लहान मुलांमधील फ्लू म्हणजेच इन्फ्लूएंझाची कारणे, लक्षणे आणि उपाय

इन्फ्लुएन्झा म्हणजेच ज्याला आपण सर्वसामान्य भाषेत फ्लू असे म्हणतो तो एका वायरस मुळे पसरणारा आजार आहे. हा आजार संसर्गजन्य असून चटकन पसरतो. फ्लू झाला असताना सुरवातीचे दोन-तीन दिवस जास्त ताप येतो.

कोरोना व्हायरसच्या तिसऱ्या लाटेचा धोका लहान मुलांना जास्त असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यातील सर्व मुलांना पावसाळ्याआधी ‘इन्फ्लूएन्झा’ लस देण्यात यावी, असे आवाहन राज्य सरकारच्या कोव्हिड टास्कफोर्स आणि पीडियाट्रिक टास्कफोर्सने केली आहे. या पार्शवभूमीवर इन्फ्लूएन्झा म्हणजे काय? लहान मुलांमध्ये फ्लूची लागण होण्याची कारणे? लहान मुलांना इन्फ्लूएंझाची लागण झाल्यास काय करावे? फ्लूमुळे आजारी पडलेल्या मुलांची काळजी कशी घ्यावी हे या लेखात समजून घ्या आणि जास्तीत जास्त लोकांना हा लेख शेअर करा.

वातावरणात वारंवार बदल झाले की इन्फ्लूएन्झाचा वायरस लवकर सगळीकडे पसरतो. अशावेळी लहान मुले या आजाराला लवकर बळी पडतात कारण लहान मुलांची प्रतिकारशक्ती कमी असते. फ्लू झाला असता लहान मुलांमध्ये खालील लक्षणे दिसून येतात

१. १०४ डिग्री फॅरेनहाईट पर्यंत ताप

२. थंडी वाजून येणे

३. अशक्तपणा आणि थकवा

४. डोकेदुखी आणि अंगदुखी

५. कोरडा खोकला

६. घसा खवखवणे

७. पोट दुखणे आणि उलटी होणे

८. भूक न लागणे

९. चक्कर येणे

१०. सर्दी होऊन नाकातून पाणी गळणे

११. कान दुखी

१२. जुलाब

तर ही आहेत लहान मुलांमध्ये दिसून येणारी फ्लूची लक्षणे. फ्लू झाला असता लहान मुलांचे पोट देखील बिघडते त्यामुळे काही वेळा पालकांकडून हा आजार पोटाचा विकार आहे असे समजले जाते. त्यामुळे मुलांच्या आजारांची लक्षणे नीट तपासून योग्य निदान करून औषध घेणे आवश्‍यक असते.

लहान मुलांमध्ये फ्लूची लागण होण्याची कारणे

इन्फ्लूएंझाचे वायरस ३ प्रकारचे असतात. टाईप ‘ए’ आणि टाईप ‘बी’ इन्फ्लुएन्झा वर्षातून एकदा ऍक्टिव्ह असतात परंतु टाईप सी मात्र वर्षभरात केव्हाही होऊ शकतो.

१. फ्लू अतिशय वेगाने पसरणारा संसर्गजन्य आजार आहे. लहान मुल जर फ्लूने बाधित व्यक्तीच्या संपर्कात आले तर त्यालाही फ्लू होण्याची शक्यता असते. संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या खोकण्या अथवा शिंकण्यामुळे हा आजार पसरतो.

२. संसर्ग झालेल्या व्यक्तीला ताप येण्याआधी एक दिवस ते पुढील पाच ते सात दिवस त्या व्यक्तीमुळे इतरांना संसर्ग होऊ शकतो.

३. लहान मुले स्वतःची विशेष काळजी न घेता एकमेकांच्या वस्तू वापरणे, खेळताना एकमेकांच्या संपर्कात येणे अशा गोष्टी करत असतात. त्यामुळे देखील मुलांमध्ये हा संसर्ग लवकर पसरतो.

लहान मुलांना इन्फ्लूएंझाची लागण झाल्यास खालील उपाय करावेत

फ्लू झालेल्या मुलांना संपूर्ण बरे होण्यास कमीत कमी १५ दिवस लागतात. ताप गेला तरीही थकवा आणि अशक्तपणा पूर्णपणे जाण्यास एवढे दिवस लागतात. तसेच मुलांना संपूर्ण विश्रांतीची आवश्यकता भासू शकते.

फ्लूमुळे आजारी पडलेल्या मुलांची आपण खालील प्रकारे काळजी घेऊ शकतो.

१. मुलाने संपूर्ण आराम करावा. बेड रेस्ट घ्यावी. काही दिवस बाहेर खेळायला पाठवू नये. मुलाला कंटाळा आल्यास मुलाशी तो फार दमणार नाही अशा बेताने घरीच खेळावे. शक्य तितका आराम करण्यास सांगावे.

२. फ्लू झालेला असताना मुलांना ताप असून देखील थंडी वाजते. अशावेळी मुलांना फार जाड पांघरूण घालू नये. त्याऐवजी सुती परंतु उबदार पांघरूण घालावे. खूप जास्त लोकरीचे कपडे घालणे टाळावे. मुलाला कम्फर्टेबल वाटेल असे कपडे घालावेत.

३. जर फ्लूमुळे मुलाचे नाक चोंदले असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने नेसल ड्रॉप्सचा वापर करावा. तसेच घसा खवखवणे असेल तर कोमट पाण्यात मीठ घालून त्या पाण्याच्या गुळण्या करावयास लावाव्यात.

४. मुलाला ताप आणि अंगदुखी जास्त असेल तर बाल रोग तज्ञ यांच्या सल्ल्याने योग्य ती औषधे आणावीत. माहीत असलेली तापावरची औषधे देता येतात परंतु त्यासाठी मुलाचे वय आणि वजन लक्षात घेणे आवश्यक आहे.

५. ताप आला असताना मुलांची भूक कमी होते तसेच शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे मुलांना डीहायड्रेशन होऊ शकते. यासाठी आहारात द्रवरूप पदार्थ जास्त प्रमाणात देणे आवश्यक आहे. मुलांना पातळ खिचडी, गरम सूप असे पदार्थ वारंवार द्यावे. एकाच वेळी जास्त खाणे मुलांना शक्य नसल्यास दिवसातून चार ते पाच वेळा थोडे थोडे पदार्थ खाण्यास द्यावेत.

मुलांना डीहायड्रेशन झाले असल्यास खालील लक्षणे दिसतात.

अ) गडद पिवळी लघवी होणे.

आ) रडू आल्यास डोळ्यातून अश्रू न येणे

इ) ओठ आणि जीभ कोरडी पडणे

ई) श्वासोच्छ्वास भरभर करणे

उ) त्वचा कोरडी पडणे आणि पाय गार पडणे.

लहान मुलांमध्ये डीहायड्रेशन झाल्यास त्यावर लवकर उपचार करणे आवश्‍यक असते अन्यथा त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. त्यामुळे मुलांमध्ये डीहायड्रेशनची लक्षणे दिसल्यास त्वरित तज्ञ डॉक्टरांना दाखवावे व आवश्यक औषधोपचार करावेत.

तर ही आहेत लहान मुलांमध्ये दिसून येणारी इन्फ्लुएन्झाची लक्षणे आणि त्यावर करता येण्याजोगे उपाय. या उपायांचा अवश्य वापर करा आणि आपल्या मुलांची काळजी घ्या. ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा लेख शेयर करायला विसरू नका.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय