आपण दिवसभरात खूप बिझी असल्याचे वाटते का तुम्हाला? मग हे वाचा..

busy

सहसा आपण बघतो कि बऱ्याच लोकांची कुठल्याही गोष्टीला काहीतरी कारणं पुढे करून टाळण्याची किंवा वेळ मारून नेण्याची एक मनोवृत्ती असते.

आपल्या अवती भोवती दोन प्रकारचे लोक असतात काही आपले काम वेळेवर आणि अचूकपणे पूर्ण करतात. आणि ते सहाजिकच नेहमी यशाच्या दिशेने वाटचाल करतात. मागे वळून बघणं हे मुळी त्यांच्या डिक्शनरीतच नसतं.

आणि दुसरी मनोवृत्ती असते कि समोर आलेली सगळीच कामे आपल्याला कशी शक्य नाहीत, ती कशी टाळता येतील यासाठी यांच्याकडे नेहमीच काहीना काही कारणं तयार असतात.

Busyहि जी दुसऱ्या प्रकारची मनोवृत्ती आहे काम टाळण्याची यात प्रामुख्याने येणारे कारण काय असते माहित आहे…

हेच कि मी अमुक-तमुक कामात खूप बिझी होतो किंवा होते त्यामुळे मला हे करता नाही आले किंवा वेळेवर पोहोचता नाही आले.

या बिझी असण्याच्या बहाण्याने बरीच लोकं आपल्यातल्या चुकीच्या सवयीला लपवण्याच्या मागे असतात. अर्थातच याला काही अपवादही असतातच.

आता बघा याचा अर्थ असा नाही कि खरंच कोणी बिझी असूच शकत नाही. पण जर कोणी ५ कामांपैकी ४ कामं न होण्याचं कारण जर बिझी असणंच सांगत असेल तर हा व्यस्ततेचा मनोविकार वेळीच घालवण्यासाठी काहीतरी केलेच गेले पाहिजे.

माणसाच्या प्रगतीत सर्वात मोठा अडसर हा याच मनोवृत्तीतून येतो.

खरतर बिझी असणं हे कारण अभिमानास्पद ठरत नाही, कसं ते आता आपण बघू…

1) जेव्हा तुम्ही बिझी असतात तुम्ही नकळत काही चांगल्या संधी गमावून बसता.

2) तुम्ही बिझी असण्याच्या कारणाने जर काही टाळले तर तुमचा पुढे वाटचाल करण्याचा वेग नकळतच मंदावतो.

3) तुम्ही अति बिझी जर राहिलात कुठल्या गोष्टीला किती प्रायॉरीटी द्यायची हे तुम्ही ठरवूच शकत नाही.

4) अति बिझी असणं हे समोर आलेल्या अडचणींना फाटा देण्यासाठी असण्याची शक्यताहि बरीच असते. त्यामुळे पुढे ढकललेली अडचण पुन्हा भविष्यात येणारच नाही असे थोडीच असते!!

5) तुम्ही अति बिझी जर राहिलात तर आयुष्यात स्वतःला वेळ देणं राहूनच जातं… आणि स्वतःसाठी वेळ काढणं हे बिझी असण्यापेक्षा खरंच खूप महत्वाचं आहे… नाही का??

6) तुम्ही खूप बिझी राहिलात तर तुमचा दृष्टिकोन साफ राहू शकत नाही… म्हणजे त्या कामांच्या गराड्यात आपल्याला काय करणं अधिक सोयीस्कर तसंच गरजेचं आहे हेच मुळी ठरवता येत नाही.

7) तुम्ही अति बिझी जर राहिलात तर स्वतःवर प्रेम करणं, स्वतःची काळजी घेणं हेच राहून जातं.

8) तुम्ही खूप बिझी राहिलात तर नकळत तुमच्याकडे विचार करायलाच वेळ राहात नाही.

9) तुम्ही जर अति बिझी राहिलात तर या अविश्रांत पळण्याला बांध कुठे घालायचा याचंच भान राहत नाही.

कुठलेही कामं असो वा काहीही असो तुम्ही जर ते आजचे उद्यावर ढकलले तर तो उद्या नक्कीच कधीही उगवत नाही आणि “मी खूप बिझी आहे” हे म्हणण्याची सवय हळूहळू केव्हा एक मनोविकार बनून जाते हे कळत सुद्धा नाही.

सफलतेची पहिली पायरी हीच कि, या व्यस्ततेच्या मनोविकाराची बाधा आपल्याला होणार नाही याची काळजी घेणं.

चला तर मग आजपासून ‘मी बिझी आहे’ या कारणाने कुठलंही काम न टाळता वेळेचं नियोजन करून आयुष्य आनंदित करण्याची सवयंच लावून घेऊ.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा.

You may also like...

1 Response

  1. रघुनाथ देशटवार says:

    खुप महत्वाचे विचार चांगल्या प्रकारे वाचायला मिळाले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!