“माफ कर मामा”

मामा काल मामीचा फोन आला होता, तुझ्या त्या बैलजोडीतला एक बैल आजारी आहे म्हणे, एक आठवड्या पासून……… तुला पैशाची अडचण आहे अशीही सांगत होती मामी. सध्या तू आर्थिक अडचणीत असतो, आप्पाची शेती चांगली भरभरून देत होती ना रे मामा. त्यांच्या सहा लेकींचे व तुझे लग्न या शेतीच्या भरवश्यावरच केले ना रे आप्पाने….. एवढं मोठं खटलं!….. पण कधी चनचन नव्हती.

काय दिवस होते ते कधी एकदाची परीक्षा संपते व तुझ्या गावी येतो असे वाटायचे, शेवटचा पेपर तर अगदी नकोसा वाटे. उन्हाळ्याची सुट्टी व तुझे गाव हे तर जगण्याचा एक भाग होता. तू तुझ्या बैलगाडीला घेवून फाटयावर यायचा, तासन् तास आमची वाट पाहत बसायचा… त्या लाल पिवळ्या एसटीतुन आम्ही यायचो…. आणि तुझ्या गाडीतून, कधी घरी पोहचतो असे व्ह्ययचे. गाडीचा आवाज येताच आजी धावत यायची. “आला का रे माया नातू” असे म्हणत एकदा आजीने जवळ घेतले रे घेतले की, त्या कड़क उन्हातला प्रवासही रम्य व्हायचा. हळूहळू तुझ्या सर्व बहिनी व भाचे पोहचायची सर्व घर कसे भरून जायचे. तसे तुझे घर फार मोठे नव्हते पण सर्वांना तिथे जागा होती. गावातली नदी तर गावचा दागीना, गावाला वळसा घेवून जाणारी ही नदी म्हणजे, नवविवाहितेच्या गळ्यातला हार. आज मात्र तिथे फक्त दगड़ दिसतात. टेकडीवरचे रामाचे मंदीर तिथे रोज हरिपाठ होत असे तिथल्या त्या टाळ मृदंगाचे आवाज आजही कानात कायम आहे.

तू शिकला ती शाळा आता पार ओसाड झालीया, तालुक्याला राहणारी एकच मॅडम ती शाळा सांभाळते म्हणे. ती तरी काय सांभाळनार एक दोनच विध्यर्थ्यांना?…. या शाळेतून शिकुन तुझे काही सोबती आज शहरात मोठ मोठ्या हुद्यावर आहेत असे तूच आम्हाला सांगायचा ना! आता या शाळेवरुन गावतल्या लोकांचा भरवसा कसा रे उडाला? गावातून ऑटोत भरून तालुक्याच्या शाळेत जातात म्हणे आता सर्व मुले. लहान मूल सुद्धा आता गावात शिकत नाही. काय झाले रे मामा तुझ्या या गावाचे. तुझ्या शेतातली आमराई, त्या मोठ-मोठ्या आंब्याच्या झाडांवर चढून आंबे तोडण्यात काय स्पर्धा असायची आमची. त्या झाडांची काळाच्या क्रूर आघातात केव्हाच् कटाई झाली रे मामा… हल्ली आमची मूलं मामाच्या गावाला जात नाहीत. उन्हाळी सुट्टीत गावी जावून राहणं, हा विचारच त्यांना ठाऊक नाही. सुट्टीत वेगवेगळ्या शिबिरातुंन ते संस्कार घेतात रे आमची मुलं…. “वर्षभर महागड्या शाळांतुन व घरुन संस्कार होत नाहीत का ?” असे तू आता विचारू नको.

तुझ्या मुलीच्या लग्नासाठी तू काढलेले कर्ज अजूनही बाकी आहे म्हणे. तुझा तो सोबती, त्याला आम्ही हरीमामा म्हणायचो त्याने गेल्या वर्षी आत्महत्या केली म्हणे. आप्पाच्या तर कोण्या सोबत्याने नाही केली रे मामा कधी आत्महत्या. दरवर्षी कर्जमाफ़ी ची तू वाट पाहतो पण सरकारे बदलतात परंतु तुझी स्थीती मात्र तीच आहे.

मामा खरं सांगू का तुझ्या या स्थितीला आम्हीच ही शहरातली मंडळी जबाबदार. तुझ्या गावच्या नदिवर आम्ही धरणं बांधली, गावचं व शेतीचे पाणी शहराला दिलें. पूर्णवेळ विज आम्ही वापरतो परंतु तुला मात्र भारनियमन. झाडांची कत्तल झाली, त्यामुळे पाऊस कमी. शहरे फोपावली, गावे मात्र ओसाड झाली. गरज असते तेव्हा शेतीच्या मालाला भाव नसतो. तुझा माल बाजारात आला कि भाव पडतो (पाडल्या जातो). ओरबडून टाकली रे गावे, खरच पार शेखचिल्ली सारखे केलय आम्ही. मामा खरच तू आम्हा शहरातील तुझ्या भाच्यांना माफच कर.

तुझा भाचा

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय