लाल मिरची खा आणि दीर्घायुषी व्हा

मित्रांनो, लेखाचे शीर्षक वाचून चकित झालात ना? पण हे खरे आहे. जेवणात नियमित लाल मिरची खाण्याने हृदय रोग, कॅन्सर यासारख्या रोगांमुळे होणारे अपमृत्यु टाळता येऊ शकतात.
नुकतेच आपण सर्वांनी पाहिले की तरुण अभिनेता सिद्धार्थ शुक्ला ह्याचे हार्ट अटॅक येऊन दुर्दैवी निधन झाले. असे अवेळी होणारे मृत्यू आहार आणि जीवनशैलीची विशेष काळजी घेतली तर सहज टाळता येऊ शकतात. हृदयरोग किंवा कॅन्सर सारख्या आजारात आहारात लाल मिरची असणे फायद्याचे ठरू शकते.
अमेरिकन हार्ट असोसिएशनने नुकत्याच केलेल्या एका सर्वे मध्ये असे आढळून आले आहे की लाल मिरची खाणाऱ्या लोकांमध्ये कार्डिओ व्हॅस्क्युलर डिसीज म्हणजेच हृदयरोगाने होणाऱ्या अपमृत्यूचे प्रमाण 26 टक्के इतके कमी आहे, तसेच अशा लोकांमध्ये कॅन्सरने होणाऱ्या अपमृत्युचा धोका 23 टक्के इतका कमी आहे. याचाच अर्थ भोजनात नियमितपणे लाल मिरची खाल्ल्यास अशा दुखण्यामुळे होणारा मृत्यू टाळता येतो किंवा पुढे ढकलता येतो.
याआधी देखील जगभरात विविध देशात ह्या विषयावर संशोधन झाले आहे. मिरची, काळी किंवा पांढरी मिरी अशा प्रकारच्या मसाल्याच्या पदार्थांचे सेवन आरोग्याच्या दृष्टीने निरनिराळ्या प्रकारे फायद्याचे आहे असे आढळून आले आहे.
मिरची आणि मिरी मध्ये मोठ्या प्रमाणात फायबर, विटामिन ए, विटामिन बी-6, विटामिन सी असते. तसेच पोटॅशियम आणि कॉपर अशी खनिजेही मोठ्या प्रमाणावर असतात. त्यामुळे मिरची आणि मिरचीचे नियमित, योग्य प्रमाणात सेवन आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरते.
निरनिराळ्या मेडिकल जर्नल्समध्ये असे शोधनिबंध लिहिले गेले आहेत. त्यामध्ये मिरची खाण्याचे फायदे विस्ताराने सांगितले गेले आहे. लाल मिरची नियमीत खाल्ल्यामुळे शरीराचे चयापचय म्हणजेच मेटाबोलिजम सुधारते, तसेच शरीराला भरपूर प्रमाणात मायक्रोन्यूट्रिएंट मिळतात आणि कॅलरी कंट्रोल साठी देखील मिरची खाण्याने मदत होते.
अमेरिका, चीन, इटली, इराण आणि भारत या देशातील लोकांच्या आहारात मिरी आणि मिरचीचा वापर मोठ्या प्रमाणात दिसून येतो. या देशातील लोकांच्या आहाराचे संशोधन केल्यानंतर मिरची, मिरी खाणारे लोक जास्त निरोगी आयुष्य जगतात असे आढळून आले आहे.
क्रॉनिक म्हणजेच जुनाट प्रकारचे आजार होण्याचे प्रमाण देखील अशा लोकांमध्ये कमी असते असे आढळून आले आहे. डायबीटीस आणि हृदयरोग हे आजार क्रॉनिक समजले जातात. नियमित मिरची खाण्यामुळे या आजारांचे प्रमाण देखील कमी होते असे आढळून आले आहे.
तर मित्र मैत्रिणींनो, आपल्या जेवणात स्वाद आणि लज्जत आणणारी ही मिरची आरोग्यासाठी देखील इतकी गुणकारी आहे हे आज आपल्याला समजले. अशा मिरचीचे नियमित, योग्य प्रमाणात सेवन करा आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्या. हृदयरोग, डायबिटीस, कॅन्सर यासारख्या आजारांना दूर ठेवा. स्वस्थ राहा आनंदी रहा.
जाणून घ्या हृदयातील ब्लॉकेजची लक्षणे, कारणे, घरगुती उपाय आणि पथ्ये
तुम्हाला टाइप २ मधुमेह/डायबीटीस झाला आहे का? ओळखा या लक्षणांवरून
असेच मनाचेTalks चे विविध लेख तुम्ही ऍमेझॉन किंडल वर जाहिरातींविना वाचू शकाल.
रहस्य जगण्याचे : समाधानी आयुष्याचे पुस्तक अमेझॉनवर खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.
रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / Instagram वर मनाचेTalks ला फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा
'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा