मनातली प्रत्येक इच्छा कशी पुर्ण करायची?

तुमच्या मनातल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी हा मंत्र म्हणा, हा तावीज बांधा, अमुक-अमुक पूजा करा असं काही आम्ही तुम्हाला सांगणार नाही. या लेखात दिलेल्या आठ गोष्टींकडे जेव्हा तुम्ही जाणीवपूर्वक लक्ष द्यायला सुरुवात कराल, तेव्हा आपल्या इच्छा आपणच कशा पूर्ण करू शकतो, याचा अनुभव तुम्हाला यायला लागेल.

आयुष्यातली कोणती गोष्ट तुम्हांला आणखी चांगल्या पद्धतीने हवी आहे, करीयर मध्ये असा कोणता मैलाचा दगड आहे जिथे तुम्हाला पोचायचं आहे. जीवनाचं कोणतं गुलाबी वळण हळुवार पार करायचं आहे अशी कोणती कला तुम्हाला शिकायची आहे ज्यामुळे तुमच्या आयुष्याला अर्थ लाभेल असा एखादा क्षण जिथे तुम्हांला तुमची छाप सोडायची आहे. हे चित्र मनात स्पष्ट असेल तर अर्धी लढाई तर इथेच जिंकाल. कारण कोणत्या गावाला जायचं आहे हे तुम्हांला नेमकं माहिती आहे. आता फक्त प्रवासाचं नियोजन करायचं आहे.

इच्छापुर्ती साठी ध्येय निश्चिती गरजेची का आहे?

मी दहावीला असतानाच्या आमच्या बाई, आजही माझ्या संपर्कात आहेत. त्यांनी मला एकदा सांगितलं कि, शाळेत दहावीच्या निरोप समारंभात त्यांनी मुलांना शुभेच्छा देताना विचारलं होतं कि, किती जणांनी आपल्या आयुष्यात आपण कोण होणार आहोत हे ठरवलं आहे? तेव्हा अगदी मोजक्या मुलांनी हात वर केले. आणि गेल्या वर्षी आमच्या बॅचचं जे रियुनियन झालं होतं, त्यात आम्ही आमच्या बाईंना पण बोलावलं. तेव्हा बाईंना हे जाणवलं कि, हीच मुलं आज त्यांच्या ध्येयाच्या आसपास पोहोचलेली आहेत. इतकंच नाही तर आर्थिकदृष्ट्या खूप चांगल्या पद्धतीने स्थिरावलेली सुद्धा आहेत.

Banner

आपण निश्चित केलेलं ध्येय आपल्यासमोर आपल्या भावी आयुष्याचं चित्र उभं करतात. या चित्रासारखं आयुष्य जगण्यासाठी आपण मग प्रयत्नांच्या मागे लागतो. आपल्या आयुष्याला योग्य आकार देण्यासाठी झटतो.

मोठ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आधी या छोट्या छोट्या ८ गोष्टींकडे लक्ष द्या

1) मुलभूत गरजा पुर्ण करा

अन्न, वस्त्र, निवारा या तर आपल्या मुलभूत गरजा आहेत हे आपण शाळेतच शिकतो. त्याचबरोबर मैत्री, प्रेम, आरोग्य, समृद्धी या गोष्टी सुद्धा सामाजिक जीवनात महत्त्वाच्या ठरतात. या गोष्टी जेंव्हा सुरळीत सुरु असतात तेंव्हा आकाशाला गवसणी घालायची आपली ताकद असते. मात्र एखादी गोष्ट जरी बिनसली तरी मग माणूस दुःखाच्या भोव-यात गटांगळ्या खायला लागतो. चिंतेचे काळे ढग दाटून येतात.

हे दुष्टचक्र भेदण्यासाठी, आयुष्यात हवं ते सगळे मिळवण्यासाठी बेसिक गरजा पूर्ण करून रुळावरून घसरलेली गाडी पुन्हा रूळावर येणं गरजेचे आहे हे लक्षात घ्या. चांगल्या लोकांशी मैत्री करा. आत्मविश्वासाने आयुष्याला सामोरे जा. स्वतःच्या तत्वांवर विश्वास ठेवा. आदर्श जीवनशैलीला फॉलो करा. आरोग्याकडे लक्ष दया. स्वतः ला वेळ दया. स्वतः ला इतकं सक्षम बनवा की गरूड भरारी घेण्याची ताकद तुमच्या पंखात येईल.

2) चांगल्या सवयी लावून घ्या.

आतापर्यंत आपल्या लक्षात आलंच असेल यश-अपयश हे आपणच आपल्या आयुष्यात खेचून आणलेल असतं. माणसाच्या सवयी ह्या मानवी जीवनाचा अविभाज्य घटक असतात. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी वाईट सवयींवर मात करून चांगल्या सवयी अंगी बाळगणे ही काळाची गरज बनली आहे. ज्याने तुम्हाला तुमच्या इच्छा पूर्ण करणे सोपे जाईल.

3) कृतज्ञ व्हा

कृतज्ञता ही आणखी एक महत्त्वाची सवय आपल्या आसपासच्या ज्ञात अज्ञात सजीव निर्जीव वस्तुंप्रती कृतज्ञता व्यक्त करावी. ही कृती तुमची मानसिकता निश्चित बदलेल. कृतज्ञ राहण्याच्या सवयीने तुमचा आत्मविश्वास वाढेल.

4) ध्येयावर लक्ष केंद्रीत करा.

कोणतीही महत्वाची जबाबदारी पार पाडण्यासाठी आपण नेहमीच चांगला आराखडा अर्थात ‘प्लान’ बनवतो. मग आयुष्याच्या ध्येयप्राप्तीसाठी आपण प्लान करतो का?

उद्यमेन हि सिध्यंती कार्याणी न मनोरथै: |

न हि सुप्तस्य सिंहस्य प्रविश्यंती मुखे मृग:||

या संस्कृत सुभाषितचा अर्थ असा आहे की, कोणतेही काम, ध्येय हे प्रयत्न केल्याशिवाय मिळत नाही.

अहो, जंगलाच्या राजाला, सिंहाला सुद्धा हरणाची शिकार करण्यासाठी पळावे लागते. नुसत्या बसून राहिलेल्या सिंहाला आयती शिकार कशी मिळेल? बरोबर की नाही….

कोणतेही काम करायचे तर कष्ट तर हवेतच. पण त्यासाठी पाहिल्यांदा आयुष्यात काहीतरी चांगलं ध्येय ठरवलं पाहिजे. ठरवलेलं ध्येय पूर्ण करण्यासाठी झटून कामाला लागलं पाहिजे.

5) लिहिते व्हा

तुमची ध्येयं स्वप्न, अपेक्षित बदल हाताने लिहुन काढा, कॉम्पुटर किंवा मोबाईल न वापरता हाताने लिहा. लिहीताना बघा जे शब्द तुम्ही लिहीता ते मनात उमटत असतात. त्यांची स्पंदन सबकॉन्शस मनान घट्ट रुतून बसतात. जाणीव नेणीवेच्या पातळीवर हे शब्द जादू करतात. मेंदूला तशा सूचना पाठवतात आणि लवकरच तुमच्या आजूबाजूची परिस्थिती सुधारल्याचे तुम्हाला जाणवू शकेल.

कुठल्याही गोष्टीत पट्कन समाधानी झालात तर प्रगती थांबते. आयुष्यात थोडा ताण आवश्यक आहेच. वेगवेगळ्या उपकरणात स्प्रिंगला असलेली ताणच ते उपकरण उत्तम रीतीने चालवू शकतात, काहीतरी खंत कोणती तरी अपुर्णता आपल्याला आयुष्याचं, समीकरण सोडवायला उद्युक्त करु शकतात.

6) ‘का’? विचारा स्वतःला

आपल्या आयुष्यात बदल हवेत हे मान्य. पण का हवेत हे बदल? याचं उत्तर मिळालं की अनेक गोष्टी नितळ पाण्यासारख्या स्वच्छ दिसायला लागतात. तुम्हाला एखादा बदल ‘का’ हवा? याचं उत्तर जेव्हा तुमच्या मनात क्लियर झालेले असेल, तेव्हा तो बदल करण्याचा मार्ग आपोआपच तुम्हाला दिसायला लागेल.

आयुष्यामध्ये प्रगती हवी आहे. पण या प्रगतीमुळे काय बदल घडतील हे जेंव्हा आपल्या लक्षात येईल तेंव्हा मनापासून हे बदल स्वीकारायला आपण तयार होतो. आपली पूर्ण ऊर्जा आपल्या ध्येयावर केद्रींत होते.

7) ठाम निश्चय महत्वाचा

ध्येय निश्चित केलं, प्रयत्न चालू केले. इथपर्यंत अनेकजण पोचतात. पण पुढे अडचणी येऊ लागल्या कि, मग मात्र गर्भगळित होतात. ‘हे केल्याने अशी काय जादू घडणार?’ ही शंका त्यांच्या मनाला चाटून जाते. किंवा पुढे काय करायचे हे मला कळतच नाही ही त्यांची अवस्था होते.

पण लक्षात ठेवा, तुमचा दृढ विश्वास आणि ठामनिश्चय अशक्यप्राय गोष्टी शक्य करतील. त्यासाठी तुमच्याकडे संयम मात्र हवा.

8) सराव करा पुन्हा पुन्हा

झोपेत एखादं स्वप्न आपल्याला पडतं. जाग आल्यावर आपल्याला ते लख्ख आठवतं. आपण म्हणतो दिवसभर त्याच गोष्टींचा विचार केला होता ना, म्हणून हे स्वप्न पडलं. आयुष्यात यश मिळवायचे असेल, सध्याची परिस्थिती बदलायची आज तर पुन्हा पुन्हा आपले ध्येय नजरेसमोर राहील यांची खात्री करा

कुठल्याही क्षेत्रातील व्यक्ती टॉपवर पोचते तेव्हा त्यामागे अफाट रियाज असतो. पुन्हा पुन्हा केलेला सराव असतो. मग जीवन बदलण्यासाठी विश्वाकडे एकदाच मागणी करून कसे भागेल? हलवून खुंटा बळकट केला जातो तसं पुन्हा पुन्हा या गोष्टी स्वतः ला सांगत रहा.

कसदार पीक येण्यासाठी वाट पहावी लागते तसा चांगला बदल घडण्यासाठी थोडा काळ जाऊ द्यावा लागतो.

तुमच्या आयुष्याची सुख-दुःख तुमच्याच हातात आहेत, हे पक्क लक्षात घ्या. आयुष्याला योग्य आकार देण्याचे प्रयत्न तेवढे तुम्हाला करत राहावे लागणार. या आठ गोष्टी जर तुम्ही जाणीवपूर्वक करत राहिलात तर तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करणारा ‘डोरेमॉन’ तुमच्या दिमतीला नेहमी हजर असेल.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

4 thoughts on “मनातली प्रत्येक इच्छा कशी पुर्ण करायची?”

  1. मनाचे talks मी अलीकडेच वाचायला सुरुवात केली मला.खूपच सकारात्मक आणि आनंदी वाटत आहे
    असेच छान लेख पुन्हा पुन्हा वाचायला आवडतील
    आभारी आहे
    प्रभाकर

    Reply
    • #मनाचेTalks च्या लेखांचे अपडेट्स मोफत मिळवण्यासाठी 👇व्हाट्सएप तसेच टेलिग्राम चॅनलला जॉईन होता येईल.

      सर्व लेख नियमितपणे पोहोचण्यासाठी मनाचेTalks चा व्हाट्सएप नंबर, 8308247480 तुमच्या डिव्हाईस मध्ये सेव्ह असू द्या.

      तसेच सबस्क्रिप्शन थांबवायचे असल्यास, जॉईन केलेला ग्रुप अथवा चॅनल ‘लिव्ह’ करून द्यावा.

      त्याचबरोबर मनाचेTalks च्या सर्व पोस्ट न चुकता फेसबुकच्या न्यूज फीड मध्ये दिसण्यासाठी पोस्टच्या वरच्या उजव्या कोपऱ्यावर असलेल्या तीन डॉट्स वर दाबून ‘Add मनाचेTalks to Favourites’ यावर क्लिक करा…

      व्हाट्स ऍप इन्व्हाईट लिंक.👇

      https://chat.whatsapp.com/LTv393KE2TSL0Yu4usFmpZ

      टेलिग्राम चॅनल👇

      https://t.me/manachetalksdotcom

      Reply
  2. इच्छापूर्तीचा खुप सुंदर मूलमंत्र या लेखात सांगितला आहे. या लेखात सांगितलेल्या छोट्या छोट्या गोष्टीनी आपल्या जीवनात सुरवात केली तर नक्कीच आपल्याला फायदा होईल.
    मनाचे talks टीमला मनपूर्वक धन्यवाद.

    Reply

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय