जाणून घ्या घरच्या घरी प्रेग्नेंसी टेस्ट करण्याच्या पद्धती 

pregnancy test at home in marathi pregnancy test karnyache gharguti upay

गर्भधारणा होणे हा स्त्रीच्या आयुष्यातील एक महत्त्वाचे पर्व असते. सहसा मासिक पाळी आली नाही की गर्भधारणा झाली आहे असे समजले जाते. परंतु मासिक पाळी न येण्यामागे इतरही काही कारण असू शकते. अनियमित मासिक पाळी हार्मोन्समधील बदल, पीसीओडी सारखे आजार किंवा स्थूलपणामुळे असू शकते.

त्यामुळे गर्भधारणा झाली आहे की नाही त्याची टेस्ट करून घेणे अतिशय आवश्यक असते. अशी टेस्ट करण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे जर गर्भधारणा झालेली असेल तर त्या स्त्रीने सुरुवातीच्या काळात विशेष काळजी घेणे आवश्यक असते त्याकडे दुर्लक्ष होऊ नये. तसेच गर्भधारणा झालेली नसेल तर मासिक पाळी का आली नाही, त्यामागे आरोग्यविषयक कोणते कारण आहे ते शोधून काढून आवश्यक ते उपचार करणे शक्य व्हावे.

म्हणूनच प्रेग्नेंसी टेस्ट करून घेणे अतिशय आवश्यक आहे. बाजारात मिळणाऱ्या प्रेग्नेंसी टेस्ट किट वरून प्रेग्नेंसी टेस्ट करणे अतिशय सोपे असते. परंतु काही वेळा या किटचे मिळणारे रिझल्ट अयोग्य असू शकतात. त्यामुळे या किटच्या वापराबाबत काहींना शंका येऊ शकते.

अशा वेळी घरच्या घरी प्रेग्नेंसी टेस्ट करण्याच्या पद्धती उपयोगी येऊ शकतात.

प्रेग्नेंसी टेस्ट केव्हा आणि कशी करावी?

मासिक पाळी चुकल्यानंतर साधारण दोन आठवड्यांनी त्या महिलेची प्रेग्नन्सी टेस्ट करता येते. गर्भधारणा झाली असेल तर त्या महिलेच्या शरीरात एचसीजी नावाचे हॉर्मोन तयार होऊ लागते. लघवीच्या तपासणीद्वारे हे हॉर्मोन शरीरात तयार झाले आहे अथवा नाही त्याची टेस्ट करता येऊ शकते. मासिक पाळी न आल्यानंतरच्या ७ ते १४ दिवसात अशी टेस्ट करणे सर्वात खात्रीशीर असते.

बाजारात मिळणाऱ्या प्रेग्नेंसी टेस्ट किटमध्ये दिलेल्या सूचनांनुसार तशी तपासणी करणे अतिशय सोपे असते. किट मध्ये दिलेल्या सूचनांनुसार टेस्ट करून किती रेघा आल्या म्हणजे टेस्ट पॉझिटिव्ह आली ते काळजीपूर्वक पाहणे आवश्यक असते.

अशी टेस्ट सकाळी झोपून उठल्यानंतरच्या पहिल्या युरीन सॅम्पलचा वापर करून करावी असे सांगण्यात येते. तसेच टेस्ट करण्याआधी खूप जास्त प्रमाणात पाणी अथवा चहा कॉफी पिऊ नये कारण त्यामुळे शरीरातील एचसीजी हार्मोन्सचे प्रमाण कमी होऊ शकते. आणि त्यामुळे टेस्टचा रिझल्ट खात्रीशीर मिळणार नाही. टेस्ट निगेटिव्ह आली परंतु प्रेग्नन्सी असण्याची शक्यता वाटत असेल तर टेस्ट ७२ तास म्हणजेच ३ दिवसांनी पुन्हा करावी.

बाजारातील किट वापरायचे नसेल तर घरच्या घरी असलेले साहित्य वापरून प्रेग्नेंसी टेस्ट करता येऊ शकते. कसे ते आपण पाहूया. यातील माहिती अर्धवट न घेता लेख पूर्णपणे वाचा.

१. बेकिंग सोडा 

एक चमचा युरीन सॅम्पलमध्ये दोन चमचे बेकिंग सोडा मिसळा. थोड्या वेळानंतर जर त्यात बुडबुडे येऊ लागले तर प्रेग्नेंसी टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे असे समजावे.

२. पाइन सोल 

पाइन सोल हे एक प्रकारचे स्वच्छतेसाठी वापरण्यात येणारे मिश्रण आहे. ते कोणत्याही दुकानात सहज उपलब्ध असते. पाइन सोल आणि युरिन समप्रमाणात घेऊन एकत्र करावे. काही काळानंतर जर त्या मिश्रणाचा रंग बदलला तर प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटीव्ह आली आहे असे समजावे.

३. डॅंडेलियन 

डॅंडेलियन नावाचे एक पिवळसर फुलांचे रानटी फुलझाड असते. या फुलझाडाची पाने प्रेग्नेंसी टेस्ट करता उपयोगी येतात. युरिनचे काही थेंब ह्या पानांवर टाकल्यावर जर पानांवर लाल रंगाचे चट्टे उमटले तर प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे असे समजावे.

४. डेटॉल 

लिक्विड डेटॉल वापरून घरच्या घरी प्रेग्नेंसी टेस्ट करता येऊ शकते. एका काचेच्या बाटली अथवा ग्लासात डेटॉल घेऊन त्यामध्ये समप्रमाणात युरीन मिक्स करावी. हे मिश्रण चांगले हलवावे. काही काळाने युरीन आणि डेटॉल वेगवेगळे होऊन त्यांच्यामध्ये एक बारीक पांढरा थर निर्माण झाला तर प्रेग्नेंसी टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे असे समजावे. जर डेटॉल आणि युरीन पूर्णपणे मिक्स होऊन पांढरे द्रावण तयार झाले तर प्रेग्नेंसी टेस्ट निगेटिव आली आहे असे समजावे.

५. साखर 

एखाद्या डिस्पोजेबल कंटेनरमध्ये एक चमचा साखर घ्यावी. त्यामध्ये सकाळच्या पहिल्या युरिनचे सॅम्पल घेऊन ते मिसळावे. जर साखर लगेच विरघळली तर प्रेग्नेंसी टेस्ट निगेटिव्ह आहे असे समजावे. परंतु साखरेचे कण एकमेकांना चिकटून न विरघळता तसेच राहिले तर प्रेग्नेंसी टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे असे समजावे. प्रेग्नेंट महिलेच्या शरीरातील एच सी जी हॉर्मोन साखरेच्या कणांना विरघळू देत नाही.

६. व्हाइट विनेगर 

एका डिस्पोजेबल कंटेनरमध्ये व्हाइट विनेगर घेऊन त्यामध्ये युरीन सॅम्पल मिसळावे. जर विनेगरचा रंग बदलला तर प्रेग्नेंसी टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे असे समजावे.

तर या आहेत घरच्या घरी प्रेग्नेंसी टेस्ट करण्याच्या काही पद्धती. बाजारात मिळणारे प्रेग्नेंसी टेस्ट किट वापरणे अगदी सोयीचे असले तरी ते उपलब्ध नसताना, किंवा पुन्हा पुन्हा टेस्ट करून पाहण्याची गरज असताना ह्या घरच्या घरी टेस्ट करून पाहण्याच्या पद्धती उपयोगी पडू शकतात. या पद्धती वापरून प्रेग्नेंसी कन्फर्म झाली की स्त्रीरोगतज्ञांचा सल्ला अवश्य घ्या आणि स्वतःची काळजी घ्या.

Manachetalks

लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजांचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी./ The information is not a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!