गूळपाणी पिण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहीती आहेत का?

gul pani che fayde

गोड चवीचा मात्र स्वभावाने गरम असलेल्या गुळात पौष्टिक घटक असतात.

पूर्वीच्या काळी बाहेरून आलेल्या माणसाला गुळाचा खडा देऊनच मग प्यायला पाणी दिलं जायचं. छोट्या भुकेसाठी स्नॅक्स म्हणून अरबट चरबट काहीतरी न खाता, गूळ शेंगदाण्याचा लाडू लहानपणी सर्वांनीच खाल्ला असेल.

अशा सगळ्या प्रथांमध्ये, पद्धतीमध्ये गूळाचा वापर का होत असावा?

याच कारण गूळ गुणकारी आहे.

आज मात्र आपण गूळाविषयी न बोलता, गूळाच्या पाण्याविषयी जाणून घेऊया.

एनर्जीला पुन्हा चालना देणा-या गूळपाण्याचे अनेक औषधी उपयोग शरीरातल्या कित्येक समस्यांचं निवारण करतात.

सेंद्रिय पध्दतीने पिकवलेल्या उसापासून सेंद्रिय पध्दतीने तयार केलेला गूळ चांगले रिझल्ट देतो.

1) प्रतिकारशक्तीला चालना देते गूळ पाणी.

गूळामध्ये व्हिटॅमिन ‘सी’, व्हिटॅमिन बी-1 आणि व्हिटॅमिन बी-6 मुबलक प्रमाणात असतं.

सकाळी रिकाम्या पोटी किंवा रात्री झोपताना गूळपाणी घेतलं तर त्यातल्या उत्तम पौष्टिक मूल्यांमुळे, प्रतिकारशक्ती वाढू शकते. याशिवाय मेटाबॉलिजमसुद्धा वाढतं.

2) वजन कमी करायला उपयुक्त

कोणताही गोड पदार्थ म्हणजे वाढत्या वजनाला खुलं आमंत्रणच.

पण तुम्हांला ऐकून आश्चर्य वाटेल गोड गूळपाण्याने मात्र वजन कमी करता येऊ शकतं.

वजन कमी करण्यासाठी, वजन कमी करण्यासाठी गुळाचे सेवन गरम पाण्याबरोबर करावे.

यातून भरपूर प्रमाणात पोटॅशिअम मिळतं जे शरीरात इलेक्ट्रोलाइटचं प्रमाण योग्य राखतं.

इलेक्ट्रोलाइटमुळे शरीर तंदुरुस्त रहायला खूपच मदत होत असते.

इलेक्ट्रोलाइटच्या योग्य प्रमाणामुळे वजन कमी व्हायला मदत होते.

3) अशक्तपणासाठी उत्तम गूळपाणी.

ब-याच जणांना थकवा, अशक्तपणा जाणवतो.

आयर्न आणि लाल पेशींच्या कमतरतेमुळे हा अशक्तपणा येत असतो.

गूळपाण्यामुळे हा अशक्तपणा ब-याच अंशी कमी होतो.

गुळात मुबलक प्रमाणात आयर्न असतात. गरम पाण्याबरोबर गूळ घेतल्याने हिमोग्लोबिन वाढविण्यासाठी मदत होते. अशक्तपणा कमी होतो.

4) गुडघेदुखी आणि ब्लड प्रेशर दोन्हीवर प्रभावी गूळपाणी.

गूळपाणी हाडांना मजबुती देण्यासोबत गुडघेदुखीत आराम देतं.

पोटॅशियम आणि सोडियम मुबलक प्रमाणात असल्याने गुळपाण्यामुळे ब्लडप्रेशर नियंत्रणात राखण्यास मदत होते.

पोटॅशियम मुळे रक्तवाहिन्यांवरील ताण हलका होऊन ब्लडप्रेशर नियंत्रणात ठेवायला मदत होते

5) लिव्हर साफ होण्यासाठी गूळपाण्याची मदत.

गूळपाण्यात अ‍ॅंटीटॉक्सिक माइक्रोन्यूट्रिएंट्स असतात. जे लिव्हर साफ, स्वच्छ ठेवायला मदत करतात.

लिव्हरमध्ये साठणारे टॉक्सीन शरीराबाहेर फेकायला गूळपाणी मदत करतं.

गूळापाण्याचे फायदे अनेक असले तरी, तुमच्या शरीराची प्रवृत्ती उष्ण आहे का, तुम्हाला मधुमेह आहे का, यानुसार प्रत्येकाच्या शरीरावरील गुळाचे परिणाम आणि फायदे वेगवेगळे असू शकतात. म्हणून तज्ञांच्या सल्ल्याने त्यांच्या मार्गदर्शनाखालीच गूळपाण्याचा वापर करावा

गोड आवडत असेल तर आरोग्यासाठी ‘गोड पर्याय’ म्हणजे, ‘गुळ’

Manachetalks

लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजांचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी./ The information is not a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.