मुलतानी माती वापरताय? घरातल्या या दोन गोष्टी अ‍ॅड करा आणि नितळ मुलायम त्वचा मिळवा

मुलतानी माती फायदे

मुलतानी मिट्टी मुळे चेहऱ्याला उजळपणा तर मिळतोच पण त्याचबरोबर चेहऱ्याच्या इतर काही समस्या असतील तर त्याही दूर होतात.

बऱ्याचदा आपण मुलतानी माती फक्त गुलाब पाण्यामध्ये मिसळून वापरतो. पण समजा घरातल्या या दोन वस्तू त्याच्यामध्ये मिसळल्या तर चेहऱ्याला जास्त फायदे मिळू शकतात.

मुलतानी माती वापरल्यामुळे चेहऱ्याला तकाकी येते. पण त्याचबरोबर मुलतानी माती मध्ये हळदी आणि दह्याचा वापर केला तर तजेलदार चेहरा तुम्हाला काही मिनिटांमध्येच मिळू शकतो.

मुलतानी माती मध्ये दही आणि हळदीचा वापर केला तर खरंच चेहरा जास्त सुंदर जास्त आकर्षक तजेलदार दिसू शकतो.

मुलतानी माती बरोबर दही आणि हळदीचा उपयोग कसा करायचा प्रमाण काय घ्यायचं हे जाणून घेऊया.

यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे

१) एक मोठा चमचा मुलतानी माती

२) एक छोटा चमचा हळद

३) दोन मोठे चमचे दही

एका बाऊलमध्ये हळद मुलतानी माती आणि दही एकत्र करून घ्या. समजा हे मिश्रण तुम्हाला जास्त दाट वाटत असेल तर त्याच्यामध्ये काही थेंब गुलाबपाणी मिसळा. अर्थात हे मिश्रण फार पातळ होणार नाही याची काळजी घ्या नाहीतर ते चेहऱ्याला लावणे अवघड होईल.

हे मिश्रण व्यवस्थित एकत्र करून मग हलकेच चेहऱ्यावर लावा.

चेहऱ्यावर हा फेसपॅक व्यवस्थित सुकू द्या.

फेसपॅक व्यवस्थित सुकल्यानंतर कोमट पाणी घेऊन चेहरा हळूवारपणे धुऊन घ्या.

चेहरा धुतल्यानंतर एक काळजी मात्र नक्की घ्या, की साधारण दोन ते तीन तास चेहऱ्याला कुठलाही साबण लावायचा नाही.

हा फेसपॅक एकदा वापरल्यानंतरच तुम्हाला तुमच्या चेह-यातला फरक लक्षात येईल.

उत्तम रिझल्टसाठी हा फेसपॅक तुम्ही आठवड्यातून दोनदा वापरू शकता.

तुमची त्वचा कोरडी किंवा तेलकट असुदे तुम्ही हा फेसपॅक वापरू शकता.

समजा तुमची त्वचा तेलकट असेल तर आठवड्यातून तीनदा तुम्ही हा फेसपॅक वापरायला हरकत नाही.

आता या फेसपॅकमुळे कोणते फायदे होतात ते जाणून घेऊया.

मुलतानी माती वापरल्यामुळे तेलकट त्वचेच्या समस्या खूप कमी होतात त्वचा नितळ आणि स्वच्छ होते.

हळदी मध्ये असणारे अँटी बॅक्टेरियल तत्व चेहऱ्यावरील बॅक्टेरिया कमी करतात त्यामुळे चेहऱ्यावर येणारे पिंपल्स कमी होतात.

दह्या मध्ये असणाऱ्या लॅक्‍टिक ऍसिड मुळे त्वचा मऊ मुलायम आणि चमकदार होते. दह्याच्या वापरामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि कोरडेपणा सुद्धा दूर होतो.

सौंदर्य वाढवण्यासाठी मुलतानी माती चेह-याला लावताना दही आणि हळद या सहज उपलब्ध होणाऱ्या गोष्टीं त्यामध्ये मिसळून फ्रेशनेस आणि तजेलदार चेहरा तुम्हांला सहज मिळेल.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.