टाल्कम पावडर लावण्याचे फायदे, तोटे आणि पावडर लावण्याची योग्य पद्धत

खूप घाम येतो म्हणून किंवा अंगाला सतत सुवास येत रहावा म्हणून टाल्कम पावडर वापरणे ही अगदी कॉमन गोष्ट आहे. मोठी माणसेच नव्हे तर अगदी नवजात शिशुपासून सर्वांसाठी टाल्कम पावडर वापरली जाते.

तान्ह्या बाळांना त्यांचे अंग कोरडे रहावे, डायपर रॅश येऊ नये ह्यासाठी बेबी टाल्कम पावडर लावली जाते. अनेक स्त्रिया चेहेऱ्याचा तेलकटपणा कमी होण्यासाठी, गोरे दिसण्यासाठी चेहेऱ्यावर विशिष्ट प्रकारची पावडर लावतात. तिला फेस पावडर असे म्हणतात.

टाल्कम पावडर मऊ, मृदू, मुलायम आणि सुगंधी असते हे तर नक्की. पण ती खरंच उपयोगी असते का? नियमित पावडर लावण्याचे काय फायदे आहेत? त्यापासून काही धोका तर नाही ना, पावडर नक्की कशी वापरावी ही सर्व माहिती आपण आज ह्या लेखात जाणून घेणार आहोत.

टाल्कम पावडर कशापासून बनते?

टाल्कम पावडर टाल्क नावाच्या खनिजापासून बनवली जाते. टाल्कमध्ये मुख्यत्वे मॅग्नेशियम, सिलिकॉन आणि ऑक्सिजन हे घटक पदार्थ असतात. टाल्कम पावडर, बेबी पावडर आणि फेस पावडर बनवण्यासाठी हेच टाल्क खनिज वापरले जाते. डिओड्रंट किंवा डिओ स्प्रे बनवण्यासाठी सुद्धा टाल्क वापरले जाते.

परंतु येथे महत्वाची गोष्ट ही आहे की टाल्क ह्या खनिजामध्ये ऍसबेस्टोस असते. शरीराच्या बाह्य भागावर ऍसबेस्टोस लागले तर त्याचा काही त्रास होत नाही. परंतु ते शरीराच्या आत गेले तर मात्र हानिकारक असते. त्यामुळे कॅन्सरसारखे हानिकारक आजार देखील होऊ शकतात.

म्हणून टाल्कम पावडर वापरताना काळजी घेणे आवश्यक असते.

टाल्कम पावडर वापरण्याचे फायदे

१. टाल्कम पावडर लावल्यामुळे शरीरावर असणारा ओलावा शोषला जातो. त्वचा कोरडी आणि मुलायम राहण्यास मदत होते. घामामुळे येणारा ओलसरपणा कमी होतो. त्यामुळे त्वचेवर बॅक्टरीयाची वाढ होत नाही. इन्फेक्शनचा धोका कमी होतो.

२. त्वचेचा मुडपला जाणारा किंवा एकमेकांवर घासला जाणारा भाग टाल्कम पावडर लावल्यामुळे घासला जात नाही. तसेच घर्षणामुळे होणाऱ्या जखमा कमी होण्यास मदत होते. शरीरावर आलेले रॅशेस टाल्कम पावडर लावल्यामुळे कमी होण्यास मदत होते. त्वचेला खाज येत असेल तर पावडर लावण्याचा उपयोग होताना दिसतो.

३. पुरुषांनी दाढी केल्यानंतर पावडर लावल्यास तेथील त्वचा मुलायम राहण्यास आणि त्या भागात खाज न येण्यास मदत होते.

४. शरीराच्या झाकल्या गेलेल्या भागात जसे की काखा, जननेंद्रियांचा भाग येथे पावडर लावल्यामुळे घाम येण्याचे प्रमाण कमी होते आणि तो भाग स्वच्छ राहतो.

५. स्त्रियांच्या चेहऱ्यावर फेस पावडर मेकअप प्रमाणे काम करते. चेहर्‍याचा तेलकटपणा कमी करण्यासाठी तसेच त्वचा उजळ दिसण्यासाठी पावडरचा उपयोग होतो.

६. लहान बाळांना डायपर रॅश होऊ नये तसेच बाळाच्या शरीरावर असणार्‍या वळ्यांमध्ये घाम साठून त्याला इन्फेक्शन होऊ नये म्हणून बेबी पावडर लावण्याचा उपयोग होताना दिसतो.

तर हे आहेत टाल्कम पावडर वापरण्याचे विविध फायदे. परंतु टाल्कम पावडर वापरण्याचे काही तोटे सुद्धा आहेत. ते कोणते ते पाहूया

१. श्वसन विकार

टाल्कम पावडर अंगाला लावत असताना तिचे बारीक कण उडून नाकात जाऊन वेगवेगळ्या प्रकारचे श्वसन विकार होण्याचा धोका असतो. खोकला, घशात खवखवणे, सूज येणे यासारखे आजार होऊ शकतात तसेच फार जास्त काळापर्यंत अशी पावडर नाकात गेल्यास अस्थमा आणि न्यूमोनियाचा धोका देखील होऊ शकतो. लहान बाळांना पावडर लावताना ती त्यांच्या नाकात उडून बाळ आजारी पडू शकते.

२. त्वचाविकार

टाल्कम पावडर वापरण्यात चूक झाली तर किंवा तुमच्या त्वचेला त्याची ऍलर्जी असेल तर, काहीवेळा वेगवेगळ्या प्रकारचे त्वचा विकार उद्भवू शकतात.

त्वचेवर एखादी जखम असेल तर त्या जखमेच्या संपर्कात टाल्कम पावडर आल्यामुळे तेथे इन्फेक्शन आणि बॅक्टेरियाची वाढ होऊ शकते. काहीजणांना टाल्कम पावडरची अलर्जी असल्यामुळे त्वचेवर वेगवेगळ्या रॅश येणे, त्वचेचा तो भाग सुजणे लाल होणे अशा समस्या होऊ शकतात.

३. ओवेरियन कॅन्सर

स्त्रियांमध्ये टाल्कम पावडर वापरण्याचा धोका सर्वात जास्त असतो. जननेंद्रियाजवळ टाल्कम पावडर वापरल्यामुळे योनिमार्गाद्वारे पावडरचा शरीरात सहजपणे प्रवेश होऊ शकतो आणि पावडरमधील घातक पदार्थांमुळे स्त्रियांना ओव्हेरियन कॅन्सर होण्याचा धोका असू शकतो असे वेगवेगळ्या रीसर्च मधून समोर आले आहे.

तर हे आहे टाल्कम पावडर वापरण्याचे काही धोके.

असे असेल तर टाल्कम पावडर वापरूच नये का? तर तसे नाही.

आज आम्ही तुम्हाला टाल्कम पावडर योग्यप्रकारे कशी वापरावी ज्यामुळे त्याचे फायदे तर मिळतील आणि आपण त्यातील धोक्यांपासून स्वतःला सुरक्षित ठेवू शकतो ते सांगणार आहोत.

१. पावडरच्या डब्यातून पावडर थेट उडवून आपल्या अंगावर लावू नये. त्याऐवजी पावडरच्या पफचा वापर करावा. तसेच एखाद्या मऊ मुलायम कपड्याचा वापर देखील करता येईल. पफ किंवा कपड्याच्या मदतीने पावडर शरीरावर लावावी. लहान बाळांना देखील अशाच पद्धतीने पावडर लावावी.

२. पावडर वापरत असताना ती कटाक्षाने आपल्या तसेच बाळाच्या चेहऱ्यापासून दूर ठेवावी. म्हणजे पावडरचे बारीक कण नाकात जाऊन त्रास होणार नाही.

३. लहान बाळांच्या आणि स्त्रियांच्या जननेंद्रियाजवळ पावडरचा वापर करू नये.

४. पावडर लावताना उचित प्रमाणात लावावी. खूप जास्त पावडर लावू नये ते शरीरासाठी हानिकारक असू शकते.

५. पावडर डब्याबाहेर सांडणार नाही याची काळजी घ्यावी. अन्यथा पावडरचे कण हवेत पसरून श्वसनावाटे ते सर्वांच्या शरीरात जाऊ शकतात.

तर मित्र-मैत्रिणींनो अशा प्रकारे सुरक्षितपणे टाल्कम पावडर वापरून आपण त्याचे फायदे घेऊ शकतो आणि त्यातील धोक्यांपासून स्वतःला सुरक्षित ठेवू शकतो. ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी हा लेख जरुर शेअर करा.

जाणून घ्या डायपर रॅश वरील घरगुती उपाय

मनाचे श्लोक

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय