आरोग्यासाठी लाभदायक मोदक कसे बनवावेत?

गणेशोत्सव हा आपल्या सर्वांच्या आनंदाचा उत्सव. लहानांपासून ते वृध्दांपर्यंत सर्वांचाच उत्साह शिगेला नेणारे हे दिवस.

श्री गणेशाची स्थापना झाल्या नंतर दहा दिवस आरती करणे, सजावट करणे, देखावे करणे यात हल्ली काहीसे बदल झाले आहे. श्री गणेशाची आराधना करताना जास्तीत जास्त आनंद कसा घ्यावा व त्यासोबत आपली प्रतिकारशक्ती देखील कशी वाढवावी यासाठी काही अनोखे उपक्रम करण्यास हरकत नाही.

त्यात मोदक हा सर्वांना आवडणारा पदार्थ. एका मोदकाने मन भरत नाही, त्यामुळे आपसूकच दुसरा उचलण्याची ईच्छा आपण पूर्ण करतो. हेच मोदक कोरोनाच्या काळात आपल्याला आरोग्यासाठी हितकारक ठरू शकतात ते कसे जाणून घेऊया…

मोदक – किसलेले खोबरे, साखर, विलायचीची पूड यांचे मिश्रण करून ते कणकेच्या छोट्या गोळ्या करून त्यात हे मिश्रण भरलेले असते. हे मोदक तळून घेतलेले असतात व आरती झाल्या नंतर सर्वांना प्रसाद म्हणून दिले जातात. (उकडीचे की तळलेले मोदक हा वाद बाजूला ठेऊन आपण बोलू😘)

आरोग्यासाठी लाभदायक मोदक कोणत्या पदार्थांचा वापर करून तयार करु शकतो

१. खोबरे व साखरेच्या मिश्रणात काजू, बदाम, किशमिश यांचा चुरा करून मोदक बनविताना त्यात वापरला तर हे मोदक अधिक पौष्टिक बनतात. खोबऱ्यामधील काही घटक हे हृदयाचे आरोग्य जापण्यास आणि रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.

२. पुरणाचे मोदक हे शरीराला ऊर्जा देणारे असतात. हरभरा डाळ उकडून घेऊन त्या डाळीला बारीक पिठाप्रमाणे करून घेणे. त्यानंतर गूळ, विलायची, बदाम, काजूपूड, बेदाणे यांचा वापर करुन त्या मिश्रणाचे कणकेच्या पिठात मोदक बनवून ते गावरान तुपामध्ये तळून घेतल्यास चविष्ट बनतात आणि आरोग्यासाठी अतिशय लाभदायक असतात

३. पारंपरिक उकडीचे मोदक आपण करतोच परंतु त्याच पद्धतिने भिजवलेल्या मटकीचेही मोदक केले जाऊ शकतात. मोड आलेली मटकी चवदार आणि शरीराला हितकारक असते.

असे विविध पदार्थांचे मोदक तयार करता येतात. खाण्यासाठी चवदार आणि पौष्टिक पदार्थांचा वापर करून मोदक तयार केले तर रोज विभिन्न घटक शरीराला मिळतात. प्रतिकारशक्ती चांगली असणे हे कुठल्याही आजारावर मात करण्यासाठी महत्वाचे असते. आपली शारीरिक सुदृढता जपण्यासाठी आयुर्वेदिक दृष्टीने महत्वाचे मानले जाणारे पदार्थ मोदक तयार करण्यासाठी वापरले जायला हवे.

कोणते पदार्थ वापरता येऊ शकतात.?

१. काजू

२. बदाम

३. किशमिश

४. मनुके

५. खारीक – खोबरे

६. मेथी

७. तुळसीचे पाने

८. पनीर

९. विविध फळे

१०. विलायची

११. अंजीर

१२. पुरण

असे अनेक पदार्थ वापरून मोदक तयार करून आपले व आपल्या कुटूंबियांच्या आरोग्यासाठी हा गणेशोत्सव आरोग्यदायी होण्यासाठी खारीचा वाटा आपण उचलू शकतो.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय