हे ५ मॅनेजमेंट स्किल्स वापरून जीवनात यशस्वी व्हा

yashasvi-honyasathi-kay-karave

आपल्याला सर्वांनाच आयुष्यात यशस्वी व्हायचे असते. पण त्यासाठी नक्की काय प्रयत्न करावेत हे मात्र समजत नाही. आपण काही ना काही प्रयत्न करत राहतो पण म्हणावे तसे यश येत नाही.

मग निराश होऊन आपण प्रयत्न करणे सोडून देतो. पण थांबा, इतक्यात निराश होऊ नका. आज आम्ही तुम्हाला अशा ५ मॅनेजमेंट स्किल्स सांगणार आहोत, जे वापरून तुम्ही ठरवलेल्या गोष्टी पूर्ण करून यशस्वी होऊ शकाल.

बघुयात तर मग ते स्किल्स कोणते..

१. आपले ध्येय शोधून काढा 

आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर आपले नेमके ध्येय माहित असणे अतिशय आवश्यक आहे. आपल्याला आयुष्यात नक्की काय अचिव्ह करायचे आहे याचा विचार आधी करा. एकदा आपले ध्येय ठरवले की ते प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करणे सोपे जाते. जर ध्येय नक्की नसेल तर कितीही प्रयत्न केले तरी ते पुरेसे पडू शकत नाहीत. ज्याच्याकडे भविष्यातील ध्येयाची संपूर्ण कल्पना आधीच असते तो त्या दिशेने प्रयत्न करत राहून यशस्वी होऊ शकतो. परंतु ज्याच्याकडे भविष्याबाबत काहीच दूरदृष्टी नसेल तो प्रयत्न तरी कोणते करणार? जीवनात यशस्वी होण्याचे पहिले मॅनेजमेंट स्किल आपले ध्येय शोधून काढणे हेच आहे. पुढचा काहीच मार्ग निश्‍चित नसताना केलेले प्रयत्न हे वाया जाण्याची जास्त शक्यता असते. असे होऊ देऊ नका.

२. निरनिराळी कामे एका वेळी करण्याची सवय लावून घ्या 

एखादे काम करताना त्या कामासाठी पूर्वतयारी करण्याची गरज असते. अशा वेळी अनेकदा आपण त्या पूर्वतयारीसाठी लागणाऱ्या कामांमुळेच थकून जातो आणि आपले मुख्य काम अर्धवट राहू शकते. असे होऊ न देण्यासाठी अनेक छोटी छोटी कामे एका वेळी करण्याची सवय लावून घ्या. एकमेकांशी निगडीत असणारी कामे एकावेळी करणे अगदी सहज शक्य असते. कामाचे तशा प्रकारचे नियोजन करायला शिका. त्यामुळे तयारी लवकर होऊन कामे वेळेत पूर्ण करणे सहज शक्य होईल.

३. दिवसातील कोणताही वेळ वाया घालवू नका 

यशस्वी होण्यासाठी टाईम मॅनेजमेंट अतिशय महत्त्वाचे आहे. दिवसातील कोणताही वेळ वाया जाता कामा नये. समजा तुम्हाला कामाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी एक तास लागतो आणि तुम्ही स्वतः ड्राईव्ह करत नसाल तर तेवढ्या वेळात आपल्या कामाशी संबंधित काहीतरी पुस्तक वाचता येईल. स्वतः ड्राईव्ह करत असाल तर एखादे मोटिवेशनल लेक्चर ऐकणे सहज शक्य आहे. दिवसभरातील वेगवेगळ्या वेळी करता येण्याजोगी कामे आधीच लक्षात घेऊन त्याप्रमाणे दिवस प्लॅन करावा. कामाच्या तासांमध्ये प्रत्येक मिनिटाचा सर्वोत्तम उपयोग करून घेणे हीच यशस्वी होण्याची पहिली पायरी आहे. असा फावला वेळ जर काही तरी नवीन शिकण्यासाठी वापरला तर त्याचा आपल्याच कामासाठी अतिशय उपयोग होतो. यशस्वी माणसाचा वेळ त्याच्यासाठी सर्वात जास्त किमती आणि महत्वाचा असतो आणि अशी व्यक्ती आपला वेळ कधीच वाया घालवत नाही.

४. चांगले कौटुंबिक आणि व्यावसायिक संबंध प्रस्थापित करा 

यशस्वी असणे हे केवळ पैसा आणि संपत्तीशी संबंधित नाही. जीवनात तीच व्यक्ती यशस्वी समजली जाते जिचे आपल्या कुटुंबातील सर्व लोकांशी तसेच मित्रमंडळींशी आणि नोकरी अथवा व्यवसायातील सर्व सहकाऱ्यांशी अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध असतात. आपल्या आजूबाजूच्या सर्व लोकांशी आपले संबंध चांगले राहतील यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करा. तुमच्या कुटुंबातील लोकांना क्वालिटी टाईम देण्याचा प्रयत्न करा. तसेच व्यवसायाशी निगडित लोकांना सर्वतोपरी मदत करून त्यांची मने जिंकण्याचा प्रयत्न करा. असे करणारा माणूसच खरा यशस्वी मानला जातो. जितक्या जास्त लोकांशी संबंध तितकी निरनिराळ्या कामात यशस्वी होण्याची खात्री वाढत जाते. जेव्हा आपण इतरांना मदत करतो तेव्हा आपल्यालाही आवश्यक असेल तेव्हा मदत मिळण्याची शक्यता वाढते.

५. सर्वांशी योग्य संवाद साधा 

अनेक वेळा नीट सूचना न दिल्या गेल्यामुळे हाताखालच्या लोकांना करायला सांगितलेली कामे योग्य प्रकारे होत नाहीत. अशावेळी कामाचा महत्त्वाचा वेळ फुकट जातो. त्यामुळे ज्यांच्याकडून काम करून घ्यायचे आहे अशा सर्वांना योग्य प्रकारे सूचना देणे अतिशय महत्त्वाचे ठरते. आपल्या सहकाऱ्यांशी योग्य पद्धतीने संवाद साधायला शिका. सर्वांना आवश्यक त्या सूचना देऊन नीट काम करण्याबाबत सांगितले की कामात होणाऱ्या चुकांमुळे वेळ वाया जात नाही. यासाठी उत्तम प्रकारचे कम्युनिकेशन असणे अतिशय आवश्यक आहे. कम्युनिकेशन जितके अधिक चांगले तितके काम लवकर आणि अचूक पद्धतीने होण्याची शक्यता वाढते.

तर हे आहेत असे ५ लाईफ मॅनेजमेंट स्किल्स ज्यांचा वापर करून आपण जीवनात नक्कीच यशस्वी होऊ शकतो. जीवनात यशस्वी होणे म्हणजे फक्त भरपूर पैसा कमवणे नसून पैशाबरोबरच मन:शांती, कौटुंबिक स्तरावर जिव्हाळा, समाजामध्ये आदराचे स्थान, कामाच्या ठिकाणी मानसन्मान हे सगळे मिळवणे म्हणजे यशस्वी होणे. असे होण्यासाठी लेखात उल्लेख केलेल्या सर्व स्किल्सचा अवश्य वापर करा.

ही माहिती जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोचवून त्यांना देखील यशस्वी होण्यासाठी मदत करा. त्यासाठी हा लेख जास्तीतजास्त शेअर करा.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

1 COMMENT

  1. खुप सुंदर व उपयुक्त माहिती.
    मनःपूर्वक धन्यवाद.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.