तारुण्य जपण्यासाठी, वाढत्या वयाच्या खुणा रोखण्यासाठी हे आहेत शास्त्रीय उपचार

tarun disnyasathi upay

विज्ञानाने बरेच शोध लावले. मानवी मनाला वृध्दत्वाची भीती असते. ती दूर करून तारूण्य टिकवणं आता ब-यापैकी सोपं आहे. कसे ते वाचा या लेखात

विज्ञानाने बरेच शोध लावले. मानवी मनाला वृध्दत्वाची भीती असते. ती दूर करून तारूण्य टिकवणं आता ब-यापैकी सोपं आहे. कसे ते वाचा या लेखात

तरुण दिसणं, कुणाला आवडणार नाही? वाढत्या वयाच्या खुणा शरीरावर दिसतातच.

सुरकुत्या पडणं, त्वचा कोरडी होणं हे आपल्याला जाणवतंच. त्यावर बाहेरून अनेक उपाय केले जातात. क्रीम लावलं जातं, ट्रिटमेंट घेतली जाते आणि वाढत्या वयाला रोखण्यासाठी प्रयत्न केले जातात.

पण विचार करा बरं, वृद्धत्व जर आपल्यापर्यंत आलेच नाही तर!

आपले शरीर म्हणजे निसर्गाचा एक चमत्कारिक अविष्कार आहे. पूर्वी जसे वेगवेगळे आजार व्हायचे, पण त्यावर काही संशोधनं नसेपर्यंत त्याबद्दल माणसाला काही माहित नव्हतं, तसंच काहीसं वृद्धत्त्वाचं सुद्धा आहे.

नेमकं कशामुळे येतं वृद्धत्व?

शरीरात “एस. आय. आर. टी. 1″ नावाचं एंझाइम हे फक्त सजीवांच्या शरीरात तयार होणारं एक लिक्विड असतं. आयुष्य वाढवण्यासाठी हे एंझाइम महत्वपूर्ण काम करतं.

पण हे एंझाइम स्वतःलाच संपवण्याचा प्रयत्न करत असतं. एंझाइमची ही वृत्ती टाळता आली तर वाढतं वय थांबवता येईलच पण अनेक वैद्यकीय समस्यांशी सहजपणे सामना ही करता येईल.

SIRT1 ची स्वतःला संपवण्याची/खाण्याची प्रक्रिया हि पेशींमध्ये एंजाइम म्हणजेच SIRT1 कमी किंवा अदृश्य करण्याचे कार्य करते. या प्रक्रियेला ऑटोफॅगी म्हणतात. स्वतःला खाण्याची ही वृत्ती असल्याने SIRT1 ला स्वभक्षी म्हटलं जातं.

शास्त्रज्ञांच्या असं लक्षात आलं कि, जर सजीवांच्या शरीरात निर्माण होणा-या या द्रव्यावर योग्यरित्या लक्ष दिले गेले आणि त्याची वागणूक थांबवली गेली, तर वयानुसार उद्भवणाऱ्या समस्यांविरूद्ध चांगल्या उपचारपद्धती विकसित केल्या जाऊ शकतात.

शास्त्रज्ञांचं असं म्हणणं आहे स्वत:च स्वतःला खाण्याची एंझाइमची वृत्ती जर थांबवली तर ‘एसआयआरटी 1’ ची पातळी पुन्हा वाढू शकते, ज्यामुळे रुग्णांवर उपचार करायला किंवा वृद्धत्व आणि कमी होणारी रोगप्रतिकारक प्रणाली थांबायला निश्चित मदत होऊ शकते.”

शास्त्रज्ञ म्हणतात की पाणी जसे झिरपतं तसे पेशींमध्ये प्रोटीन आणि एंझाइम, झिरपत रहातात. ‘एस आय आर टी 1’ हे एंझाइम सुद्धा पेशींमध्ये झिरपतात.

वय जसे वाढते तसे शरीरातून या एन्झाइमचे प्रमाण कमी व्हायला मदत होते. ही प्रक्रिया सुरू झाली की मोठे आजार, शारीरिक क्षमतेत कमतरता आणि रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्याचं जाणवायला लागते. ही प्रक्रिया थांबवण्यासाठी बरेच प्रयोग झालेत.

संशोधनातून समोर आलंय की मेटाबॉलीझम म्हणजेही चयापचय आणि प्रतिकारशक्ती यांच्या मध्ये एस आय आर टी 1 ची महत्वाची भूमिका आहे. असं ही लक्षात आलं आहे की एस आय आर टी 1 एंझाइमची पातळी वाढवली तर आयुष्य ही वाढू शकतं.

शास्त्रीय पद्धतीने जर एस आय आर टी 1. हे द्रव्य शरीरात मेंटेन केलं तर ‘चिरतारुण्याचा’ वरच मिळू शकतो.

विज्ञानाने बरेच शोध लावले. मानवी मनाला वृध्दत्वाची भीती असते. ती दूर करून तारूण्य टिकवणं आता ब-यापैकी सोपं आहे.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.