अपघात होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी आणि झाला तर तत्काळ काय करावे?

अपघात हे अचानक ओढवलेले अनैच्छिक संकट असते. प्रवास करतांना आपला अपघात घडावा अशी कुणाचीही अपेक्षा स्वाभाविक नसणारच. बहुतेकवेळी वाहन चालविताना आपली चूक नसतांनाही दुसऱ्या कुणाच्या चुकीचे आपण शिकार ठरतो. सुरक्षित वाहन चालविण्याचे नियम न जपल्याने दुसऱ्या कुणावर संकट आपल्यामुळे का यावे याचा विचार करून वाहन चालविले पाहिजे.

का होतात अपघात ?

१. पुरेशी झोप झालेली नसतांना वाहन चालविणे

२. वाहनात बिघाड असल्यास अपघात होतात

३. मद्यपान करून वाहन चालविणे

४. समोरून येणाऱ्या वाहनाशी हुज्जत घालत वाहन चालविणे

५. मानसिक ताणतणाव असल्यास दुर्लक्षित प्रकारे वाहन चालविणे

६. रस्ता व्यवस्थित नसल्यास खड्डे हुकवण्याच्या नादात इतरांना धक्का लागणे अथवा आपल्या वाहनाला इतरांकडून अपघात घडणे

७. दंगामस्ती करत वाहन चालविणे

८. शिकावू वाहन चालकाने महामार्गावर अथवा रहदारीच्या ठिकाणी वाहन चालविणे

९. वाहन चालविण्यासाठी रस्त्याच्या कडेला असणारी सांकेतिक चिन्हे समजून न घेणे उदा. समोर धोक्याचे वळण आहे वाहन सावकाश चालवा, समोर चौफुली आहे, पुढे पूल आहे आदि.

१०. शहरात सिग्नलचे नियम न पाळल्यामुळे अपघात होतात

११. नियंत्रित गतीपेक्षा अधिक वेगाने वाहन चालविणे

वाहन चालविताना काळजी काय घ्यावी ?

१. चालकाने वाहन हातळतांनाचे नियम समजून घेऊनच वाहन चालवावे

२. मद्यपान करून वाहन चालवू नये

३. दुसरच्या प्रवासाआधी पुरेशी झोप घ्यावी

४. समोरून येणाऱ्या वाहनावरील लक्ष विचतील न होऊ देता वाहन चालवावे

५. आरशात मागील वाहनाचा अंदाज घेऊन वाहन चालवावे

६. मर्यादित वेग पाळावा

७. अतिघाईने वाहन चालवू नये

८. शारीरिक किंवा मानसिक अस्थिर असल्यास शक्यतो प्रवास/वाहन चालवणे टाळावे

चुकून अपघात घडल्यास काय करावे

१. वाहनातून बाहेर पडावे

२. जखम झाली असल्यास कपड्याने ती जखम झाकून घ्यावी

३. अपघात घडताच आजूबाजूच्या वाहनांना थांबवण्याचा प्रयत्न करावा

४. गंभीर इजा झालेली असेल तर जास्त घाबरून न जाता स्वतःला धीर द्यावा

५. आपल्या मोबाइलमध्ये सुरुवातीलाच काही जवळचे मोबाईल नंबर जवळचे मित्र, नातेवाईक, कुटूंबीय यांचे संग्रहित असावे ज्यामुळे अपघात झाल्यास त्यांना संपर्क करून पुढील मदत मिळविणे शक्य होते, अपघात घडल्यास तात्काळ जवळच्या कुणाला तरी फोन करावा अथवा आपत्कालीन नंबर १०० (पोलीस), १०२ (रुग्णवाहिका), ११२ (राष्ट्रीय आपत्कालीन क्रमांक), १०१ (अग्निशमन), १०८ (आपत्ती नियंत्रण पथक) पैकी कोणत्याही क्रमांकावर संपर्क करून मदत घ्यावी

६. अपघात करून जाणारे वाहन थांबविण्यासाठी मदत मागावी किंवा त्या वाहनाचा नंबर तातडीने बघून घ्यावा

काय आहेत अपघात न होण्यासाठी सुरक्षित उपाय ?

१. सीट- बेल्ट लावणे

२. प्रवासापूर्वी वाहनाची टायरची हवा बघून घेणे

३. वाहनाचे लाईट आणि ब्रेक यांची चाचपणी करून प्रवास सुरु करणे

४. एअर बॅग नादुरुस्त असतील तर वेळीच दुरुस्ती करून घेणे

५. निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त प्रवाशांनी गाडीतून प्रवास न करणे

अपघात झाल्यास तात्काळ कोणते निर्णय घ्यावे ?

१. जवळच्या वैद्यकीय केंद्रावर उपचार घेणे

२. जखम किरकोळ असेल तरीही धनुर्वाताचे लसीकरण करून घेणे

३. डोक्याला मार लागला असेल तर कुठलीही रिस्क न घेता योग्य तपासणी केल्याशिवाय पुढील प्रवास करू नये

जेव्हा आपण प्रवास करतो त्यावेळी आपल्यासह कुटूंबियांच्या सुरक्षिततेची काळजी घेणे खूप महत्वाचे असते. सुरक्षित वाहन चालविणे ही एक कला आहे त्यासाठी योग्य प्रशिक्षण करून घेतल्यास ही कला साध्य करता येते. मोकळ्या मैदानात वारंवार वाहन चालविण्याचा सराव करून योग्य त्या नियमांचे पालन केल्यास अपघातरहित वाहन चालविन्याचे कौशल्य जोपासता येते.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय