‘चेस्ट कंजेशन’ म्हणजे छातीवर दडपण आल्यासारखे वाटणे नक्की कशामुळे होते?

'चेस्ट कंजेशन' म्हणजे छातीवर दडपण आल्यासारखे वाटणे नक्की कशामुळे होते?

छातीवर दडपण आले, छातीत भरून येणे किंवा छातीत जडपणा जाणवला की आपण एकदम घाबरून जातो त्याचा संबंध थेट हृदयविकाराची जोडून आपल्याला नक्की काय झाले आहे अशी भीती वाटते.

परंतु प्रत्येक वेळी छातीवर दडपण आले (चेस्ट कंजेशन) म्हणजे तो हृदय विकार नसतो. सर्दी, खोकला, छातीत कफ होणे या कारणांमुळे सुद्धा छातीवर दडपण येऊ शकते. छातीवर दडपण आले असण्याची अनेक लक्षणे दिसून येतात. आज आपण याबद्दल विस्ताराने जाणून घेऊया.

छातीवर दडपण आल्यासारखे कशामुळे वाटते?

आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे शरीरात वात आणि कफ दोषाचे असंतुलन झाल्यास छातीवर दडपण आल्यासारखे वाटते. सर्दी, खोकला झाला की तसेच छातीत कफ साठला की छातीवर दडपण आल्यासारखे वाटते.

ह्याशिवाय खालील कारणांमुळे देखील छातीवर दडपण आल्यासारखे वाटू शकते.

१. चिंता (स्ट्रेस) 

खूप जास्त तणाव अथवा चिंता असेल तर छातीवर दडपण आल्यासारखे वाटते. नैराश्य म्हणजेच डिप्रेशनचा सामना करणाऱ्या लोकांना देखील छातीवर दडपण आल्यासारखे वाटते. अशावेळी जोरजोरात श्वास घेणे, श्वास घेण्यास त्रास होणे, चक्कर येणे, डोके दुखणे, घाबरणे आणि स्नायू आखडल्यासारखे वाटणे अशी लक्षणे दिसून येतात.

२. ऍसिडिटी 

बराच काळ पोट रिकामे राहिले की ॲसिडिटीचा त्रास होऊ शकतो. अन्नपचनासाठी लागणारे द्रव्य शरीरात तयार होते परंतु पोटात अन्न असेल तर त्या द्रव्यामुळे छातीत जळजळणे, जड वाटणे, गिळताना त्रास होणे, घशाशी आंबट चव वाटणे असे त्रास होतात.

३. स्नायूंचे आखडणे 

छातीच्या पिंजऱ्याजवळील स्नायू आखडल्यामुळे देखील छातीवर दडपण येऊ शकते. छातीच्या पिंजऱ्यातील हाडांना बांधून ठेवणारे स्नायू जर दुखावले तर असा त्रास होऊ शकतो. अशावेळी छातीत सूज येणे, दुखणे, श्वास घेण्यास त्रास होणे ही लक्षणे देखील दिसतात.

४. न्युमोनिया 

न्युमोनिया हे छातीत जड वाटण्याचे प्रमुख आणि गंभीर कारण आहे. आपली फुफ्फुसे एखाद्या स्पंज प्रमाणे असतात. आपल्या फुफ्फुसांमध्ये शरीराला ऑक्सिजन पुरवण्यासाठी म्हणून ज्या हवेच्या पोकळी असतात त्यात इन्फेक्शनमुळे पाणी भरले कि श्वासोच्छवास घेणे अवघड होते तसेच छातीवर दडपण येते. इन्फेक्शन चे प्रमाण वाढले की छातीत दुखणे, श्वासोच्छवास घेण्यास त्रास होणे, ताप येणे थंडी वाजून येणे अशी लक्षणे दिसतात.

५. दमा 

एखाद्या व्यक्तीस दम्याचा आजार असेल तर त्यांना वारंवार छातीवर दडपण येण्याचा अनुभव येतो. छातीतून घरघर आवाज येणे, श्वास घेण्यास त्रास होणे आणि खोकला येणे अशी लक्षणे देखील दमा असेल तर दिसतात.

६. अल्सर 

पोट आणि आतड्यांमध्ये होणाऱ्या जखमा म्हणजे अल्सर. अल्सर झाला असेल तर अन्नपचन अवघड होऊन बसते. अशावेळी जेवण झाल्यानंतर अन्न नीट न पचल्यामुळे छातीवर दडपण आल्यासारखे वाटते. पोट जड होणे, ढेकर येणे असे त्रास देखील होतात.

वारंवार छातीवर दडपण येऊ नये म्हणून काय करावे?

छातीवर दडपण येण्याचा त्रास होऊ नये म्हणून आहार तसेच जीवनशैली यामध्ये बदल करणे आवश्यक आहे.

आहार खालील प्रमाणे घ्यावा.

१. विटामिन ‘सी’ युक्त आहार जसे की लिंबू संत्री आणि इतर आंबट फळे घ्यावा.

२. भोजन परिपूर्ण असावे त्यामध्ये डाळी आणि भाज्या, कडधान्ये यांचा समावेश असावा.

३. भरपूर प्रमाणात प्रोटीन युक्त आहार घ्यावा. त्यासाठी सर्व डाळी, सोयाबीन, पनीर आणि अंडी यांचा समावेश आहारात असावा.

४. दिवसभरात कमीत कमी दीड लिटर पाणी प्यावे. त्यामुळे कफ पडून जाण्यास मदत होते.

५. त्या त्या ऋतुमध्ये मिळणारी फळे अवश्य खावीत.

६. शिळे अन्न खाऊ नये.

७. तेलकट, मसालेदार आणि पचायला जड असणारे अन्न खाऊ नये.

८. योग्य आहार आणि व्यायाम असणारी जीवनशैली ठेवावी. वेळी-अवेळी खाणे, अतिथंड पदार्थ खाणे टाळावे.

छातीवर दडपण आल्यासारखे वाटले तर करण्याचे घरगुती उपाय 

१. गरम पाणी 

सर्दी आणि छातीत कफ साठल्यामुळे छातीवर येणारे दडपण गरम पाणी पिण्यामुळे कमी होते. दिवसभर थोडे थोडे गरम पाणी पीत राहणे उपयुक्त ठरते. तसेच कोमट पाण्यात मीठ घालून त्या पाण्याच्या गुळण्या करणे आरामदायी असते.

२. वाफारा घेणे 

गरम पाण्यात पुदिन्याच्या तेलाचे तीन-चार थेंब घालून वाफारा घेणे छातीत कफ साठला असता फायद्याचे ठरते. अशा वाफाऱ्यामुळे छातीतील कफ मोकळा होऊन दडपण कमी होते.

३. हर्बल टी 

सर्दी खोकला आणि कप झाला असता निरनिराळ्या आयुर्वेदिक वस्तू वापरून केलेला हर्बल टी गरम गरम पिणे उपयुक्त ठरते. लवंग मिरे दालचिनी इत्यादी तसेच तुळशीची पाने यासाठी वापरली जातात.

४. हळद दूध 

गरम दूधात हळद घालून सेवन करणे कफ आणि खोकला कमी करणारे असते. दररोज रात्री झोपताना दूध हळद घ्यावी. कफ कमी होऊन छाती मोकळी होते.

५. काळी मिरी 

काळ्या मिरीचे १५ ते २० दाणे २ कप पाण्यात घालून उकळावे. ते पाणी उकळून निम्मे झाले की त्यात मध मिसळून त्या काढ्याचे दिवसातून २ वेळा सेवन करावे. खूप फायदा होतो.

६. मध आणि लिंबाचा रस 

लिंबाच्या रसात असणारे विटामिन सी आणि मधात असणारे अॅंटीबॅक्टेरियल गुणधर्म यामुळे कोमट पाण्यात मध आणि लिंबाचा रस मिसळून दिवसातून दोन वेळा पिणे कफ आणि छातीवरील दडपण कमी करते.

७. कांद्याचा रस 

कांद्याचा रस देखील छातीतील कफाचे प्रमाण कमी करतो.

८. उंच उशीवर डोके ठेवणे 

आडवे झोपल्यानंतर छातीवरील दडपण वाढून श्वास घेण्यास त्रास होत असेल तर उंच उशीवर डोके ठेवून डोके आणि नाक वर राहील अशा पद्धतीने झोपल्यास बराच आराम मिळतो.

तर हे आहेत कफामुळे छातीवर दडपण आल्यास करावयाचे घरगुती उपाय. त्यांचा वापर अवश्य करा.

डॉक्टरांकडे केव्हा जावे?

जर वरील घरगुती उपायांनी बरे वाटले नाही तर दुखणे अंगावर न काढता तज्ञ डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा. खालील लक्षणे दिसली तर ताबडतोब दवाखान्यात जावे.

१. १०० डिग्रीपेक्षा जास्त ताप

२. श्वास घेण्यास त्रास

३. खूप दम लागणे ‘

४. हिरव्या रंगाचा कफ पडणे

५. छातीतून खूप घरघर आवाज येणे.

अशी लक्षणे असतील तर ताबडतोब दवाखान्यात जाऊन उपचार घ्यावेत.

Manachetalks

लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजांचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी./ The information is not a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.