भारतीय तरुणाची अमेरिकी शेअर बाजारात दमदार एंट्री! Freshwork INC IPO

भारतीय तरुणाची अमेरिकी शेअर बाजारात दमदार एंट्री! स्वतःचाच फायदा नाही तर कर्मचाऱ्यांना सुद्धा करोडपती बनवले!!

कुठल्याही कंपनीत जास्तीत जास्त फायदा मिळवण्यासाठी दिवसरात्र मेहनत केली जाते. फायदा अर्थातच मालकाचा होतो. कर्मचा-यांना थोडा फार तात्पुरता फायदा होतो.

पण तुम्ही अशा कंपनीविषयी ऐकलं आहे का ज्यांनी आपल्या एक दोन नाही तब्बल 500 कर्मचा-यांना करोडपती बनवलं? अहो खरचं! अशी कंपनी आहे.

या कंपनीचं नाव आहे फ्रेशवर्क INC. अभिमानाची गोष्ट अशी की या कंपनीचे मालक भारतीय आहेत. त्यांचं नाव आहे
गिरीश मातृभूतम.

गिरीश मातृभूतम.

एखादी इच्छा तुम्ही FROM THE BOTOOM OF HEART मागता, अगदी मनापासून इतरांचं भलं करण्याचं ठरवता तेंव्हा ती इच्छा पुर्ण होणारच….

गिरीश यांनी जेंव्हा आपल्या कंपनीचं स्वप्न पाहिलं तेंव्हा त्यांची झेप स्वतःच्या मालकीच्या BMW पर्यंत नव्हती, तर गिरीश यांची इच्छा होती की माझ्या कंपनीत काम करणा-या प्रत्येकाकडे स्वतःची BMW कार असावी.

२२ सप्टेंबर ला अमेरिकी शेअर बाजारात फ्रेशवर्क चा IPO विक्रीसाठी खुला झाला. आणि 24 सप्टेंबर पासून फ्रेशवर्कने अमेरिकेतला शेअर बाजार NASDAQ मध्ये २१% च्या परताव्यासहित दमदार एन्ट्री घेतली. आणि कंपनीचे मार्केट कॅप $12 अब्ज झाले.

फ्रेशवर्क कंपनीच्या 2/3 कर्मचाऱ्यांना कंपनीच्या फायदयाचा हिस्सा मिळाला. कंपनी 120 देशामध्ये विस्तारलेली आहे.
गिरीश मातृभूतम म्हणतात की, कंपनीच्या उन्नतीसाठी जर कर्मचारी आपलं सर्वोत्तम काम करत असतील तर ते फक्त पगारच नाही तर फायद्याचे भागीदार ही बनले पाहिजेत.

बिझनेसची पार्श्वभूमी असणाऱ्या भल्या भल्या बिझनेस मॅनना जे जमलं नाही, ते गिरीश मातृभूतम यांनी करून दाखवलं. त्यांचे वडील बँकेत नोकरी करत होते. तर गिरीश मातृभूतम स्वतः सॉफ्टवेअर कंपनीत काम करत होते.

त्यामुळेच कर्मचाऱ्यांच्या भावना काय असतात याची मला जाणीव होती असं गिरीश मातृभूतम म्हणतात. प्रत्येकाचं स्वप्न पुर्ण व्हावं असं काही तरी करावं असं मालक म्हणून सुरुवात करताना गिरीश मातृभूतम यांनी ठरवलं, प्रत्यक्षात उतरवलं.

गिरीश मातृभूतम यांनी 2010 ला फ्रेशवर्क इंक या कंपनीची सुरुवात केली होती. सुरवातीला ही क्लाउड बेस्ड कस्टमर सर्विस सॉफ्टवेअर कंपनी होती.

सुपरस्टार रजनीकांत यांचे सुपरफॅन असणारे गिरीश मातृभूतम रजनीकांत यांचा नवा चित्रपट रिलीज झाला की अख्खं थिएटर आपल्या स्टाफ साठी बुक करतात.

आपल्या स्टाफची काळजी घेणारे गिरीश लवकरच आपल्या कर्मचा-यांना BMW कार भेट देतील, तेंव्हा त्या कर्मचाऱ्यांना मनात एकच वाक्य असेल, असा बॉस सर्वाना मिळू दे !

असेच काही महिन्यांपूर्वी पुण्याच्या नेहा नारखेडे यांनी IPO द्वारे आपल्या स्टार्टअपची अमेरिकी शेअर बाजारात दमदार एंट्री घेतली होती, त्याबद्दलचा लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा. आपल्या भारतीय तरुणांचे स्टार्टअप्स असेच बहरत राहोत हीच सदिच्छा.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

1 thought on “भारतीय तरुणाची अमेरिकी शेअर बाजारात दमदार एंट्री! Freshwork INC IPO”

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय