थकवा दूर करण्यासाठी काय खाल्ले पाहिजे, वाचा या लेखात

थकवा दूर करण्यासाठी काय खाल्ले पाहिजे

“हुश्श! दमलो बुवा आज!”

“आजच्या कामाचा रगाडा विचारू नकोस बाई! थकून गेलेय अगदीच!”

अशी वाक्य आपल्याला अवतीभवती ऐकायला मिळतात. कधी कधी आपण ही असं म्हणत असतो.

पण हे कधी कधीच ठीक आहे बरं का! रोज रोज असं दमल्यासारखं वाटणं ही तर धोक्याची घंटा आहे.

तसं पहायला गेलं तर आजच्या धावपळीच्या युगात दिवसभराच्या कामानंतर संध्याकाळी खूप गळून गेल्यासारखं वाटणं सर्रास पहायला मिळतं. स्त्रिया आणि पुरुष दोघेही दमतात थकतात. मात्र स्त्रियांमध्ये हे प्रमाण जास्त असल्याचं आढळून आल़ं आहे.

दिवसभराच्या कामकाजामुळे आता शरीरात काही काम करण्याचं त्राणच उरत नाही, असा अनुभव घेतला आहे का?

का बरं होत असावं असं?

या थकव्यामागे नेमकं कारण तरी काय असतं?

१) सतत काळजी करणं

२) दुःखाला कवटाळून बसणं.

३) कामाचा मानसिक ताण.

४) व्यसन, कँफिनचं प्रमाणाबाहेर सेवन.

६) खूप शारीरिक हालचाली.

७) अजिबात हालचाल न करणं.

८) अपुरी झोप

९) सत्व नसलेल्या पदार्थांचं सेवन

या गोष्टी थकव्याला पूरक ठरू शकतात.

कँन्सर, थायरॉईड, ह्रदयरोग, स्थूलपणा, मधुमेह अशा रोगांमुळेही थकवा येऊ शकतो.

बौद्धिक कामानंतर किंवा अती शारीरिक कामानंतर थकवा येतोच. मरगळ, काही नवीन करण्याची ईच्छा नसणे, सतत झोप येणं, कामात मन न रमणं, सतत भुकेची जाणीव, डोकं दुखणं, चिडचिड होणं, कुठल्याही कामासाठी उत्साह नसणं ही थकव्याची प्रमुख लक्षणं आहेत.

यातल्या काही लक्षणांचा तुम्ही ही सामना केला असेल. पण मग याला काही उपाय आहे की नाही ?

कि त्यासाठी डॉक्टरांकडे जाऊन कडूजार औषधांचा डोस घेतला पाहिजे?

थांबा! इतके गोंधळून जाऊ नका नका होऊ.

आज आम्ही आपल्याला आपल्या आहारात सहज समावेश करता येतील अशा पदार्थांविषयी सांगणार आहोत.

अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही हा आहार घेऊन थकव्याला लांब ठेऊ शकता.

१) शेंगवर्णीय भाज्या – थकवा दूर ठेवण्यासाठी आपण आपल्या आहारात शेंगावर्गीय भाज्यांचा म्हणजे बीन्सचा समावेश केला पाहिजे.

यातून शरीराला उत्तम प्रकारे पोषण मूल्य मिळू शकतं. या बीन्सचे इतके फायदे आहेत की त्यावर आपला विश्वास बसणार नाही. फाइबर, कार्बोहाइड्रेट आणि प्रोटीनचा उत्तम स्त्रोत म्हणून आपण याकडे डोळसपणे पहायला हवं.

पोटेशियम, मैग्नीशियम, फॉस्फोरस, तांबे लौह या खनिजांची भरपूर मात्रा बीन्स मध्ये असते ज्यामुळे भरपूर उर्जा कायमस्वरूपी शरीराला मिळते आणि थकवा दूर पळून जातो.

दिवसभरात जेवणाच्या वेगवेगळ्या प्रकारात बीन्सचे विविध प्रकार आपण समाविष्ट करू शकतो.

जसं की नाश्त्यासाठी उकडलेले सोयाबीन, दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणासाठी ब्लॅक बीन सँलेड किंवा सूप घेऊ शकता.

रोजच्या चपातीचे पीठ दळताना त्यात सोयाबीन भाजुन मिक्स केलं तर संपूर्ण परीवाराच्या आरोग्यासाठी लाभदायक ठरू शकतं

२) शिमला मिरची किंवा ढोबळी मिरची – थकवा दूर ठेवण्यासाठी सहज उपलब्ध असणारा पदार्थ म्हणजे लाल सिमला मिर्ची, हिरवी ढबु मिर्ची आपण ब-याच वेळा वापरतो. पण लाल ढबु मिरचीचे फायदे खूप आहेत.

यात मुबलक प्रमाणात विटँमिन असतं. यातील अँटीऑक्सीडंट प्रतिकार शक्त वाढवण्याबरोबरच ताण निर्माण करणारे हार्मोन्स कोर्टिसॉल कमी करायला मदत करतात ज्यामुळे थकवा दूर रहायला मदत होते.

व्हिटॅमिन सी adrenal प्रणाली साठी महत्त्वाचं ठरतं ज्यामुळे शारीरिक आणि मानसिक ताणाचा प्रभाव कमी होऊ शकतो. व्हिटॅमिन ‘सी’ च्या कमतरतेमुळे थकवा जाणवू शकतो. लाल ढबु मिरचीत आपल्याला व्हिटॅमिन ए, बी-6 आणि व्हिटॅमिन-सी तसेच फॉलीक अँसिड आणि फायबर मोठ्या प्रमाणात मिळतात.

मानसिक तणावाला Bye Bye करण्यासाठी लाल ढबुचा आहारात वापर एक उत्तम पर्याय ठरू शकतो.

लाल ढबु मिरचीचा एक कप रस दररोज घेतला तर एनर्जी लेव्हल वाढल्याचा अनुभव तुम्हाला येईल. कच्च्या लाल ढबु, लाल ढबुची भाजी, भरलेला लाल ढबु अशा कोणत्याही प्रकारे लाल ढबुचा आपण रोजच्या आहारात समावेश करू शकतो.

३) पालक – थकवा दूर ठेवण्यासाठी आणखी एक प्रभावी पर्याय म्हणजे पालक.

सहज उपलब्ध असणारा पालक खूप फायदेशीर आहे. लोह युक्त पालक रक्ताच्या कमतरतेवर उपाय म्हणून सुचवला जातो.

रक्तकोशीकांना ऑक्सिजन पुरवण्याचं काम पालकातील लोहतत्व करत असतं. यामुळे शरीराला उर्जेचा पुरवठा होतो.

मैग्नीशियम, पोटेशियम आणि व्हिटॅमिन सी आणि बी मुळे चयापचय योग्य पद्धतीने होतं. पालकाचं सूप आपण सहज घरी तयार करू शकतो. सँडविच मध्ये कच्च्या पालकाचा वापर करू शकतो किंवा पालक रस एक ग्लास नियमित घेऊ शकतो.

थकव्याला प्रतिकार करण्यासाठी पालक एक हेल्दी पर्याय आहे.

 ४) थकवा दूर ठेवण्यासाठी दररोज खा केळी – पटकन वजन वाढविण्यासाठी केळ्याचा उपयोग केला जातो. ज्या घरात नियमित फळांचा वापर आहारात केला जातो तिथे केळी आवर्जून असतात.

तुम्हांला माहिती आहे का या केळ्यामुळे सुद्धा थकवा दूर होतो

यामध्ये पोटँशियम असत़, याचा उपयोग शरीरातील शर्करा उर्जेत रुपांतरीत करण्यासाठी होतो.

व्हिटॅमिन ‘बी’ व्हिटॅमिन ‘सी’ ओमेगा 3 फँटी अँसिड ओमेगा 6 फँटी अँसिड फायबर कार्बोहाइड्रेट्स हे देखील केळ्यात असतात. ज्यामुळे थकव्याबरोबरच डिहाइड्रेशन आणि अशक्तपणा ही कमी होतो.

केळयात असणारी नैसर्गिक साखर सुक्रोज, फ्रक्टोज और ग्लूकोज इन्स्टंट एनर्जी देतात.

दररोज एक किंवा दोन केळींचा आहारात समावेश केला तर थकवा दूर होईलच पण शरीर हाइड्रेट आणि एनर्जेटिक राहील. अशक्तपणा ही कमी व्हायला मदत होईल

५) थकव्याला रामराम ठोकण्यासाठी तुम्ही ग्रीन टी वापरू शकता – थकव्यामागे मानसिक अशांतता , ताणतणाव यांचा मोठा वाटा असतो. ग्रीन टी मध्ये पॉलीफिनॉल्स असतात जे मानसिक ताण कमी करण्यात आपली मदत करता, एनर्जीला बूस्ट करतात शिवाय एकाग्रता वाढायला मदत करतात.

‘ग्रीन टी’ मधील घटक मेटाबॉलिज्म वाढवायला मदत करतात आणि थकव्यामुळे जे नुकसान होतं ते थांबवायला हातभार लावतात.

आरोग्यासाठी उपयुक्त ग्रीन टी करायची पद्धत आपण जाणून घेऊया

गरम पाण्यात ग्रीन टीचे दाणे टाकून ठेवा पाच मिनिटांनी गाळून घ्या त्यात थोडा मध घालून प्या अशा पद्धतीने तयार केलेला ग्रीन टी दिवसातून 2/3 दा घेऊ शकता. यात साखरेऐवजी मध मिसळणं फायदेशीर ठरतं

६) थकवा दूर ठेवण्यासाठी भोपळा करेल तुम्हाला मदत – भोपळ्याच्या बिया हाय क्वॉलिटी प्रोटीनयुक्त असतात. यात हेल्दी ओमेगा -3 फैटी एसिड आणि व्हिटॅमिन बी 1, बी 2, बी 5 और बी -6, बरोबर मैंगनीज, मैग्नीशियम, फॉस्फोरस, लोह आणि तांबे या खनिजांचा भरपूर समावेश असतो.

ही सगळी पौष्टिक तत्व एकत्र येऊन प्रतिकार शक्ती सशक्त करतात. एनर्जी लेवल वाढायला मदत करतात, अशक्तपणा आणि थकवा दूर करतात.

भोपळ्याच्या बियांतील ट्रायप्टोफैन मानसिक थकव्याशी लढाई करतं आणि आपल्याला उत्तम झोप प्रदान करतं.

रोज मूठभर भोपळ्याच्या बिया इंस्टंट एनर्जीसाठी उत्तम पर्याय ठरतात.

भाजलेल्या बिया नाश्त्याला घ्यायला हरकत नाहीत किंवा याचं बटर वापरलं तर ते ही मेटाबॉलिज्म वाढवायला मदत करतं

७) थकवा घालवण्यासाठी ओटमीलचा करा वापर – ओटमील थकव्यासाठी प्रभावी आहे उच्च प्रतीच्या कार्बोहाइड्रेट्स ग्लायकोजेनच्या रुपात शरीरात जमा होतात, मेंदूला आणि पेशींना दिवसभराची ताकद आणि एनर्जी बहाल करतात.

ओटमीलमध्ये प्रोटीन, मैग्नेशियम, फॉस्फोरस और विटामिन बी-1 ही पोषक तत्वं असतात. ज्यामुळे एनर्जी लेव्हल वाढायला मदतच होते.

ओटमीलमधल्या उच्च प्रतीच्या फायबर मुळे पचनशक्तीसाठी हे सुपरफुड मानलं जातं.

मधुमेही व्यक्तींना तर ओटमील हे वरदान आहे. कारण ओटमीलमुळे ब्लड शुगर लेव्हल नॉर्मल रहायला मदत होते.

नाश्त्याला एक वाटीभर ओटमील, ताजी फळं आणि सुकामेवा घालून घेतलं तर दिवसभर ताकद मिळत रहाते

८) दिवसभर ताजेतवाने रहाण्यासाठी सेवन करा दही – दह्यात असणारे प्रोटीन, कार्बोहाइड्रेट आणि हेल्दी प्रो-बायोटिक्स थकव्याशी आणि अशक्तपणाशी लढायला मदत करतात. कुठल्याही आहारापेक्षा दह्यावर शरीर पटकन प्रक्रिया करु शकतं म्हणून याला एनर्जीचा इंस्टंट सोर्स मानतात.

आरोग्यासाठी उत्तम ठरणारं दही पचन सुधारायला ही मदत करते.

रोजच्या रोज एक कप फँट फ्री दही आपल्याला तंदुरुस्त ठेवतं आणि स्फुर्ती देतो.

९) थकवा पळवून लावण्यासाठी खा कलिंगड – उन्हाळ्याच्या दिवसात थकव्याचं प्रमुख कारण डिहाइड्रेशन असतं. यामुळे थकवा वाढतोच पण सुस्ती पण येते.

यावर कलिंगड एक बेस्ट उपाय ठरू शकतो .

कलिंगडात पाण्याचं प्रमाण जास्त असतं, जे डिहाइड्रेशन दूर करून शरीराला अँक्टीव्ह करतं.

अशक्तपणा आणि थकव्याला दूर करण्यासाठी पोटेशियम, व्हिटॅमिन सी, लाइकोपन, बीटा कैरोटिन आणि आयर्न सारखे पोषक तत्वं कलिंगडात असतात.

फोडी करून कलिंगड खाऊ शकतोच पण हेल्दी ड्रिंक म्हणून कलिंगडाचा रस आपण पिऊ शकतो.

कलिंगडाच्या रसामध्ये, लिंबाच्या रसासह मधाचा वापर केला तर एक उत्तम एनर्जी ड्रिंक तयार होतं. उन्हाळ्यात वर्क आऊट नंतरच्या थकव्यावरचा हा रामबाण उपाय ठरू शकतो.

ही माहिती जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोचवण्यासाठी हा लेख शेअर करायला विसरू नका.

रुटीनचा कंटाळा आलाय, या २५ आयडिया तुमचा कंटाळा घालवतील!!

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.