सकाळी लवकर उठण्याचे फायदे, आणि त्यासाठी काय करावे

5 AM is when legends are either waking up or going to sleep.

प्रभाते मनी राम चिंतीत जावा

कोरोना आपल्या आयूष्यात एकटा आला नाही. सोबत लॉकडाऊन नावाचा एक आगंतूक पाहूणा घेऊन आला. मागच्या एक वर्षात झालेल्या अनेक छोट्यामोठ्या लॉकडाऊनमूळे आपल्या सर्वांची दिनचर्याच दिवसेंदिवस बदलत चालली आहे.

दिवसभर घरात बसूनच काम करायचं म्हंटल्यावर नाही म्हटल तरी, माणूस आळशी होतो. सुस्त होतो. काम आटोपले
की आपण दिवसा झोपायला लागतो आणि रात्री झोप येत नाही म्हणून मोबाईल, टी.व्ही, लॅपटॉपवर मनोरंजनाची
साधनं शोधतो.

पहाटे लवकर उठल्याने खूप फायदे होतात, आरोग्य चांगले राहते हे आपल्या सर्वांना खूप चांगल्या पद्धतीने ठाऊक असते. पण सुर्योदयापुर्वी उठून नियमितपणे दिवसाची आखीवरेखीव सुरुवात करणे खूपच कमी लोकांना जमते. सकाळी लवकर उठण्याचा आणि जीवनात यशस्वी होण्याचा खूप घनिष्ठ संबंध आहे.

मी मागच्या पंधरा वर्षांमध्ये अनेक अध्यात्मिक संघटनांच्या संपर्कात आलो. काही ठिकाणी सक्रिय सहभाग नोंदवला. अनेक शिबिरांना हजेरी लावली. सर्वांची काम करण्याची पद्धती वेगळी असली तरी सगळीकडे एक गोष्ट कॉमन होती. पहाटेच्या वेळी उठणे बंधनकारक असायचे. अध्यात्मामध्ये सकाळी लवकर उठण्याला प्रचंड महत्व आहे.

वेदांमध्ये आणि भगवतगीतेमध्ये सुर्य उगवण्याच्या आधीचे जे दोन तास असतात त्याला ‘ब्रम्हमुहुर्त’ असे म्हण्टले गेले आहे. ब्रम्हमुहुर्तावर उठण्याला असाधारण महत्व आहे.

पहाटेची वेळ पवित्र असते. मंगलमय असते. एखाद्या विद्यार्थ्याने पहाटे लवकर उठून केलेला दोन तासांचा अभ्यास हा दिवसभरात आठ तास केलेल्या अभ्यासापेक्षा जास्त परिणामकारक असतो कारण पहाटेच्या वेळी वातावरणात नीरव शांतता असते. नुकतीच विश्रांती घेतल्यामूळे मेंदूच्या पेशी ताजातवान्या झालेल्या असतात.

लेखक, संगीतकार, तत्वचिंतक, खेळाडू, गायक, नृत्यसाधक या सर्वांच्या सर्जनशीलतेला पहाटेच्या वेळी बहर फुटतो. हजारो लोकांनी गजबजलेल्या रेल्वेस्टेशन, बसस्टॅंडसारख्या गोंधळ असलेल्या ठिकाणी बसून तुम्ही एखाद्या गोष्टीमध्ये एकाग्र होवू शकणार
नाही.

कलकलाट असलेल्या ठिकाणी आपला मेंदू खूप लवकर थकतो. याउलट पहाटेच्या वेळी निसर्ग किती सुंदर फुललेला आणि खुललेला असतो? अरुणोदयाची चाहूल लागली की चिवचिवाट करणारे पक्षी आकाशात झेपवताना दिसतात. मंद-मंद कोवळ्या सुर्यकिरणांचा स्पर्श झाला की आपल्यामध्ये एका चैतन्याचा संचार होतो. अंधारावर प्रकाशाची मात करण्याचा उत्सव साजरा करायला दिवाळी कशाला पाहिजे?

प्रत्येक दिवशीचा सुर्योदय हा अंधारावर प्रकाशाची मात करणारा सुंदर उत्सवच असतो. पण तो नयनरम्य सोहळा पाहण्याचे भाग्य खूपच कमी जणांना लाभते. सहा सात वाजेपर्यंत बहूतांश लोकं आपापल्या उबदार पांघरुणांमध्ये मध्ये गुलाबी थंडीचा आस्वाद घेण्यातच रमेलेले असतात. त्या साखरझोपेचा मोह ज्याला सुटला त्याचे जीवन बदलून जाते.

लवकर उठून दिवसाची सुरुवात करण्यामागे एक वैज्ञानिक कारणसूद्धा आहे. मनोचिकित्सक सांगतात की आपल्या मनाच्या अल्फा, बीटा, थिटा आणि डेल्टा या चार अवस्था आहेत. आपण जेव्हा जागे असतो त्याला बीटा अवस्था असे
म्हणतात.

खोलवर ध्यानात जाऊन शारिरीक जाणीवा नसतानाही दिव्य आनंदाची अनुभूती घेणे याला मनाची थिटा अवस्था असे नाव दिले गेले. डेल्टा म्हणजे गाढ झोप. आपण दिवसभर बीटामध्ये जगतो. रात्री झोपल्यावर डेल्टामध्ये जातो.

थिटा अवस्थेकडे जाणारी दारे फक्त यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार असे अष्टांग योग अवगत केलेल्या साधकांसाठीच उघडी असतात. आकर्षणाचा सिद्धांत वापरुन स्वतःच्या जीवनाला वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्याची तीव्र इच्छा असणाऱ्या प्रत्येकासाठी मनाची अल्फा अवस्था अत्यंत महत्वाची आहे. सकाळी लवकर उठून मोकळ्या हवेत फिरायल जाण्याने किंवा एखाद्या कामात गुंतवून घेतल्यावर आपले मन आपोआपच अल्फा अवस्थेत जाते. एक वेगळाच आनंद मिळतो. वेळ कसा गेला ते कळत नाही.

लवकर उठणारी माणसं दिर्घायुषी असतात. त्यांच्या आतमध्ये असलेल्या ‘बायोलॉजीकल क्लॉक’ किंवा जैविक घडाळ्याला अनुकूल असे जीवन ते जगतात. आपोआपच त्यांच्या शरीराची आणि मनाची निगा राखली जाते. १८७९ मध्ये एडिसनने विजेवर चालणाऱ्या दिव्यांचा शोध लावला आणि त्यानंतर जग बदलून गेले.

एकशे बेचाळीस वर्षांपुर्वी जग आजच्यासारखं नव्हतं. तेव्हा नाईटलाईफ नावाचा प्रकार नव्हता. सुर्योदय होत आला की माणसं कामावरुन आपापल्या घरी वापस यायची. सायंकाळी सातला जेवण करुन रात्री आठ वाजेपर्यंत झोपी जायची. पहाटे लवकर उठून
कामाला लागणे हाच त्यांचा दिनक्रम होता.

आता जग बदलले. गॅझेट्सनी आपला ताबा घेतला. लॉकडाऊनमूळे तर अनेक लोक रात्रभर ऑनलाईन असतात. साहजिकच जैविक घड्याळ बिघडल्यामूळे आरोग्य बिघडते. उशीरा उठणे, दिवसा झोपणे आणि रात्रभर झोप येत नाही म्हणून जागणे हे दुष्टचक्र आहे. निराशा, निद्रानाश असे विकार जडले की तरुण माणसं व्यसनांकडे वळतात. नको त्या गोष्टींमध्ये सुख शोधतात.

स्वतःच्याच विचारांनी घायाळ होणारी वृद्ध माणसं कंटाळून झोपेच्या गोळ्या घेऊन झोपण्याचा प्रयत्न करतात. शरीराच्या बायोलॉजिकल क्लॉकचे महत्व लक्षात न आल्यामूळे हे सर्व सहन करावे लागते. जैविक घड्याळाचा तोल सांभाळून हे सर्व दुष्परिणाम टाळता येतात.

सकाळी चारला किंवा पाचला उठणाऱ्या प्रत्येक माणसाला इतरांपेक्षा जादा वेळ मिळतो. तो वेळ व्यायाम करण्यामध्ये,
ध्यान करण्यामध्ये, मनाला चांगली चांगली अफर्मेशन्स देण्यामध्ये, प्रसन्न वातावरणात निसर्गाच्या सान्निध्यात घालवण्यामध्ये सत्कारणी लावला जाऊ शकतो.

सकाळी लवकर उठून आनंदी वातावरणात बाहेर पडल्यावर अंतर्मनाकडून विविध समस्यांवर उपाय सुचवले जातात. एक वेगळाच उत्साह संचारतो. आपोआपच मेंदूकडून दिवसभराचे प्लानिंग केले जाते.

जे लोक उशीरा म्हणजे सात आठला उठतात त्यांना अचानक चार पाचला उठायला सांगितले तर ते सहज शक्य होणार
नाही. तुमच्यासाठी एक सोपी युक्ती सांगतो.

तुम्ही ज्या वेळेला उठता त्याच्या पंधरा मिनिटे आधी उठण्याचा सराव करा. मग काही दिवसांनी अजुन पंधरा मिनिटे आधी उठा. असे करत करत तुम्ही सहज सुर्योदयापुर्वी उठू शकता. दिवसाची सुरुवात करताना सर्वात आधी आपल्या आतमध्ये जो निखळ आनंदाचा झरा आहे त्यामध्ये चिंब चिंब मनसोक्त भिजून घ्या.

आभार आणि शुभेच्छा!

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

2 thoughts on “सकाळी लवकर उठण्याचे फायदे, आणि त्यासाठी काय करावे”

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय