कॉफी प्यायला आवडते? एकदा “घी कॉफी” ट्राय करून बघा

आपली सगळी कामं आवरलेली असावीत. मस्त थंडी पडलेली असावी. हातात कॉफीचा मग असावा. कॉफीच्या एकेक घोटाबरोबर तन मन फ्रेश होत जावं. अहाहा! तुम्हांला सुध्दा ही कल्पना मस्त वाटली ना?

थोडासा निवांत वेळ असताना, सकाळी नाश्त्याला, दुपारी फ्रेंड सर्कल बरोबर गप्पा मारताना, मीटिंगमध्ये कॉफीचा दरवळ मनाला ताजातवाना करतो यात शंकाच नाही.

चला तर आज या कॉफीविषयी गप्पा मारूया….

तुम्ही कॉफीचे चाहते असाल तर साधी कॉफी, एक्सप्रेसो कॉफी, ब्लॅक कॉफी, कोल्ड कॉफी, बटर कॉफी नक्कीच ट्राय केली असणार.

पण तुम्ही “घी कॉफी” ट्राय केली आहे का ?

“घी” म्हणजे तूप कॉफीत मिसळून प्यायचं.

सेलीब्रेटींना जिने वेड लावलंय ती आहे “घी कॉफी.”

“घी कॉफी”चे फायदे समजून घेण्याआधी साध्या कॉफीचे फायदे समजून घेऊया.

1) योग्य प्रमाणात कॉफी घेतली तर वजन कमी व्हायला मदत होते.

2) कॉफी पिण्यामुळे थकवा कमी होतो.

3)हृदयविकारापासून दूर ठेवते कॉफी.

4)मधुमेहाचा धोका कमी करण्यासाठी कॉफी उपयुक्त आहे

6)काही प्रकारच्या कँन्सरला कॉफीमुळे अटकाव होतो.

“घी कॉफीचे” फायदे कोणते?

तुप थोड्या प्रमाणात घेतलं तर पचन सुधारते हे आपल्याला माहिती आहे. नुसत्या कॉफीमुळे पचनतंत्र बिघडू “शकतं,पोट बिघडू शकतं. रिकाम्या पोटी कॉफी घेण्याचं तेवढ्यासाठी टाळलं जातं. “घी कॉफी” मुळे, म्हणजे कॉफीत तुपाचा वापर केल्यामुळे ही समस्या दूर होऊ शकते.

याशिवाय घी कॉफीचे आणखी काही फायदे आहेत.

तुपामुळे गॅस किंवा अ‍ॅसिडिटी कमी होते. यामध्ये असणारं कॅल्शियम ब-याच दुष्परिणामांना कमी करतं. कॉफीत तूप घालून प्यायल्याने बरेच फायदे होतात.

याशिवाय नियमितपणे कॉफीत तूप टाकून घेतले तर तुमच्या शरीरातील ऊर्जा सुद्धा वाढेल.

कॉफीचे तोटे कोणते ?

एका नाण्याच्या दोन बाजू असतात, तसं फायद्याबरोबर काही तोटे ही असतात.

कॉफी पिण्याने काही तोटे ही होऊ शकतात. कॉफी किती प्रमाणात घेतली जाते त्यावर त्याचे फायदे तोटे ठरतात.

1) दिवसभरात चार कपापेक्षा जास्त कॉफी प्यायल्याने नक्की नुकसान होतं

2) अती कॉफी मुळे झोप कमी होऊ शकते.

3) कॉफीचं प्रमाण जास्त झालं तर अस्वस्थता वाढू शकते. हृदयाचे ठोके अनियमित होऊ शकतात.

4) गरोदर महिलांनी तर दोन कपापेक्षा जास्त कॉफी चुकूनही पिऊ नये. कॉफीचं प्रमाण जास्त झालं तर गर्भपात होऊ शकतो, जन्मलेल्या बाळाचं वजन कमी असू शकतं किंवा बाळात काही दोष निर्माण होऊ शकतात.

5) कॉफीमुळे काही प्रकारच्या कॅन्सरचा धोका कमी होतो, मात्र लक्षात घ्या कॉफीचं अतिसेवन मात्र कॅन्सरला आमंत्रण ठरतं.

6) कॉफीच्या अतिरेकी प्रमाणामुळे कॅफिनचा दुष्परिणाम जाणवतो. कॅफिन शरीरातील नसांना हानी पोचवतात. त्यामुळे भीती, अस्वस्थता, नैराश्य, एकाकीपण या भावना घेरू शकतात.

फायदे, तोटे यांचा नीट विचार करत कॉफीची उत्तम चव तुम्ही अनुभवू शकता, कॉफीच्या फायद्यांचा लाभ उठवू शकता.

तुम्हाला आवडेल त्या चवीच्या प्रमाणात कॉफी पावडर, एक चमचा तूप आणि गरम पाणी यांच्या मिश्रणातून अफलातून कॉफी तयार होईल. तुम्ही मित्रमैत्रिणींबरोबर ही कॉफी शेअर करत कॉफीचा आनंद लुटु शकता.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.