तोंडात आंबट, कडू चव जाणवते का? जाणून घ्या त्याची ७ कारणे, उपाय

तुमच्या तोंडात तुम्हाला आंबट चव जाणवते का? दोन्ही जेवणांच्या मधल्या काळात तोंडात सतत आंबट चव असते का? जेवताना या आंबट चवीमुळे अन्नाची मूळ चव समजत नाही असे होते का?

तोंडात आंबट चव जाणवत असेल तर त्याची ७ कारणे आज आपण जाणून घेऊया.

तज्ञ डॉक्टरांच्या मताप्रमाणे असे होण्याची खालील कारणे आहेत. तसेच त्यावर करता येण्याजोगे उपाय देखील डॉक्टर सांगतात.

१. डीहायड्रेशन

तोंडामध्ये आंबट चव जाणवण्याचे सर्वात प्रमुख कारण म्हणजे पाणी कमी पिणे. कमी प्रमाणात पाणी पिण्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण घटते. त्यामुळे तोंड कोरडे पडते. ज्या ग्रंथीमुळे चव समजते त्या ग्रंथी कोरड्या पडतात आणि तोंडात केवळ आंबट चव राहते.

उपाय

यावर करण्याचा अगदी साधा सुधा उपाय म्हणजे भरपूर प्रमाणात पाणी पिणे. प्रत्येक प्रौढ व्यक्तीने दिवसभरात कमीत कमी ७ ते ८ ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे. त्यामुळे तोंडात आंबट चव राहण्याचा त्रास कमी होईल.

२. धूम्रपान

आरोग्याला घातक असणाऱ्या सवयी पैकी एक म्हणजे धूम्रपान. धूम्रपानामुळे केवळ आरोग्याचीच हानी होते असे नव्हे तर सतत धूम्रपान केल्यामुळे तोंडात एक प्रकारची आंबट चव राहते आणि इतर चवी समजण्याची तोंडाची क्षमता कमी होत जाते. धूम्रपान आरोग्याला घातक तर आहे परंतु ते करण्याचा हा देखील एक साइड इफेक्ट आहे.

उपाय

धूम्रपान करणे सोडून देणे हाच यावरचा सर्वोत्तम उपाय आहे. धूम्रपान सोडण्याचा मनोनिग्रह करण्यासाठी तोंडातील आंबट चव हे देखील एक कारण होऊ शकते. तसा मनोनिग्रह करून धूम्रपान करणे सोडून देण्याचा प्रयत्न करा.

३. तोंडाची स्वच्छता न राखणे

तोंडाची नीट स्वच्छता न राखणे हे देखील तोंडात सतत आंबट चव राहण्याचे एक कारण आहे. त्यास ‘पूअर ओरल हायजिन’ असे म्हटले जाते. रात्री झोपताना दात न घासणे, काही खाऊन झाल्यावर तोंड स्वच्छ न करणे अशा सवयी घातक आहेत.

उपाय

दररोज दोन वेळा ब्रशने दात घासणे, दातांच्या फटीत अडकलेले अन्नकण काढून टाकणे, कोणताही पदार्थ खाऊन झाल्यावर तोंड स्वच्छ धुणे हे यावरील उपाय आहेत. तोंडाची नियमित स्वच्छता राखली की तोंडात आंबट चव येणे कमी होते.

४. आजारपण किंवा इन्फेक्शन

कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन झाल्यास किंवा आजारपण आल्यास तोंडाची चव जाते. अशावेळी तोंडात फक्त आंबट चव लागू शकते. ताप आला की असे होण्याचा अनुभव जवळजवळ सगळ्यांनाच येतो. आजारातून बरे झाल्यावर किंवा इन्फेक्शन बरे झाल्यावर हा त्रास आपोआप नाहीसा होतो. तसे होणे आवश्यक आहे. तसे झाले नाही तर डॉक्टरांना दाखवणे गरजेचे आहे.

उपाय

जरी तोंडाची आंबट चव इन्फेक्शन गेल्यावर किंवा आजारपण बरे झाल्यावर आपोआप जात असली तरी मुळात असे आजार होऊच न देणे जास्त योग्य आहे. त्यासाठी आपले हात वारंवार धुऊन स्वच्छ ठेवणे, काम करत असताना नाक किंवा तोंड यांना हाताचा स्पर्श होऊ न देणे, तसेच आधीपासून आजारी असलेल्या लोकांपासून सुरक्षित अंतर ठेवणे आवश्यक आहे.

५. कॅन्सर किंवा तत्सम गंभीर आजारावरील औषधांच्या साइड इफेक्ट

काहीवेळा आजारपणामुळे नव्हे तर त्या आजारासाठी घेतल्या जाणाऱ्या औषधांमुळे तोंडात आंबट चव राहण्याची शक्यता असते. कॅन्सर सारख्या गंभीर आजारावर घेतले जाणारे रेडिएशन देखील अशा प्रकारचा परिणाम करू शकते. काही औषधांचा साइड इफेक्ट म्हणून तोंडाची चव जाणे, चव न समजणे, तोंडात आंबट वाटणे असे होऊ शकते.

उपाय

यावर थेट उपाय करता येणे शक्य नाही. औषधे किंवा ट्रीटमेंट बंद झाल्यानंतर आपोआप तोंडाची चव पूर्ववत होते.

६. गॅस्ट्रोइसोफेगल रिफ्लेक्स डिसीज

आपली अन्ननलिका आणि पोट यांच्यामध्ये एक झडप असते. अन्न गिळले जात असताना ही झडप उघडते आणि नंतर बंद होते. जर ती झडप योग्य प्रकारे बंद झाली नाही तर पोटातील अन्न पचनासाठी लागणारे ऍसिड अन्ननलिकेद्वारे तोंडात येते. त्यामुळे तोंडाची चव आंबट होते.

उपाय

आपल्या जीवनशैलीमध्ये योग्य ते बदल करून खाण्याच्या वेळा पाळणे हा यावरचा महत्त्वाचा उपाय आहे. दोन घास कमी जेवणे, रात्री झोपण्याआधी किमान दोन तास काहीही न खाणे, तसेच डोके जरा उंच करून झोपणे हे उपाय देखील उपयोगी पडतात.

७. वाढते वय

तज्ञ डॉक्टर असे सांगतात की जसजसे आपले वय वाढत जाते तस तसे आपल्या जिभेवरील टेस्टबड्सचे काम कमी होत जाते. त्यामुळे वयस्कर व्यक्तींमध्ये तोंडात आंबट चव जाणवण्याचे प्रमाण जास्त असते.

हा वयाप्रमाणे होणारा बदल असल्यामुळे यावर देखील थेट उपाय करता येणे शक्य नाही. परंतु तोंडाची स्वच्छता राखणे, वेळच्या वेळी जेवणखाण करणे अशा उपायांनी वयस्कर व्यक्तींमधील तोंडात आंबट चव राहण्याचे प्रमाण कमी करता येणे शक्य आहे. वयस्कर व्यक्तींनी देखील योग्य प्रमाणात पाणी पिणे आवश्यक आहे.

तर ही आहेत तोंडामध्ये आंबट चव लागण्याची कारणे आणि त्यावर करण्याचे उपाय. या उपायांचा जरूर वापर करून पहा. तसे तर तोंडात आंबट चव राहणे निरुपद्रवी आहे परंतु वारंवार तसेच होत असेल आणि कुठल्याही उपायाने फरक पडत नसेल तर तज्ञ डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या. कुठल्या गंभीर आजारामुळे असा त्रास होत असेल तर त्यावर त्वरित उपचार घ्या. हा लेख जास्तीत जास्त शेअर करून हि माहिती सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करा.

Manachetalks

लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजांचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी./ The information is not a substitute for professional medical advice, diagnosis, ortreatment.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय