बेलाच्या फळाचे औषधी फायदे आणि त्याचा वापर करण्याच्या पद्धती

‘बेल’ या वृक्षाचे भगवान शंकरांच्या भक्तीत अनन्यसाधारण असे महत्व आहे. जेवढे अध्यात्मिक दृष्टीने बेल महत्वाचे मानले जाते त्यापेक्षा आपल्याला माहीत नसलेले अनेक औषधी गुणधर्म बेलाच्या झाडाकडे आहेत. या झाडाची फळ व पाने यांची उपयुक्तता अतिशय मोठ्या स्वरूपाची असल्याने आयुर्वेदातही बेलाला उच्चप्रतीचा मान आहे

काय आहेत बेलाच्या फळाचे फायदे ते समजून घेण्याचा प्रयत्न करूया

१. बेलाचे फळ हे शरीरातील उष्णता नियंत्रित करण्याचे काम करते

२. रक्तातील शुद्धीकरण होण्यासाठी अतिशय गुणकारी आहे

३. मधुमेह व हृदयासंबंधी कार्य सुरळीत राहण्यासाठी लाभदायक

४. पोटाचे विकार उदा. गॅस्ट्रो, अतिसार यांसारखे त्रास कमी होण्यास मदत

५. पित्ताचा त्रास असेल तर बेलाचे नित्य सेवन करावे

६. ज्यांना वारंवार तोंड येण्याचा त्रास असेल त्यांनी बेलाचे फळ खाणे व पानांचा रस तोंडात फिरवणे यामुळे आराम मिळतो

७. सौंदर्य खुलवण्यासाठी बेलाचे सेवन करने लाभदायक ठरते. अकाली चेहऱ्यावर सुरकुत्या पडणे, अशक्तपणाचा परिणाम तुमच्या सौंदर्यावर होतो त्यासाठी बेलाचे सेवन गुणकारी ठरते

असे विविध फायदे बेलामुळे होतात. बेलाचे फळ हे शारीरिक दिलासा मिळण्यासाठी निश्चितच लाभदायक असते. अलीकडे बेलाचे वृक्ष काळानुसार व बदलत्या जीवनशैलीमुळे काहीसे कमी झाले आहेत. जंगली वृक्ष लागवड करण्याच्या प्रकाराने असे औषधी वृक्ष दुर्मिळ होत आहेत.

बेलाच्या फळात प्रोटीन, व्हिटॅमिन सी सारखे घटक शरीराला मिळतात. धावपळीच्या काळात शरीर थकते त्याचा परिणाम आपल्या दैनंदिन कामकाजावर होतो. यावेळी बेलाचे सेवन करने अधिक फायदेशीर असते.

कसे करू शकतो आपण बेलाचे सेवन

१. बेलाच्या पिकलेल्या फळाचे टणक आवरण फोडून त्याच्या आतील डिंकासारखा गर खाता येतो.

२. बेलाचे सरबत नियमित घेतले तर शरीर थंड राहण्यास मदत होते.

३. बेलाची चटणी करून नियमित आहारात त्याचा समावेश करता येतो.

४. बेलातील गर, बेलाचे पाने, कडुनिंबाचे पान यांच्या मिश्रणाच्या बारीक गोळ्या करून त्या सेवन केल्याने मधुमेह कमी करण्यासाठी लाभदायक ठरते.

५. आंघोळ करतांना बेलाची पाने व त्या पाण्यात बेलाचे फळ टाकून ते पाणी आंघोळीसाठी वापरले तर शरीराची दुर्गंधी कमी होण्यासाठी त्याचा फायदा होतो

६. चेहरा किंवा त्वचा उन्हाने भाजली असेल उदा. त्वचा लाल झाली असेल तर त्यावर बेलाच्या फळाचा गर लावणे किंवा बेलाची पाने लावणे यामुळे शरीर थंड होते

या प्रकारे विविध फायदे बेलाचे आहेत. वाढत्या भौतिक सुधारणांसाठी वारेमाप वृक्षतोड होत असल्याने यासारखी औषधी झाडे कमी होत चाललेली आहेत.

जिथे आपल्याकडे जागा उपलब्ध आहे त्या ठिकाणी बेल, कडुनिंब, कोरफड, आवळा, जांभूळ, आंबा, पेरू, चिकू अशी फळांची झाडे व औषधी रोपटे जोपासली जाणे अतिशय गरजेचे झालेले आहे. केमिकलयुक्त औषधोपचार घेण्याची वेळ आपल्यावर न येण्यासाठी घरघुती उपाय म्हणून या औषधी वनस्पतींचा वापर केला पाहिजे. फळ, फुल, पान याप्रमाने झाडाचे खोड आणि साल देखील गुणकारी असते.

धावपळीच्या जगात आपल्याला स्वतःकडे लक्ष देण्यासाठी वेळ मिळत नाही. यामुळे शरिराला पुरेसे संतुलित ठेवण्यासाठी आपण कमी पडतो. याचा दुष्परिणाम म्हणजे अनेक व्याधी व आजारांचे शिकार आपले शरीर होते. रोज दिवसभरात विविध माध्यमातून औषधी फळे सेवन केली गेली तर शरीर व्याधीमुक्त राहून कमी पडलेले घटक शरीराला याद्वारे मिळतात.

Manachetalks

लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजांचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी./ The information is not a substitute for professional medical advice, diagnosis, ortreatment.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय