जाणून घ्या टक्कल पडण्याची कारणे, लक्षणे आणि घरगुती उपाय

टक्कल पडणे घरगुती उपाय

स्त्रिया असोत किंवा पुरुष, आपले केस घनदाट, काळेभोर आणि सुंदर असावेत असे सगळ्यांनाच वाटते. परंतु काही ना काही कारणांमुळे केस गळू लागतात आणि टक्कल पडू लागते. अशा वेळी लोक अगदी हैराण होऊन जातात.

आज आपण टक्कल पडण्याची कारणे आणि त्यावरचे घरगुती उपाय जाणून घेणार आहोत.

तसे तर दररोज केस विंचरताना काही प्रमाणात केस निघून येणे ही नॉर्मल गोष्ट आहे. परंतु खूप जास्त प्रमाणात केस गळत असतील तर मात्र ती टक्कल पडण्याची सुरुवात असू शकते. अशा टक्कल पडण्याला एलोपेशिया असे म्हणतात. यामध्ये सुरुवातीला मोठ्या प्रमाणात केस गळू लागतात. त्यानंतर नवीन येणारे केस विरळ येतात तसेच नवीन येणारे केस कमकुवत असतात आणि त्यांचे टेक्श्चर देखील बदलते.

टक्कल पडण्याचे तीन प्रकार आहेत.

१. एन्ड्रोजेनीक एलोपेशिया – याचे प्रमाण पुरुषांमध्ये अधिक दिसून येते. डोक्याच्या मध्यभागातील केस विरळ होणे हे याचे प्रमुख लक्षण आहे. प्रौढत्वाकडे झुकल्यावर अशा प्रकारचे टक्कल पडण्यास सुरुवात होते. मध्यभागातील केस विरळ होत होत हळू हळू संपूर्ण टक्कल पडते.

Androgenic alopecia

२. एलोपेशिया एरिटा – यामध्ये डोक्याच्या वेगवेगळ्या भागातील केसांचे पुंजके गळून पडण्याची सुरुवात होते. त्यामुळे ठिकठिकाणी टक्कल दिसू लागते. शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे हे याचे प्रमुख कारण मानले जाते.

alopecia-areata

३. ट्रॅक्शन एलोपेशिया – ठरावीक ठिकाणचे केस ओढले जाऊन टक्कल पडणे हे याचे प्रमुख लक्षण आहे. केस विशिष्ट प्रकारे बांधल्यामुळे अशा प्रकारचे टक्कल पडते. घट्ट पोनीटेल अथवा वेणी घालण्यामुळे असे होऊ शकते. परंतु हेअर स्टाईल बदलली, केस सैलसर बांधले की ह्या प्रकारचे टक्कल पडण्याचे प्रमाण कमी होते. ह्याचे प्रमाण अर्थातच स्त्रियांमध्ये अधिक आहे.

ट्रॅक्शन एलोपेशिया

टक्कल पडण्याची लक्षणे कोणती?

१. केस विंचरताना केसांचे मोठमोठे पुंजके गळून पडणे.

२. कपड्यांना, टॉवेलला अथवा झोपण्याच्या उशीवर केस चिकटलेले असणे.

३. केसांना हात लावताच केस गळून हातात येणे.

टक्कल पडण्याची कारणे कोणती?

आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे पित्तदोषाचे असंतुलन हे टक्कल पडण्याचे प्रमुख कारण आहे.

१. हार्मोन्सचे असंतुलन

२. वय वाढणे

३. अनुवंशिकता

४. शरीरात आयरन व प्रोटीनची कमतरता असणे

५. वजन झपाट्याने उतरणे

६. विटामिन ए चे अतिसेवन

७. केसांच्या मुळाशी झालेला संसर्ग

८. एखादा शारीरिक अथवा मानसिक धक्का

९. गर्भनिरोधक गोळ्यांचे सेवन करणे

१०. प्रसूती

११. स्ट्रेस

१२. गोळ्यांचे साइड इफेक्ट

१३. केसांना वारंवार रसायनयुक्त रंग लावणे, इतर ट्रीटमेंट करणे

१४. थायरॉईडचे असंतुलन

१५. कॅन्सरवर घेतली जाणारी किमोथेरपी

टक्कल पडू नये म्हणून काय करावे?

१. आहार 

हल्ली लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच केस गळणे अथवा टक्कल पडणे या समस्येने ग्रस्त आहेत. त्याचे प्रमुख कारण आहारातील कमतरता हेच आहे. चांगले पोषण देणारा पौष्टिक आहार घेणे केसांच्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक आहे. प्रोटीन आणि लोहयुक्त आहार घेणे अतिशय आवश्यक आहे. विटामिन सी, ओमेगा थ्री फॅटी ऍसिड, विटामिन ए इत्यादींनी युक्त आहार घेणे अकाली टक्कल पडण्यापासून वाचवते.

२. केसांची काळजी 

१. वारंवार केसांना हात लावणे टाळावे.

२. खूप जास्त गरम पाण्याने केस धुऊ नयेत.

३. रसायनयुक्त रंग केसांना लावू नयेत, केस डाय करू नयेत .

४. चांगल्या प्रतीचा शाम्पू वापरून केस धुवावे.

५. आपला कंगवा स्वतंत्र ठेवावा.

६. केस खुप घट्ट बांधू नयेत.

७. उन्हात अथवा वाऱ्यात जाताना केसांना स्कार्फ बांधावा किंवा टोपी घालावी.

टक्कल पडू नये म्हणून करायचे घरगुती उपाय 

१. मेथी दाणे 

एक चमचा मेथी दाणे रात्रभर भिजवून सकाळी गाळून घ्यावे. त्यामध्ये घट्ट दही मिसळून ते मिश्रण केसांच्या मुळांना लावावे. केसांच्या मुळांना पोषण मिळून केस गळणे कमी होते. नवीन केस येतात.

२. उडदाची डाळ 

शिजवलेली उडदाची डाळ वाटून त्याचा लेप केसांना लावावा. असे नियमित केल्याने केस गळणे कमी होऊ नवीन केस येण्यास सुरुवात होते.

३. जेष्ठमध 

ज्येष्ठमधाची पावडर दुधात मिसळून त्यात थोडे केशर घालावे. अशी पेस्ट रात्रभर केसांना लावून ठेवावी. डोक्यावर नवीन केस येण्यासाठी खूप मदत होते.

४. कोथिंबीर 

कोथिंबीर वाटून त्याची पेस्ट केसांच्या मुळांशी लावा. हा उपाय नियमित केल्यामुळे केस गळणे कमी होऊन नवीन केस येण्यासाठी मदत होते.

५. केळ 

पिकलेले केळ चांगले कुस्करून त्यात थोडा लिंबाचा रस मिसळावा. ते मिश्रण केसांच्या मुळांना लावावे. अर्ध्या तासानंतर केस धुऊन टाकावे. हा उपाय नियमित करावा. टक्कल पडणे कमी होऊन नवीन केस येऊ लागतात.

६. कांदा 

एका कांद्याचे चिरून दोन भाग करावे. डोक्याच्या टक्कल पडलेल्या ठिकाणी तो कांदा रगडून चोळावा. असे नियमित करण्यामुळे त्या भागावर केस उगवू लागतात.

७. तेलाचे नियमित मालिश

केसांच्या आरोग्यासाठी त्यांना तेलाने नियमित मालिश करणे अतिशय आवश्यक आहे. त्यामुळे केसांच्या मुळांना पोषण मिळते तसेच केसांचा पोतही चांगला राहतो. खोबरेल तेल, आवळ्याचे तेल, बदामाचे तेल केसांसाठी अतिशय उपयुक्त आहे. यापैकी कोणत्याही तेलाने आठवड्यातून कमीत कमी दोन ते तीन वेळा केसांना मालीश करावी. कोमट तेलाने मालिश केल्यास जास्त फायदा होतो.

८. आवळा चूर्ण 

आवळा चूर्ण पाण्यात उकळवून त्या पाण्याने केस धुवावे. केस गळती कमी होते.

९. कडुलिंबाचे तेल 

कडुलिंबाचे तेल केसांच्या मुळाशी लावल्यामुळे केस गळणे कमी होऊन नवीन मजबूत केस येण्यास मदत होते.

१०. लसूण 

टक्कल पडण्याची समस्या अनुवंशिक असेल तर घरातील सर्वांनी आहारात लसणाचा आवर्जून समावेश करावा. केस गळणे कमी होते.

तर हे आहेत टक्कल पडू नये म्हणून करण्याचे घरगुती उपाय. या उपायांचा अवश्य वापर करा आणि आपल्या केसांचे आरोग्य सांभाळा.

परंतु केस गळण्या बरोबरच डोक्यातील त्वचेला खाज येणे, तेथे जखम दिसणे किंवा एखाद्या विशिष्ट ठिकाणचे केस खूप जास्त प्रमाणात निघून येणे असे होत असेल तर डॉक्टरांना दाखवणे आवश्यक आहे. हे एखाद्या गंभीर आजाराचे लक्षण असू शकते. त्यावर वेळीच औषधोपचार होणे गरजेचे असते.

हा लेख शेअर करून ही माहिती जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोचवा.

केस गळतात का? वाचा केसांची मुळे बळकट करण्याचे आयुर्वेदिक उपाय

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

2 COMMENTS

 1. आहार हा सवोत्तम आसने आवश्यक आहे.
  फारच छान, माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.

  • #मनाचेTalks च्या लेखांचे अपडेट्स मोफत मिळवण्यासाठी 👇व्हाट्सएप तसेच टेलिग्राम चॅनलला जॉईन होता येईल.

   सर्व लेख नियमितपणे पोहोचण्यासाठी मनाचेTalks चा व्हाट्सएप नंबर, 8308247480 तुमच्या डिव्हाईस मध्ये सेव्ह असू द्या.

   तसेच सबस्क्रिप्शन थांबवायचे असल्यास, जॉईन केलेला ग्रुप अथवा चॅनल ‘लिव्ह’ करून द्यावा.

   त्याचबरोबर मनाचेTalks च्या सर्व पोस्ट न चुकता फेसबुकच्या न्यूज फीड मध्ये दिसण्यासाठी पोस्टच्या वरच्या उजव्या कोपऱ्यावर असलेल्या तीन डॉट्स वर दाबून ‘Add मनाचेTalks to Favourites’ यावर क्लिक करा…

   व्हाट्स ऍप इन्व्हाईट लिंक.👇

   https://chat.whatsapp.com/LTv393KE2TSL0Yu4usFmpZ

   टेलिग्राम चॅनल👇

   https://t.me/manachetalksdotcom

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.