कोणालाच माझी पर्वा वाटत नाही असे तुम्हाला वाटते का? असे असेल तर हा लेख संपूर्ण वाचा

कोणालाच माझी पर्वा वाटत नाही असे तुम्हाला वाटते का

माणूस हा खरे तर समूहप्रिय आहे. आपल्याला आपल्या आप्तस्वकीय, मित्रमंडळी ह्यांच्या समवेत रहायला आवडते.

परंतु सध्याच्या पॅनडेमीकच्या काळात एकमेकांपासून लांब राहणे, वारंवार न भेटणे, अंतर राखणे आवश्यक झाले आहे.

अशा वेळी बरेच जणांना एकटेपणा असह्य होऊ लागणं हे ओघाने आलंच…

आपले कोणीच नाही, कोणीच आपली काळजी करत नाही अशी भावना सतत मनात घर करून राहते. तुम्हाला देखील असेच वाटते का? थांबा, असे निराश वाटून घेऊ नका. अशा प्रकारची भावना नेमकी का येते आणि त्यावर आपण मात करू शकतो का हे आपण आज पाहणार आहोत.

आपल्याला काहीवेळा दुःखी किंवा एकाकी वाटणे सहाजिक आहे. परंतु त्याचा अर्थ कोणालाच आपली पर्वा नाही, कोणी आपली काळजीच करत नाही असा समज करून घेणे मात्र बरोबर नाही.

तुम्हाला जर असे वाटत असेल तर खालील बाबींचा विचार करा 

१. तुमचा दृष्टिकोन चुकतो आहे का?

कदाचित तुमचा समोरच्या व्यक्तीकडे पाहण्याचा दृष्टिकोन चुकतो आहे. समोरच्या व्यक्तीला असणारी तुमची पर्वा तुमच्या लक्षात येत नसेल. अशा पद्धतीने विचार करून बघा. आपोआप तुम्हाला तुमची काळजी करणारे लोक आजूबाजूला दिसतील.

२. तुम्हीच इतरांशी फटकून वागत आहात का?

असे तर होत नाही ना की तुमचे कुटुंबीय, मित्र तुमच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु तुम्हीच त्यांच्याशी फटकून वागत आहात? त्यांना जवळ येऊ देत नाही आणि मग तुमचा असा समज होतोय की तुमची काळजी करणारे कोणीच नाही? ह्या गोष्टींचा जरूर विचार करा.

३. तुमच्या नात्यांमधील जवळीक हरवली आहे का?

अगदी जवळच्या व्यक्तीदेखील आपली पर्वा करत नाहीत असे वाटू लागले असेल तर तुमची नाती पुन्हा तपासून पहा. तुमच्याकडून त्या नात्यांमध्ये जवळीक आणणे घडत नाहीये का, ह्याचा विचार करा. तुमच्या अतिशय जवळच्या असणाऱ्या व्यक्ती तुमच्यापासून लांब गेल्या आहेत का हे तपासून पहा.

४. तुम्ही तुमच्या गरजा/अपेक्षा समोरच्यापर्यंत योग्य रीतीने पोचवत आहात का?

तुम्हाला जर असे वाटत असेल की समोरची व्यक्ती तुमची पर्वा करत नाही तर तुम्ही हेही तपासून पाहिले पाहिजे की तुमची त्यांच्याकडून असणारी अपेक्षा त्यांच्यापर्यंत नीट पोचते आहे ना, तुम्हाला आत्ताच्या परिस्थितीत कशाची गरज आहे हे तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांना नीट कळले आहे ना… तसे कळले असेल तरच तुमच्या आजूबाजूची माणसे त्याप्रमाणे वागू शकतील.

५. तुमच्या अवतीभोवती योग्य माणसे आहेत ना?

जर तुम्हाला फारच एकटं आणि कुणाला आपली पर्वा नाही असं वाटत असेल ते आपल्या आजूबाजूला योग्य व्यक्ती आहेत ना हे तपासून पहा.

तुम्ही ज्याप्रकारे मित्रांशी वागता तसेच ते देखील वागतात ना हे पहा. एकतर्फी नाते असेल त्या नात्यात समोरच्या बाजूने प्रेम, काळजी, पर्वा असण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे आपले मित्रमंडळ, जोडीदार ह्यांची निवड तपासून पहा.

वरील सर्व बाबींचा विचार करून मग ठरवा की खरंच कोणीच तुमची पर्वा करत नाही का?

बहुतेकवेळा आपल्याला आपल्या वागण्यातील चूक लक्षात येते. त्याप्रमाणे स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करा.

तसेच कोणी आपली पर्वा करणे न करणे हे एका लिमिटनंतर आपल्या हातात नसते. त्यामुळे खूप प्रयत्न करूनही कोणी तुमची काळजी, पर्वा करत नसेल ते निराश होऊ नका.

स्वतःची पर्वा स्वतः करायला शिका. तुमच्या मनातील एकटेपणाच्या भीतीवर मात करा. स्वतःची योग्य प्रकारे काळजी घ्या.

आपल्याशी बेपर्वाईने वागणाऱ्या लोकांचा फार विचार न करता त्यांच्याशी जशास तसे ह्या न्यायाने वागायला शिका.

त्यामुळे तुमच्या मनातील एकटे असण्याची भीती आणि निराशा कमी होईल.

तर मित्रांनो, वरील उपायांचा वापर करून स्वतः स्वतःचा मित्र बना. तसे केल्यावर आलेला सकारात्मक अनुभव आम्हाला नक्की कळवा.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!