क्रिएटिव्ह लोकांच्या अशा ८ सवयी ज्या त्यांना इतरांपासून वेगळे बनवतात

आजच्या युगात सरधोपट मार्गाने नोकरी-व्यवसाय करणार्‍या लोकांपेक्षा क्रिएटिव्ह लोक जास्त यशस्वी असलेले दिसून येतात. तसेच क्रिएटिव्ह लोक त्यांच्या कामात जास्त समाधानी आहेत असे देखील आढळून येते. कामाचे क्षेत्र कोणतेही असो परंतु त्यात स्वतःची क्रिएटिव्हिटी वापरून वेगळेपणा आणणारे लोक त्या कामाचा आनंद देखील घेतात आणि त्यात यशस्वी देखील होतात.

अशा कोणत्या सवयी आहेत ज्या क्रिएटिव्ह लोकांना इतरांपासून वेगळे बनवतात ते आपण आज जाणून घेऊया. तसे केल्यामुळे आपण देखील क्रिएटिव होण्यासाठी प्रयत्न करू शकतो.

त्यासाठी सर्वप्रथम क्रिएटिव्ह असणे म्हणजे काय ते पाहूया. क्रिएटिव्हिटीला एखाद्या व्याख्येत बांधणे शक्य नाही. नुसत्या वेगळ्या प्रकारच्या कल्पना न करता त्या अमलात आणणे म्हणजे क्रिएटिव्ह असणे. जर केवळ कल्पना करत राहिलो तर त्या कविकल्पना बनून राहतील. आपण केलेल्या कल्पना यशस्वीपणे अमलात आणून आपले काम पूर्ण करणे हेच खरे क्रिएटिव्हिटीचे लक्षण आहे.

१. क्रिएटिव्ह लोक दिवास्वप्ने पाहणारे असतात

खरे तर आपल्याला लहानपणापासून दिवसा स्वप्ने पाहत राहू नका प्रत्यक्ष काम करा असे सांगितले जाते, परंतु जे खरे क्रिएटिव्ह लोक असतात ते अशी दिवास्वप्ने पाहतात, त्यांच्या डोक्यात आपल्या कामासंबंधी निराळ्याच कल्पना सुरू असतात. न्यूरो सायंटिस्ट असे मानतात की दिवा स्वप्ने पाहणे हा क्रिएटिव्हिटीचा एक भाग आहे. फक्त केवळ स्वप्ने पाहणे नसावे तर ती स्वप्ने प्रत्यक्षात उतरवण्याची धमक आणि इच्छा असणे आवश्यक आहे.

२. क्रिएटिव्ह लोकांची निरीक्षणशक्ती चांगली असते

क्रिएटिव्ह लोक हे कधीही नऊ ते पाच या नोकरीत अडकणारे नसतात. सतत निरीक्षण करून ते निरनिराळ्या गोष्टी शिकत असतात, त्यावर विचार करत असतात. समोर दिसणारी प्रत्येक व्यक्ती, घडणारी प्रत्येक घटना ह्या पासून त्यांना काही ना काही नवीन कल्पना सुचतात. त्यांच्या कामासंबंधीच्या नव्या प्रेरणा मिळतात. अफाट निरीक्षण शक्तीच्या जोरावर ते सामान्य घटनेतून देखील काहीतरी चांगले घडवून आणू शकतात.

३. क्रिएटिव्ह लोक नवे अनुभव घेण्यास उत्सुक असतात

कमी धोकादायक किंवा सेफ असणाऱ्या रूढ वाटेने जाण्यात क्रिएटिव्ह लोकांना काही इंटरेस्ट नसतो. नवे अनुभव घेऊन नवी कामे करण्यात त्यांना जास्त रस असतो. अशा कामांमध्ये काही प्रमाणात धोका असला तरी तो स्वीकारण्यास ते मागेपुढे पहात नाहीत. नवीन लोकांना भेटणे, नवनव्या ठिकाणांना भेटी देणे, नवीन प्रकारचे सण उत्सव समारंभ साजरे करणे ह्यामध्ये क्रिएटिव्ह लोकांना रस असतो. कारण त्यामुळे त्यांना त्यांच्या कामात संबंधीच्या नवीन कल्पना सुचतात. नव्या आयडिया मिळतात.

४. क्रिएटिव लोक जिज्ञासू असतात

समोर दिसणारी परिस्थिती आहे तशीच स्वीकारून गप्प बसणाऱ्यातले क्रिएटिव लोक नसतात. ते जिज्ञासू असतात. कुठल्याही गोष्टीमागे, घटनेमागे काय कारण आहे हे ते शोधून काढतात. त्यासाठी विचारण्याचे विविध प्रश्न त्यांच्याकडे कायम तयारच असतात. घडणाऱ्या प्रत्येक घटनेबद्दल त्यांना प्रश्न पडतात, त्याबद्दल विचार करण्याची त्यांना सवय असते. आपल्या कोणत्याही प्रश्नांची उत्तरे मिळाली नाहीत तरी ते गप्प बसत नाहीत स्वतः प्रयत्न करून त्या प्रश्नांची उत्तरे शोधून काढतातच. त्यामुळे अर्थातच त्यांचा मेंदू तल्लख बनून क्रिएटिव्हिटी वाढते. तुम्हाला जर क्रिएटिव बनायचे असेल तर आधी जिज्ञासू बना.

५. क्रिएटिव्ह लोक रिस्क घेण्यास तयार असतात

कोणतेही नवीन काम करायचे आणि त्यात यशस्वी व्हायचे असेल तर रिस्क घेणे आवश्यक असते. क्रिएटिव्ह लोक अशी रिस्क घेण्यात कधीही मागे पुढे पहात नाहीत. आपल्या कामात यशस्वी होणे एवढेच त्यांचे ध्येय असते त्यासाठी कितीही अवघड मार्ग स्वीकारण्यास ते कचरत नाहीत. काहीतरी नवीन करायचे असेल आणि ते सर्वात प्रथम करायचे असेल तर त्यासाठी थोडा धोका पत्करणे आवश्यक असते जे क्रिएटिव्ह लोक करतात.

६. क्रिएटिव लोक त्यांच्या कामाबाबत पॅशनेट असतात

सहज जमेल तितके आणि तेवढेच काम करणे असे क्रिएटिव्ह लोक कधीही करत नाहीत. आपले काम अतिशय उत्तम रीतीने आणि योग्य वेळेत पूर्ण करण्याकडे त्यांचा कल असतो. आपल्या कामाबाबत ते अतिशय पॅशनेट असतात. त्यांच्या कामाची त्यांना अतिशय आवड असून त्यात नवनवीन कल्पना राबवणे असे ते नेहमीच करत असतात. ते स्वतःचे काम पूर्ण करण्याबाबत अतिशय आग्रही असतात आणि कामाबद्दल संपूर्ण निष्ठा बाळगून असतात. त्यामुळे काम टाळणे, काम वेळेत पूर्ण न करणे अशा गोष्टी त्यांच्याकडून कधीही होत नाहीत. तसेच आपले काम इतरांवर सोपवून बिनधास्त राहणे असे देखील ते कधीही करत नाहीत.

७. क्रिएटिव्ह लोक इतरांशी तुलना, स्पर्धा करत नाहीत

स्वतःची इतरांशी तुलना करणे, स्पर्धा करणे, इतरांबाबत असुया बाळगणे अशा गोष्टींमध्ये क्रिएटिव्ह लोक आपला वेळ कधीही वाया घालवत नाहीत. त्यांची स्पर्धा स्वतःशीच असते. आपण आधी केलेले काम त्याहीपेक्षा चांगल्या पद्धतीने पूर्ण करणे हे त्यांचे ध्येय असते. पूर्वी केलेल्या कामापेक्षा देखील चांगले काम करून दाखवणे याकडे त्यांचा कल असतो. इतरांशी स्पर्धा करण्यापेक्षा स्वतःमध्ये सकारात्मक बदल करत राहणे त्यांना आवडते. क्रिएटिव्ह लोक त्यांचा वेळ स्वतःमध्ये सुधारणा करण्यात घालवतात. इतरांच्या चुका काढणे, त्यांना त्याविषयी बोलणे असे न करता आपले काम शांतपणे करत राहणे ते पसंत करतात.

८. क्रिएटिव्ह लोकांची विचार करण्याची पद्धत वेगळी असते

क्रिएटिव्ह लोक इतरांसारखा सरधोपट मार्गाने विचार करत नाहीत. कोणतेही काम वेगळ्या पद्धतीने आणि अधिक सोप्या रीतीने कसे करता येईल याचा ते सतत विचार करतात. काम लवकर आणि इफेक्टिव पद्धतीने पूर्ण करण्याकडे त्यांचा कल असतो. एखादेवेळी अपयश आले तरी त्या अपयशातदेखील नवी संधी कशी मिळेल असा विचार ते करतात. आहे त्याच परिस्थितीचा वेगळ्या रीतीने विचार करून आपले काम करण्याकडे त्यांचा कल असतो. ते कायम सकारात्मक विचार करणारे असतात आणि आजूबाजूच्या सर्व लोकांना बरोबर घेऊन काम करण्याची त्यांची इच्छा असते. ते कोणत्याही परिस्थितीत नकरात्मक विचार करत नाहीत.

तर अशा पद्धतीने क्रिएटिव्ह लोक इतरांपेक्षा निराळे असतात. तुम्हालाही जर क्रिएटिव्ह व्हायचे असेल तर या आठ सवयी आपल्या अंगी बाणवण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे नेहमीच्याच कामात यशस्वी होऊन त्या कामाचा आनंद तुम्ही अधिक चांगल्या प्रकारे घेऊ शकाल.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय