पी. एम. आर. डी. ए. हिंजवडी सह चार ठिकाणी सुरू करणार नवीन कचरा विघटन केंद्र

पुणे मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट ॲथॉरिटी म्हणजेच पीएमआरडीए, महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेन्ट कॉर्पोरेशन( एमआयडीसी) च्या मदतीने हिंजवडी सह चार नवीन ठिकाणी कचरा जमा करणे आणि त्याचे विघटन करणे यासाठीची केंद्र सुरू करणार आहे. ही माहिती पीएमआरडीए चे सीईओ किरण गीत्ते यांनी दिली आहे.

या कचरा विघटन केंद्रांमध्ये दररोज ५० टन इतका कचरा विघटित करता येऊ शकेल. हिंजवडी फेज ३ येथील मेगापोलीस टाऊनशिप जवळचा एमआयडीसीच्या अधिपत्याखाली येणारा प्लॉट यासाठी निश्चित करण्यात आला आहे.

मध्यंतरीच्या काळात हिंजवडी आणि परिसरातील कचऱ्याच्या विल्हेवाटीचा प्रश्न ऐरणीवर आला होता कारण जवळच्या माण या गावातील कचऱ्याचे आधीच्या कॉन्ट्रॅक्टरने योग्यप्रकारे विघटन केले नाही.

त्यामुळे जागोजागी कचऱ्याचे ढीग साठून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला. जवळ जवळ ५०,००० नागरिक यामुळे अडचणीत आले होते. या गावात दररोज १० ते १२ टन कचऱ्याची निर्मिती होते. ग्रामपंचायत आणि सरकारी अधिकारी यांनी एक मीटिंग करून सदर प्रश्न मार्गी लावला आहे. जास्त मनुष्यबळ वापरून कचऱ्याचे विघटन करून परिसर स्वच्छ करण्यात आला आहे.

त्याच वेळी कचऱ्याचे विघटन करण्याची नवीन केंद्रे आवश्यक असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे हिंजवडी सह चार नवीन परिसरात पीएमआरडीए तर्फे आता नवीन कचरा विघटन केंद्रे सुरू होतील.

ह्याशिवाय पी. एम. आर. डी. ए. ने नागरिकांना ओला व सुका कचरा वेगवेगळा गोळा करण्यासाठी डस्टबिन पुरवली आहेत. ओल्या व सुक्या कचऱ्याची वेगवेगळ्या आणि योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्याचा पी एम आर डी ए तसेच महानगरपालिका यांचा सतत प्रयत्न असतो. नागरिकांनी योग्य ते सहकार्य करावे असे तेथील अधिकाऱ्यांनी आवाहन केले आहे.

नवीन कचरा विघटन केंद्रे सुरू होणार याचे परिसरातील नागरिकांनी स्वागत केले आहे. अधिकारी आणि नागरिक यांच्या सहकार्याने कचऱ्याचा प्रश्न सोडवला जाऊ शकतो यात काही शंका नाही.

चला तर मग मित्रांनो आपणही आपल्या घरातील ओला व सुका कचरा वेगळा ठेवू आणि त्याचे योग्यप्रकारे विघटन होण्यास मदत करूया.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय