चामखीळ किंवा मस घालवण्याचे घरगुती उपाय 

चामखीळ किंवा मस घालवण्याचे घरगुती उपाय 

त्वचेशी निगडित समस्यांमध्ये आता त्वचेवर चामखीळ किंवा मस येणे ही अगदी कॉमन समस्या झाली आहे. तसे तर ही समस्या स्त्री आणि पुरुष दोघांमध्येही उद्भवू शकते. परंतु स्त्रियांमध्ये हा त्रास जास्त प्रमाणात आढळून येतो. चामखीळ शरीरावर कुठेही येऊ शकते. त्यातल्या त्यात चेहरा आणि हातापायांवर चामखीळ येण्याचे प्रमाण जास्त असते.

चामखीळ एक प्रकारच्या इन्फेक्शनमुळे होते आणि शरीरावर पसरू शकते.

चामखीळ म्हणजे नक्की काय?

त्वचेच्या वरच्या आवरणात झालेली निरुपद्रवी वाढ म्हणजे चामखीळ. चामखीळ ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस नावाच्या विषाणूपासून उद्भवते. हा संसर्ग कॅन्सरचा नसतो. त्वचेवर एखादी बारीकशी जखम झाली असेल अथवा चिर पडली असेल तर तेथून हा व्हायरस शरीरात शिरतो. आणि पुढे वाढत जाऊन त्वचेच्या बाहेरील आवरणापर्यंत येतो.

चामखीळ कशामुळे पसरते?

चामखीळ होण्याची आणि ते पसरण्याची अनेक कारणे आहेत.

१. ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस मुळे शरीरावर चामखीळ येते.

२. ह्या चामखिळीला हात लावून नंतर तो शरीराच्या निरोगी भागावर लावला तर तेथेही चामखीळ येऊ शकते.

३. एकमेकांचे टॉवेल कपडे इत्यादी वापरल्यामुळे बाधित व्यक्ती पासून निरोगी व्यक्तीकडे चामखिळीचा संसर्ग होऊ शकतो.

४. काही लोकांना हा संसर्ग पटकन होतो तर काही लोकांमध्ये ह्याची प्रतिकारशक्ती जास्त असल्यामुळे संसर्ग होत नाही.

त्वचेवर चामखीळ आले आहे हे कसे ओळखावे?

त्वचेच्या बाहेरील आवरणावर फोड किंवा त्वचेच्याच रंगाचे आणि पोताचे काही बारिक गोळे दिसतात. तेच मस किंवा चामखीळ.

१. चामखीळ किंवा मस हे वेगवेगळ्या आकार आणि रंगाचे असू शकतात.

२. त्वचेवरील आवरणावर उभरून आल्यासारखे चामखीळ दिसतात.

३. चामखीळ काळे पांढरे गुलाबी किंवा भुरकट रंगाचे असू शकतात.

४. ते मऊ किंवा खरखरीत असू शकतात.

५. बहुतांश चामखीळ वेदनादायक नसतात. मात्र हात लावला की ते हलतात.

६. पायाच्या तळव्यांवर मस अथवा चामखीळ आले तर मात्र ते वेदनादायक असू शकतात.

७. शरीरातील रक्तवाहिन्या चामखीळींना पोषकद्रव्य पुरवतात.

मस किंवा चामखीळ येऊ नये म्हणून काय करावे?

मस किंवा चामखीळ येऊ नये अथवा जास्त पसरू नये आहारात खालील गोष्टींचा समावेश करावा.

१. भरपूर प्रमाणात ताज्या पालेभाज्या जसे की पालक मेथी आणि हिरव्या फळभाज्या जसे की ब्रोकोली कोबी दुधी भोपळाइत्यादींचा आहारात समावेश करावा त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढून मस येणे कमी होते.

२. भरपूर फळे खाण्याचा फायदा होताना दिसतो. केळी जांभूळ टोमॅटो यांचा आहारात समावेश करावा.

३. भरपूर प्रोटीन असणारा आहार जसे की मांसाहार अंडी डाळी ड्रायफ्रूट यांचा आहारात समावेश करावा.

काय खाऊ नये?

१. ब्रेड बिस्किटे यासारखे प्रोसेस फूड खाऊ नये.

२. ट्रान्स फॅट असणारे पदार्थ खाऊ नयेत.

३. फास्ट फूड खाऊ नये.

४. गोड पदार्थांचे सेवन प्रमाणात करावे.

५. तेलकट, मसालेदार पदार्थ खाऊ नयेत.

वारंवार चामखिळीना स्पर्श करू नये, त्यामुळे ते वाढतात आणि पसरतात.
चामखीळ घालवण्याचे घरगुती उपाय –

त्वचेवरील इतर मुरूम पुटकुळ्या घालवण्यासाठी ज्याप्रमाणे घरगुती उपाय प्रभावी ठरतात त्याच प्रमाणे चामखीळ घालवण्यासाठी देखील काही घरगुती उपाय प्रभावी आहेत ते खालील प्रमाणे –

१. कांद्याचा रस 

कांद्याचा रस काढून तो सकाळ-संध्याकाळ मस अथवा चामखिळीवर सोडून लावल्यामुळे चामखीळ निघून जाण्यास मदत होते.

२. वडाचे पान 

वडाच्या झाडाच्या पानांचा रस काढून तो त्वचेवर लावल्यामुळे त्वचा मुलायम होते आणि मस गळून पडतात.

३. बारीक रेशमी धागा 

बारीक रेशमी धाग्याने मस अथवा चामखीळ बांधून ठेवल्यामुळे तेथील रक्तप्रवाह खंडित होतो त्यामुळे ती त्वचा मृत पावून गळून पडते. मात्र हा उपाय करताना सावधगिरी बाळगावी.

४. बटाटा 

बटाटा चिरून ताबडतोब चामखिळीवर चोळल्यास त्यातील स्टार्च मुळे चामखीळ कोरडे पडू लागते आणि सलग असा उपाय केल्यास ते गळून पडते.

५. अळशीच्या बिया 

अळशीच्या बिया वाटून त्यामध्ये मध मिसळून ते मिश्रण त्वचेवर लावावे. मस गळून पडतात.

६. ॲपल सायडर विनेगर 

एका कापसाच्या बोळ्यावर ॲपल सायडर विनेगर घेऊन ते त्वचेवर चोळावे. त्यामुळे मस गळून पडतात.

७. केळ्याचे साल 

केळ्याचे साल आतल्या बाजूने चामखिळीवर घासून रगडल्यास चामखीळ कोरडे पडून गळून पडते.

८. अननस 

ताज्या कापलेल्या अननसाचे तुकडे चामखिळीवर मालिश केल्याप्रमाणे चोळल्यास ते गळून पडण्यासाठी मदत होते.

९. मोसंबीचा रस 

मोसंबीचा रस त्वचेवर लावून ठेवल्यास मस कोरडे पडून गळून पडतात.

१०. लसूण 

सोललेल्या लसणाची पेस्ट बनवून ती त्वचेवर चोळून लावावी. चामखीळ कमी होण्यास मदत होते.

तर हे आहेत दहा घरगुती उपाय ज्यामुळे चामखीळ अथवा मस कमी होण्यास किंवा नाहीसे होण्यास मदत होते.

परंतु घरगुती उपाय करूनही पुन्हा पुन्हा मस येत असतील तर तसेच त्यातून रक्त येत असेल तर त्वचारोग तज्ञांना दाखवणे आवश्यक आहे. ते त्वचेची तपासणी करून योग्य औषधोपचार सुचवतात.

अशाप्रकारे त्वचेची काळजी घ्या आणि चामखीळ दूर ठेवा.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!