लक्षणे दिसतात. प्रत्येक व्यक्तीनुसार लक्षणे वेगवेगळी असू शकतात. त्यातील काही लक्षणे खालील प्रमाणे –

१. मधमाशी चावलेला भाग लालसर होणे.

२. त्या भागावर पुरळ येणे

३. त्या भागाची आग होणे

४. ताप येणे

५. उलटी येऊन चक्कर आल्यासारखे वाटणे

६. अशक्तपणा

७. चावलेल्या भागाला खाज सुटणे

८. डोकेदुखी, पोटदुखी, जुलाब

मधमाशा चावू नयेत म्हणून काय करावे?

आपल्या घराच्या जवळपास एखादे मधमाशांचे पोळे असेल तर विशेष काळजी घ्यावी.

१. ते पोळे उतरवण्यास प्रोफेशनल लोकांची मदत घ्यावी. स्वतः प्रयत्न करू नये.

२. पोळे उतरवण्याआधी त्या भागातून जाताना संपूर्ण अंग झाकतील असे कपडे वापरावेत.

३. पायात योग्य चपला-बूट आणि पायमोजे घालावेत.

४. घरातील खाण्यापिण्याची जागा, डायनिंग टेबल इत्यादी स्वच्छ ठेवावे. अन्यथा खरकट्याकडे माशा आकृष्ट होतात.

५. व्यक्तिगत आणि घराची स्वच्छता राखावी.

अशाप्रकारे आपण मधमाशी चावण्यापासून स्वतःचा बचाव करू शकतो.

मधमाशी चावल्यावर करायचे घरगुती उपाय 

१. बर्फ 

मधमाशी चावलेल्या जागेवर चोळून बर्फ लावावा. त्यामुळे वेदना तसेच आग होणे कमी होते पुरळ येत नाही आणि सूज कमी होते तसेच थंड बर्फामुळे इन्फेक्शन पसरणे आटोक्यात येते.

२. बेकिंग सोडा 

बेकिंग सोडा अल्कलाइन असल्यामुळे मधमाशीचे विष पसरवण्यास अटकाव करतो. बेकिंग सोडा लावल्यामुळे सूज, वेदना आणि खाज येणे कमी होते.

३. ऍपल साइडर विनेगर 

मधमाशीने दंश केलेल्या जागी अॅपल साइडर विनेगर लावल्यामुळे सूज वेदना आणि खाज येणे कमी होण्यास मदत होते.

४. मध 

मधमाशी चावलेल्या जागेवर मध लावावा. वेदनेपासून आराम मिळतो.

५. दही 

मधमाशी चावलेल्या जागेवर दही लावावे. तसेच दह्याचे सेवन करावे. त्यामुळे सूज आणि वेदनेपासून आराम मिळतो.

६. चुना 

मधमाशी चावलेल्या जागेवर चुना लावावा. त्याचा औषधासारखा उपयोग होतो.

७. कोरफडीचा गर 

कोरफड थंड असल्यामुळे कोरफडीचा गर लावला असता मधमाशी चावलेल्या जागेवर थंड वाटते. होणाऱ्या वेदनांपासून आराम मिळतो.

८. झेंडूच्या फुलांचा रस 

मधमाशी चावलेल्या जागेवर झेंडूच्या फुलांचा रस लावतात. त्यामुळे बराच फरक पडतो.

९. टूथपेस्ट 

घरात सहज उपलब्ध असणारी टूथपेस्ट मधमाशी चावल्यावर औषधासारखे काम करते. मधमाशी चावलेल्या जागेवर टूथपेस्ट लावावी. वेदना आणि सूज कमी होण्यास मदत होते.

तर हे आहेत मधमाशी चावल्यावर करण्याचे घरगुती उपाय.

परंतु हे उपाय करूनही जर फरक पडत नसेल, सूज वेदना आणि ताप येणे कमी होत नसेल किंवा इतर काही इन्फेक्शन झाल्यासारखे वाटत असेल तर तज्ञ डॉक्टरांना त्वरित दाखवावे. दुखणे अंगावर काढू नये. मधमाशीचा काटा शरीरात मोडला आणि तिथेच राहिला तर विषबाधा होऊन इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. त्याबाबत काळजी घ्यावी.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!