व्यवसायाच्या शोधात असाल तर हे तुमच्यासाठी, करोंडोंचा बिझनेस करतोय MBA चहावाला.

प्रत्येक क्षण अमूल्य असतो, ओळखा त्याला, करोंडोंचा बिझनेस करतोय MBA चहावाला. आणि व्यवसायाच्या शोधात असाल तर हे तुमच्यासाठी

एम. बी. ए. चहावाला असं सांगितल्यावर तुम्ही म्हणणार, असेल कुणीतरी MBA झालेला आणि आणि आता चहाची टपरी टाकून सोशल मिडियावर जाहिरात करणारा. तर मित्रांनो ही कहाणी जरा हटके आहे. जरूर वाचा.

प्रफुल्ल बिल्लोरे. मध्य प्रदेशातल्या धारजवळच्या खेड्यातला हा मुलगा. एम.बी.ए करण्यासाठी अहमदाबादला पोचला. एंट्रन्स एक्झाम देता देता प्रफुल्लच्या मनाने काही वेगळं करून पहायचं ठरवलं.

एम.बी.ए करायचं तर टॉपच्या कॉलेजमध्ये असं ठरवलं. पण ही एंट्रन्स आपल्याला झेपणार नाही हे लक्षात आल्यावर वेगळं काही करण्यासाठी धडपडायला लागला. एक ही पैसा खर्च न करता अहमदाबाद ते बेंगलोर प्रवास प्रफुल्लने केला. तिथे अठरा दिवस आज या मित्राकडे, उदया त्या मित्राकडे रहात काढले. पैसे खर्च केल्याशिवाय, आणि तेही सन्मानाने, मजेत जगप्रवास करू शकतो हा विश्वास प्रफुल्लकडे आज आहे.

कसा कमावला हा आत्मविश्वास ?

पैसे खर्च न करता प्रवास करून आल्यावर मँकडोनल्ड मध्ये अगदी साधीशी नोकरी प्रफुल्लने मिळवली. चार ठिकाणी MBA करतोय सांगितल्यावर चक्क नकार मिळाला. पाचव्यां ठिकाणी दहावी पास आहे आणि नोकरीची गरज आहे असं सांगत नोकरी मिळवली.

न लाजता प्रफुल्लने ही नोकरी केली. तिथेच त्याच्या डोक्यात खिचडी शिजली की दुस-यांकडे काम करण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा. नोकरी सांभाळत चहासाठी पातेली वगैरे खरेदी केली. प्रफुल्ल एक नियम अगदी दिलखुलासपणे सांगतो.

एखाद्या कामाची सुरवात करायची आहे तर वस्तु नजरेसमोर ठेवा. एक बिल्डिंग बांधायची तर चार विटा तातडीने आणा! हाच फंडा वापरुन चहासाठी सामान तर प्रफुल्लने आणलं. प्रत्यक्षात चहा बनवण्यासाठी धीर गोळा करून उभं राहण्यात 50 दिवस गेले.

चहाच का ?

आज आपण पाहिलं तर चमचमीत पदार्थांना खूप मागणी असते. मग रेस्टॉरंट किंवा असे काही चटपटीत पदार्थ निवडण्याऐवजी चहाची टपरी का निवडली असेल? त्याचं करण असं की पुर्ण भारतात चहा हा हवाच असतो. भले प्रत्येक ठिकाणी त्याची चव वेगळी असेल. चहा मात्र प्रत्येकाला हवाच. यासाठी चहाच विकायाचा इरादा पक्का झाला.

चहाच विकायचा हे फायनल करत प्रफुल्लने धीर गोळा करत टपरी तर सुरू केली, पण ग्राहक कसे येणार? तर आपल्या शिक्षणाचा वापर करत, सफाईदार इंग्लिश मध्ये प्रफुल्लने लोकांना विनंती केली की माझ्या चहाची चव चाखून बघा.

इंग्लिश बोलणारा चहावाला बघून लोकांना वाटायचं की काहीतरी वेगळं प्रकरण आहे. लोकं पुन्हा पुन्हा चहासाठी यायला लागले. ताज्या चहाच्या सुगंधासारखा प्रफुल्लच्या चहाची चर्चा व्हायला लागली. गर्दी वाढायला लागली. बोलणारा माणूस चिंचोके विकत असला तरी त्याच्या बोलघेवडेपणामुळे त्या विकल्या जातात. प्रफुल्लने आपल्या बोलण्याचं कौशल्य वापरत ग्राहकांना पुन्हा पुन्हा यायला भाग पाडल.

MBA चहावाला नावात नेमकं काय आहे ?

चहाची टपरी असली तरी तिला एक ओळख हवी, एक नाव हवं. प्रफुल्लने आपल्या चहाच्या बिझनेसला मिस्टर बिलोरे असं नाव दिलं होतं.

इंग्लिश मध्ये बिलोरे नाव लिहल्यावर कुणी बिलेनिअर म्हणायच, कुणी बिलोरी काच म्हणायचं कुणी बिलो रानीही म्हणायचे. तीन एक महिन्यात प्रफुल्लने ग्राहकांच्या मनात MBA सोडून चहा विकण्याचा जे पँशन होतं ते व्यवस्थित पटवलं होतं. त्यामुळे त्या MBA वाल्याकडे जाऊ चहा प्यायचा अशी चर्चा व्हायची. प्रफुल्लने लोकांनी दिलेलं नाव स्वीकारलं. आपली ओळख निर्माण करण्यासाठी मिस्टर बिलोरे समोर गावाचं नाव जोडलं अहमदाबाद. मिस्टर बिलोरे अहमदाबाद. MBA. ही आहे नावाची कहाणी.

प्रसंगी खोटं बोलून सांभाळला बिझनेस

कोणत्या आईवडिलांना शिक्षण सोडून आपल्या मुलाने चहाची टपरी सुरू केलेली आवडेल? (आता ती टपरी राहिली नसून फ्रँचायझी देणाऱ्या बिजनेस ची साखळी बनली आहे)

प्रफुल्लच्या आईवडिलांनाही प्रफुल्ल उच्च शिक्षण घेणार याची खात्री होती. त्यासाठी पैसे खर्च करण्याची त्यांची ऐपत होती. घरच्यांच्या समाधानासाठी प्रफुल्लने MBA साठी अँडमिशन ही घेतली.

खुल्या जगात मिळणारं शिक्षण प्रफुल्लला जास्त महत्त्वाचं वाटत होतं. सात आठ दिवसांत कॉलेजला रामराम ठोकून प्रफुल्लने चहाच्या बिझनेसवर लक्ष केंद्रित केलं.

प्रफुल्लचा हा चहाचा उपद्व्याप घरी माहिती नव्हता. कोणत्या तरी कोर्सच्या नावाने प्रफुल्लने पंधरा हजार रुपये वडिलांकडून घेऊन चहाच्या बिझनेस मध्ये गुंतवले. सोशल मिडिया वरुन प्रफुल्लची स्टोरी व्हायरल झाली आणि घरच्यांना धक्का बसला.

ज्या खोटेपणाने कुणाचं नुकसान होत नाही त्याला माफी मिळते.

प्रफुल्लने सहा महिन्यापर्यंत घरी आपल्या बिझनेसची कल्पना दिली नव्हती. त्यामुळे घरच्यांचा अपेक्षाभंग झाला होता. MBA चहावालाच्या सहा शाखा सुरू झाल्यावर, प्रफुल्लच्या संघर्षाचं कौतुक सुरू झाल्यावर मात्र आईवडिलांचा विरोध मावळला. आज MBA चहावाला आणखी 15 शाखा सुरू होण्याच्या तयारीत आहे. लवकरच आंतरराष्ट्रीय स्तरावर MBA चहावालाची शाखा सुरू होतेय.

संघर्षाची कहाणी सगळयांनाच आवडते.

मित्रांनो अतिशय लहान वयात धाडस करत यश मिळवणा-या प्रफुल्लने एक सत्य सांगितलं. संघर्षाची कहाणी सगळयांनाच ऐकायला, स़ांगायला आवडते. संघर्ष करायला मात्र कुणालाच नको असतो. आयुष्यात भव्य दिव्य काही करायचं असेल तर कष्टाला पर्याय नाही. तिथं जाण्यासाठी वेगळा विचार करणं आणि मेहनत करणं गरजेचं आहे.

आमच्या शाखा सर्वत्र आहेत.

MBA होऊन जितकी कमाई करता आली असती ती कमाई एका दिवसात करणा-या प्रफुल्लचे विचार स्पष्ट होते. कोणत्याही दबावाखाली किंवा घाबरत निर्णय न घेता, स्वतः वर विश्वास ठेवत प्रफुल्लने आजपर्यंतचा टप्पा गाठला आहे. मित्रांमध्ये चेष्टेचा विषय बनलेला प्रफुल्ल आज अभिमानाने सांगू शकतो. MBA चहावाल्याच्या आज वेगवेगळ्या शहरात शाखा आहेत.

तुमच्या शहरात किंवा गावात MBA चहावालाची शाखा सुरू झाली तर जरूर भेट दया. कष्टाची चव तुम्हांला तिथे चाखायला मिळेल.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

2 thoughts on “व्यवसायाच्या शोधात असाल तर हे तुमच्यासाठी, करोंडोंचा बिझनेस करतोय MBA चहावाला.”

    • #मनाचेTalks च्या लेखांचे अपडेट्स मोफत मिळवण्यासाठी 👇व्हाट्सएप तसेच टेलिग्राम चॅनलला जॉईन होता येईल.

      सर्व लेख नियमितपणे पोहोचण्यासाठी मनाचेTalks चा व्हाट्सएप नंबर, 8308247480 तुमच्या डिव्हाईस मध्ये सेव्ह असू द्या.

      तसेच सबस्क्रिप्शन थांबवायचे असल्यास, जॉईन केलेला ग्रुप अथवा चॅनल ‘लिव्ह’ करून द्यावा.

      त्याचबरोबर मनाचेTalks च्या सर्व पोस्ट न चुकता फेसबुकच्या न्यूज फीड मध्ये दिसण्यासाठी पोस्टच्या वरच्या उजव्या कोपऱ्यावर असलेल्या तीन डॉट्स वर दाबून ‘Add मनाचेTalks to Favourites’ यावर क्लिक करा…

      व्हाट्स ऍप इन्व्हाईट लिंक.👇

      https://chat.whatsapp.com/LTv393KE2TSL0Yu4usFmpZ

      टेलिग्राम चॅनल👇

      https://t.me/manachetalksdotcom

      Reply

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय