ऍक्सिस बँकेचे ग्राहक तिला ‘सर्वात खराब बँक’ म्हणत आहेत. काय आहे हे प्रकरण? जाणून घ्या सत्य

ऍक्सिस बँक ही सध्याची देशातील आघाडीची बँक आहे. बँकेचे बहुतांश ग्राहक बँकेच्या सेवेबद्दल संतुष्ट आहेत. पण सध्या मात्र इंटरनेटवर ऍक्सिस बँक म्हणून सर्च करायला गेलं तर सर्वात आधी येतं ‘axis bank chor hai’
परंतु सध्या मात्र ऍक्सिस बँकेला काही ग्राहकांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे. ऍक्सिस बँकेच्या काही ग्राहकांनी ट्विट करून बँकेबद्दल तक्रार केली आहे. ग्राहक बँकेकडून अकाउंटमधून परस्पर कापल्या जाणाऱ्या ‘कॉंसॉलिडेटेड चार्जेस’ बद्दल तक्रार करत आहेत.
नक्की काय आहे हे प्रकरण? आज आपण ह्या प्रकरणातील (ग्राहकांची बाजू आणि बँकेची बाजू) सर्व तथ्ये जाणून घेऊया
सय्यद रहीम नावाच्या एका ग्राहकाने ट्विट करून उपरोधाने लिहिले आहे की ‘बँक माझ्या अकाउंट मधून त्यांच्या कर्मचाऱ्यांना पगार देत आहे का?’ त्यांनी बरोबर काही स्क्रीन शॉट देखील दिले आहेत ज्यात त्यांच्या खात्यातून काही हजार रुपये कॉंसॉलिडेटेड चार्जेस म्हणून परस्पर कापलेले दिसत आहेत.
@AxisBankSupport what’s this?? Did you took one of your employees salary from my account or what?? I mean seriously?? Couple of months before one of your employee told me there is no pending charges now what’s this new sense?? #axisbankchorhai #consolidatedcharges #axisbankfraud pic.twitter.com/1DiCEFkvEZ
— Syed Raheem (@syedraheem9949) September 26, 2021
ऍक्सिस बँकेचे आणखी एक ग्राहक विशाल तिवारी ह्यांनी देखील ट्विट करत बँकेला ‘धोकेबाज बँक’ असे म्हटले आहे. त्यांची देखील बँकेबद्दल कॉंसॉलिडेटेड चार्जेस आणि त्यावर १८% GST कापला अशी तक्रार आहे.
#AxisBank मतलब धोखेबाज बैंक #ConsolidatedCharges बता के पहले खाते से 4453 रुपये काटे, ऊपर से 18% #GST चार्ज भी लगा दिया। #Corona काल में भी लूट मचा रखी है।#AxisBankFraudBank@PMOIndia @nsitharaman @nch14404 @jagograhakjago @ConsumerCourt_ @JBreakingBajpai @TheLallantop pic.twitter.com/mDEuQKONEV
— Vishal Tiwari (@vishal_livee) September 26, 2021
कृष्णमूर्ती नावाच्या आणखी एका ग्राहकाने देखील कॉंसॉलिडेटेड चार्जेस बद्दल तक्रार केली आहे. ते म्हणतात की ‘ऍक्सिस बँक देशातील सर्वात खराब बँक आहे. ही बँक दर २, ३ महिन्यांनी कॉंसॉलिडेटेड चार्जेसच्या नावाखाली ग्राहकाच्या अकाउंटमधून पैसे कापून घेते.
#AxisBank this is worst bank of India and worst service center every 2 or 3 months one’s directed consolidation charges #worstBankOfIndia #worstBank pic.twitter.com/Q33mHJbW43
— Krishna murthy K M (@Krishna_murthyD) September 27, 2021
ऍक्सिस बँकेच्या कॉंसॉलिडेटेड चार्जेस कापून घेण्याबाबतच्या बऱ्याच तक्रारी येत आहेत. सहाजिकच आहे ना, ग्राहकांच्या खात्यातून जर असे हजारो रुपये एका वेळी कापले गेले तर ग्राहक अस्वस्थ होणारच. बँक आपल्याला लुटत आहे असा त्यांचा समज होऊ शकतो.
पण यामागे नक्की काय कारण आहे? खरंच बँक ग्राहकांना लुटत आहे का?
‘कॉंसॉलिडेटेड चार्जेस’ म्हणजे नक्की काय ते ऍक्सिस बँकेच्या वेबसाईटवर डिटेल दिले आहे. बँकेकडून ग्राहकाचे ज्या प्रकारचे अकाउंट आहे त्यानुसार ग्राहकाला काही सेवा पुरवल्या जातात आणि त्या सेवांसाठी ग्राहकाकडून महिन्याच्या शेवटी किंवा काही ठराविक काळानंतर एकत्रितपणे काही चार्जेस घेतले जातात. तेच ‘कॉंसॉलिडेटेड चार्जेस’ असतात.
म्हणजेच बँकेकडून दिल्या जाणाऱ्या सेवांबद्दल कापून घेतले जाणारे चार्जेस म्हणजेच ‘कॉंसॉलिडेटेड चार्जेस’ हे तर आपल्याला समजले. पण नक्की कोणकोणत्या सेवांसाठी हे चार्जेस कापले जातात ते आपण आता पाहुया.
१. डेबिट कार्ड चार्ज
ह्यात डेबिट कार्ड इश्यू करणे, वर्षभर डेबिट कार्ड वापरणे, कार्ड एक्सपायर झाल्यावर नवीन कार्ड इश्यू करणे ह्या सर्वांसाठी चार्जेस घेतले जातात.
२. मिनिमम बॅलन्स चार्ज
प्रत्येक अकाउंटच्या प्रकारानुसार त्या अकाउंटमध्ये कमीतकमी किती रक्कम ठेवावी लागते ह्याचे बँकेचे काही नियम असतात. त्या नियमानुसार आवश्यक रक्कम जर तुमच्या खात्यात नसेल तर बँक त्याबद्दल दंड करून चार्जेस कापून घेऊ शकते.
३. ATM किंवा चेक चा जास्त वापर
दर महिन्याला ATM अथवा चेकचा वापर करून जास्तीतजास्त किती वेळा पैसे काढता येतात त्याचे बँकेचे काही नियम असतात. त्यापेक्षा जास्त वेळा ATM अथवा चेकबुकचा वापर केल्यास दंड लागतो. ज्याचा समावेश कॉंसॉलिडेटेड चार्जेस मध्ये होतो.
४. SMS चार्जेस
आपल्या खात्यात होणाऱ्या ट्रांझाक्शन्सची माहिती बँक आपल्याला वेळोवेळी SMS द्वारे देत असते. त्याबद्दल बँकेचे काही ठराविक चार्जेस असतात. ते देखील कॉंसॉलिडेटेड चार्जेस मध्ये समाविष्ट असतात.
५. चेक बाऊन्स झाल्यास
आपल्या खात्यात पुरेशी रक्कम नसल्याने जर आपण दिलेला चेक बाऊन्स झाला किंवा एखादी ऑटो डेबिट ची इन्स्ट्रक्शन फेल झाली तर त्याबद्दल बँक दंड आकारते.
६. डुप्लिकेट पासबुक, dd बनवणे
डुप्लिकेट पासबुक अथवा dd बनवणे अशा सुविधांसाठी बँक काही दर आकारते. ते देखील कॉंसॉलिडेटेड चार्जेस मध्ये येतात.
७. डिमॅट अकाउंट किंवा लॉकर चार्जेस
आपण बँकेतर्फे डिमॅट अकाउंट वापरत असू किंवा बँकेची लॉकर सुविधा वापरत असू तर त्यासाठी बँक दरवर्षी काही ठराविक रक्कम आकारते.
तर ह्या आहेत काही सुविधा ज्यांच्यासाठी बँकेकडून कॉंसॉलिडेटेड चार्जेस कापले जातात. ह्याव्यतिरिक्त आणखीही काही बाबींचा ह्यात समावेश होतो. त्यासंबंधीची संपूर्ण माहिती बँकेच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.
पाहूया ह्यावर बँकेचे काय म्हणणे आहे?
हे अगदी सहाजिक आहे की, कारण कोणतेही असो, खात्यातून परस्पर पैसे कापले गेले की ग्राहक अस्वस्थ होणारच. परंतु ह्यावर बँकेचे कस्टमर केअर अधिकारी असे म्हणतात की, कॉंसॉलिडेटेड चार्जेस मध्ये बँक कोणतेही छुपे चार्जेस लावत नाही.
ग्राहकाला अकाउंट उघडताना सर्व प्रकारच्या चार्जेसची कल्पना दिलेली असते. आणि खरे तर ह्या प्रकारच्या सेवांबद्दल बँकेकडून लावले जाणारे चार्जेस किरकोळ स्वरूपाचे असतात. जेव्हा हजारो रुपये चार्जेस लागतात तेव्हा त्यामागे तशीच कारणेही असतात. उदाहरणार्थ EMI वेळेत न भरणे किंवा क्रेडिट कार्डचे पेमेंट वेळेत न करणे.
तुम्ही जर अकाउंटमधून एखादा EMI भरत असाल आणि तुमच्या खात्यात पुरेसे पैसे नसतील तर चार्ज लागतो, बँकेने पुन्हा EMI कापून घेण्याचा प्रयत्न केला आणि तरीही पुरेसा बॅलन्स नसेल तर दंडाची रक्कम दुप्पट होते, अशा रीतीने दंडाची रक्कम वाढत जाते.
त्यामुळे बँक अधिकाऱ्यांचे असे म्हणणे आहे की ह्यामध्ये ग्राहकांची देखील काही अंशी चूक आहे. जर बँकेच्या तांत्रिक चुकीमुळे पैसे कापले गेले तर ग्राहकाला त्याचा परतावा त्वरित मिळतो.
तर मित्रांनो, ही आहे जास्त प्रमाणात कॉंसॉलिडेटेड चार्जेस लागण्यामागची खरी मेख. आपले असे नुकसान होऊ नये म्हणून आपण बँकेच्या सर्व नियमांची आधी माहिती घेतली पाहिजे.
तसेच सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे. म्हणजे असे नुकसान होण्याची वेळ येणार नाही. आणि तरीही काही नुकसान झालेच तर आपण बँकेच्या आपल्या जवळच्या शाखेत तक्रार दाखल करू शकतो.
ही माहिती जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोचवण्यासाठी हा लेख नक्की शेअर करा. कारण आर्थिक विषयांची इत्थंमूत माहिती असणे हे, पैसे कमावण्याइतकेच महत्त्वाचे आहे. काय पटतंय ना!!!
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा