स्निग्ध पदार्थ म्हणून दूध हे सर्वांना माहीत आहे. दूध हे जेवढे शारीरिक सुदृढतेसाठी पौष्टिक आहे, तितकेच ते शरीराच्या त्वचा सौंदर्यासाठी लाभदायक आहे.
एका ठराविक वेळेनंतर किंवा काही नैसर्गिक, रासायनिक प्रक्रिया करून दुधाचे दह्यात रूपांतर होते. कॅल्शियम, प्रोटीन, व्हिटॅमिन डी या सारखे महत्त्वाचे घटक दह्यातून मिळतात. जेवणात दही घेतले तर त्याचा पाचन संस्थेवर गुणकारी परिणाम होतो व अन्नपचन व्यवस्थित होते. याच बरोबर त्वचा चमकदार होण्यासाठी आणि त्वचेला फायदेशीर असणारे घटकद्रव्य हे दह्यातून मिळतात.
मानवी त्वचा ही संवेदनशील असते. वातावरण, आघात यांचा परिणाम त्वचेवर तात्काळ होतो. अतिशय मुलायम त्वचा असवी यासाठी अनेक साबण व सौंदर्य पूरक साधने वापरली जातात. मोठा खर्च सर्वजण आपल्या शरीराची निगा राखण्यासाठी करतात. अनेक संशोधकांनी दही हे सर्वात जास्त फायदा त्वचेला कसा करून देते यावर आपला अभ्यास जगासमोर ठेवला आहे व तसे यशस्वी प्रयोग प्रात्यक्षिके सिद्ध करून दाखवले आहेत.
केव्हा त्वचेला काळजी घेण्याची गरज असते ?
१. उन्हात गेल्यानंतर
२. अतीशय उष्ण कामाच्या ठिकाणी उदा. गरम लोखंडाच्या कामाच्या ठिकाणी, वेल्डिंग कामाच्या ठिकाणी अथवा गॅस जवळ अधिक काळ काम करताना.
३. आद्रतेच्या ठिकाणी उदा. बर्फाळ प्रदेश, पाण्यात काम करणे इत्यादी.
४. अवजड आणि शरीराला इजा होईल अशा ठिकाणी काम करताना
५. दीर्घकाळ अंतराळ प्रवास करताना
६. घराबाहेर पडल्या नंतर धुळीपासून काळजी घ्यावी
अशा अनेक परिस्थितीत त्वचेवर प्रतिकुल किंवा अनुकूल असे दोनही प्रकारचे परिणाम होतात. दह्यात लॅक्टिक ऍसिड असल्याने त्याचा त्वचा चमकदार करण्यासाठी फायदा होतो.
दही त्वचेला काय फायदा देते ?
१. चेहऱ्यावरील सुरकुत्या घालवते
२. चेहऱ्याला एकसारखा रंग देते
३. चेहऱ्यावर तजेला येण्यासाठी दही गुणकारी आहे
४. दह्याच्या वापराने डोळ्यांखालील काली वर्तुळे जाण्यास मदत होते
५. पुरळ, डाग घालवण्यासाठी दही लाभदायक आहे
६. त्वचा मुलायम करते
असे विविध लाभ दह्याचे आहेत. मात्र दही कसे वापरायचे हे देखील समजून घेणे गरजेचे आहे.
१. दही व हळद यांचे मिश्रण – दही आणि हळद हे एकत्रित करून त्या मिश्रणाने त्वचेवर लेपन करून मालिश केल्यास त्वचा उजळून निघते
२. दही व लिंबू – लिंबाचा रस दह्यात टाकून त्याचे मिश्रण चांगले घोटून घेऊन ते चेहऱ्यावर आणि हात, पाय यांना लावल्यास त्वचेवर धूळ, चिवट मळ यामुळे होणारी त्वचेची हानी थांबते. शरीरावर असलेले बारीक – बारीक छिद्रे धुळीने बंदीस्त झाल्याने त्वचेला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही व स्वच्छता राखली जात नाही. या दृष्टीने हे मिश्रण गुणकारी ठरते. डाग आणि चट्टे यावर हे मिश्रण लावणे गुणकारी आहे.
३. दही आणि मध – दही व मधाचे समप्रमाणात मिश्रण करून ते त्वचेवर आणि चेहऱ्यावर लावल्यास चमक वाढवते. त्वचा मुलायम होण्यास मदत होते.
४. बटाटा आणि दही – कच्चे बटाटे बारीक करून घेऊन दही व बटाट्याची पेस्ट एकत्र केल्याने ते मिश्रण त्वचेचा काळपटपना कमी करण्यासाठी लाभदायक ठरते. उजळ त्वचेसाठी हे मिश्रण चेहऱ्यावर लावून काही वेळाने थंड पाण्याने चेहरा धुतला की त्वचेला ताजेपणा निर्माण होतो.
५. दही व बेसन – उष्णतेमुळे त्वचा टॅन झालेली असताना दही आणि बेसन यांचे मिश्रण लावल्यास त्वचा उजळायला मदत होते.
६. दही व चंदन पावडर – चंदन हे शीतल असते. दही हे देखील थंड गुणधर्माचे असते त्यामुळे उन्हाळ्यात अधून मधून चेहरा खराब होऊ नये यासाठी चंदन पावडर आणि दही यांचे मिश्रण एक तास चेहऱ्यावर लावले तर चेहरा उष्णतेमुळे खराब होत नाही.
७. कोरफड व दही – कोरफड ही अतिशय गुणकारी वनस्पती आहे. त्वचेला व केसांना मुलायम करण्यासाठी आणि डाग, चट्टे, काळपटपणा घालवण्यासाठी उपयुक्त आहे. दही व कोरफडीचा गर यांचे मिश्रण केल्यास ते केसांना व चेहऱ्याला वापरता येते. या वापराने चेहऱ्यात फरक जाणवून थकवा, निस्तेजपणा कमी होऊन चेहरा ताजातवाना दिसतो. केसांना वापर केल्यास केसांचे मूळ घट्ट होऊन केस गळणे थांबून कोंडा, केस अकाली पांढरे होणे यापासून बचाव होतो.
असे विविध प्रकरचे मिश्रण चेहरा खुलवण्यासाठी लाभदायक असते. त्यामुळे दही हे केवळ आहारातच गुणकारी नाही तर त्याचे सौंदर्यासाठी देखील भरपूर लाभ आहेत.
रोज दही खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहीत आहेत का?
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
अतिशय सुंदर आणि महत्वपूर्ण लेख असतात, पूर्ण टीमचे अभिनंदन
#मनाचेTalks च्या लेखांचे अपडेट्स मोफत मिळवण्यासाठी 👇व्हाट्सएप तसेच टेलिग्राम चॅनलला जॉईन होता येईल.
सर्व लेख नियमितपणे पोहोचण्यासाठी मनाचेTalks चा व्हाट्सएप नंबर, 8308247480 तुमच्या डिव्हाईस मध्ये सेव्ह असू द्या.
तसेच सबस्क्रिप्शन थांबवायचे असल्यास, जॉईन केलेला ग्रुप अथवा चॅनल ‘लिव्ह’ करून द्यावा.
त्याचबरोबर मनाचेTalks च्या सर्व पोस्ट न चुकता फेसबुकच्या न्यूज फीड मध्ये दिसण्यासाठी पोस्टच्या वरच्या उजव्या कोपऱ्यावर असलेल्या तीन डॉट्स वर दाबून ‘Add मनाचेTalks to Favourites’ यावर क्लिक करा…
व्हाट्स ऍप इन्व्हाईट लिंक.👇
https://chat.whatsapp.com/LTv393KE2TSL0Yu4usFmpZ
टेलिग्राम चॅनल👇
https://t.me/manachetalksdotcom