अंतर्मनाशी संवाद साधण्याचे तीन प्रभावी तंत्र

Once the subconscious mind accepts an idea, it begins to execute it.

तुम्हाला एक सिनेमा बघायला जायचं आहे. तुमच्या गावात एक सिनेमा थिएटर आहेत. एक थोडेसे जुने आहे. तिथले स्पीकर्स नीट नाहीत. त्या थिएटरच्या पडद्यावर अस्पष्ट चित्र दिसते. रंगही तेवढे आकर्षक नाहीत. ब्लॅक एंड व्हाईट चित्रपट पाहिल्याचा अनुभव येतो. खुर्च्या आरामदायी नाहीत. सीटच्या कोपऱ्यात बारीक ढेकणं लपून बसलेले आहेत. संधी मिळाली की ते आपल्याला चावत आहेत. बाहेरचे आवाज आतमध्ये येतात, इतर गोंगाट विचलित करतो.

वातावरणात एक प्रकारचा कुबट वास दरवळतो आहे. स्वच्छता नाही. अशा ठिकाणी कितीही सुपरहिट चित्रपट असला तरी तो पाहताना तुमचे मन पडद्यावर चाललेल्या गोष्टीत गुंतणार नाही. एकाग्र होणारच नाही.

तो चित्रपट मनापासून एंज्यॉय केल्याचे समाधान तुम्हाला या मोडकळीस आलेल्या जुनाट सिनेमागृहात मिळत नाही. आता कल्पना करा, तुम्ही मुंबई किंवा दिल्लीच्या चकचकीत आणि अलिशान अशा आयनॉक्स मल्टिप्लेक्समध्ये गेला आहात. चित्रपटगृहात स्थानापन्न झाल्यावर तुम्हाला अत्यंत भव्य असा पडदा दिसतो. त्यावर अत्यंत लोभसवाणी आणि सुस्पष्ट चित्र दिसत आहेत. कानाला सुखवणारा आवाज येतोय. अनावश्यक गोंगाट नाही.

एकदम आरामदायी सोफे आहेत. हवेमध्ये एक प्रकारचा सुगंध दरवळतोय जो तुमच्या मनाला प्रसन्न करतोय. तुमचा मुड एका क्षणात पालटून जातो. मरगळलेली अवस्था एका क्षणात झटकून तुमच्या चित्तवृत्ती प्रफुल्लित होतात.

काही मिनिटांमध्ये तुम्ही ध्येयभान विसरून चित्रपटात एकरुप होता. ती हिरो हिरोईनची गोष्ट तुम्ही जगू लागता. ते छान छान लोकेशनवर गाणी म्हणतात आणि तुमच्या मनाला गुदगुल्या होतात.

त्यांच्या फजितीवर तुम्ही हसता. त्यांचे दुःख तुमचे काळीज चिरत जाते. तुम्ही चित्रपटात गुंतत जाता. तीन तास कसे आणि कधी संपले हे तुम्हाला कळत नाही आणि चित्रपट संपल्यावर काहीतरी छान सोबत नेल्यासारखे तुम्ही एका नशेत, एका गुंगीत बाहेर पडता.

चित्रपटात जातानाचे तुम्ही आणि येतानाचे तुम्ही दोन्ही वेगळे असता. हे त्या चित्रपटाचे आणि त्या चित्रपटगृहाचे यश आहे. पहिल्या आणि दुसऱ्या चित्रपटगृहात काय फरक होता?

दोन्ही ठिकाणी आपल्या इंद्रियांना येणारे अनुभव वेगळे होते म्हणून परिणाम आणि प्रभाव यांच्यामध्ये फरक पडला. हीच गोष्ट आपल्या अंतर्मनालाही तंतोतंत लागू होते.

अंतर्मनाचा पासवर्ड तीन अक्षरांनी उघडतो…. “VAF”

V म्हणजे Visualisation. आपल्या डोळ्यांना जे चित्र दिसते ते प्रत्येक चित्र कळत नकळत अंतर्मनात साठवले जाते. डोळे सर्वात शक्तिमान इंद्रिय आहे. असं समजा. आपल्या मेंदुची तीन दारं आहेत. डोळे, कान आणि नाक.

ह्या तिघातही मेंदुला संदेश पोहचवणारा मुख्य दरवाजा डोळे हाच आहे. ज्याप्रमाणे स्क्रीनवर चित्र चांगली नसली की आपण तात्काळ, तो सिनेमा बंद करुन चांगल्या रिझोल्युशनचा सिनेमा शोधू लागतो, त्याचप्रकारे उत्तम दर्जाचे चलचित्र उभा केले, व्हिज्वलायजेशन निर्माण केले तर थेट अंतर्मनापर्यंत संदेश पोहोचतात. खोलवर रुजतात.

A म्हणजे Affirmations. अफर्मेशन्स म्हणजे आपल्या कानांना सुखद असे संदेश देणे. स्वयंसुचनामध्ये प्रचंड मोठी ताकत आहे. स्वसंवाद आणि स्वयंसुचना एखाद्या माणसाला घडवू शकतात किंवा त्याचे आयुष्य उधवस्त करु शकतात.

F म्हणजे Feelings. चित्रपटगृहात जो माणूस रिलॅक्स बसलेला असतो तोच चित्रपटाचा मनापासून आनंद घेऊ शकतो. तणावात असलेला माणूस गोष्टीत रंगू शकत नाही. तुमच्या भावना प्रसन्न असतील तर अंतर्मनाला भुरळ पडेल असे चलचित्र तुम्ही निर्माण करु शकाल.

मित्रांनो,

ही VAF टेक्निक आपल्या आयुष्यात मोलाची भुमिका बजावते. जर तुम्हाला स्वतःला हवे तसे VAF निर्माण करता, आले नाही तर तुमच्या अवतीभवतीचे इतर लोक त्यांना हवे तसे VAF तुमच्यासमोर उभे करतात आणि तुमच्याकडून हवे तसे काम करुन घेतात.

इतरांनी आपल्याला हवे तसे वापरुन फेकून देऊ नये अशी तुमची इच्छा असेल तर तुम्ही स्वतः तुमचा VAF बनवला पाहिजे. ज्याच्या कल्पना स्पष्ट असतात, ज्याने ध्येय चित्रफितीच्या स्वरुपात मनामध्ये वारंवार घोळवलेले असते तो इतरांच्या प्रभावात सहजासहजी येत नाही.

कोणाच्या बहकाव्यात येऊन आपला रस्ता सोडत नाही. कुणी घाबरवले म्हणून हतोत्साहित होत नाही. मात्र यासाठी आपल्या अंतर्मनाशी संपर्क करण्याचे तंत्र तुम्ही शिकून घेतले पाहिजे. व्हिज्वलायजेशनचा सराव केला पाहिजे.

पुढचा प्रश्न येतो की अंतर्मनाशी संपर्क कसा आणि कधी करावा?

एका मोठ्या आणि प्रतिष्ठित माणसाकडे एका कामासाठी तुम्हाला जायचे आहे. तुम्ही कोणती वेळ निवडाल?

जेव्हा ते मोकळे आहेत, फ्री आहेत. आणि जेव्हा त्यांचा मूड प्रसन्न असेल अशी वेळ पाहून तुम्ही त्यांना भेटायला जाल आणि
इतर गप्पाटप्पा मारुन खेळकर वातावरणात आपली मागणी त्याच्यापूढे मांडाल. अगदी हेच आपल्याला अंतर्मनासोबत करायचे आहे.
अंतर्मनाशी संपर्क करण्याचे तीन उत्तम मुहूर्त असतात.

१) सकाळी उठल्याबरोबर साखरझोपेची अवस्था

२) रात्री गाढ झोप येण्याआधीची पेंगूळलेली अवस्था जेव्हा ग्लानी आलेली असते.

३) ध्यानातून बाहेर पडतानाची सुप्त आणि जागृत यांच्यामध्ये असणारी काही क्षणांची इंटरवेल

शास्त्र सांगतात की झोप हा छोटा मृत्युच असतो. झोपेतून जागृत अवस्थेत वापस येणे हा एक प्रकारचा पुनर्जन्म असतो. दिवसभर विचार करुन शिणलेल्या मेंदूच्या पेशी म्हणजे न्युरॉन्स रात्री झोपल्यावर स्वतःची झीज भरुन काढतात. म्हणून झोपेतून उठताना माणसाचे मन एकदम कोरे करकरीत झालेले असते. स्वच्छ आणि ताजेतवाने झालेले असते.

हीच संधी साधून आपण झोपेतून उठल्याबरोबर संवेदना अर्धजागृत असताना डोळे मिटून मांडी घालून बसावे. परमेश्वराचे स्मरण करुन आपल्याला कसे आयुष्य जगायला आवडेल त्याची रंगबेरंगी, सुस्पष्ट आणि लक्षवेधक फिल्म आपल्या डोळ्यांसमोर निर्माण करावी.

मी क्रमांक एकच्या लेखात सांगितल्याप्रमाणे तुम्ही सर्वांनी आपली ध्येय विस्तृतपणे लिहून काढलीच असतील. अद्याप लिहली नसतील तर तातडीने लिहायला लागा.

ध्येयांना जिवंत करणारी फिल्म पुन्हा पुन्हा नजरेसमोर आणणे, आणि मनात घोळवणे हा आकर्षणाच्या सिद्धांताचा मुख्य पाया आहे.
तुमच्या कल्पनांना मुर्तिमंत स्वरुप देण्यासाठी मनात फिल्म चालवण्यासोबतच VAF टेक्नॉलॉजीची इतर दोन तंत्र तुम्ही वापरली पाहिजेत.

त्या फिल्मच्या बॅकग्राऊंडमध्ये आवाज निर्माण करा. आता ते चलचित्र तुमच्या मनाचा ठाव घेईल. अंतर्मनात रुतुन बसेल. आपली ध्येय स्वतःच्या आवाजात रेकॉर्ड करुन संधी मिळताच पुन्हा पुन्हा ऐकण्यानेही सुप्त मनाला आज्ञा मिळते. त्याला उत्साह मिळतो. आळस. भीती आणि चालढकल करण्याची सवय कुठल्या कुठे पळून जाते.

अवघड वाटणारे कामसुद्धा अंतर्मन आपल्याकडून सहजरीत्या करवून घेते. आधी आपण हे काम का टाळत होतो असा स्वतःलाच प्रश्न पडतो.

सकाळी उठताना सांगितलेली ही प्रक्रिया रात्री झोपी जातानाही मनोभावे रिपीट करा. तुमच्या शरीरातील पेशीपेशीतून निघालेला संदेश ब्रम्हांडापर्यंत पोहोचू दे. तुम्हाला खरोखर उन्नत आणि दर्जेदार आयुष्य जगायचं असेल तर रोज न चुकता व्यायाम आणि ध्यान करा.

ध्यान झाल्यानंतर अनेक लोक झटकन डोळे उघडतात आणि या भौतिक जगात वापस येतात. असे करण्याऐवजी ध्यान पुर्ण झाल्यानंतर मनामध्ये जो मंद मंद सुखावणारा अवकाश तयार झालेला असतो त्याला आपल्या भावी आयुष्यात साध्य करावयाचे आहे त्या सर्व इच्छांनी व्यापून टाका.

पुन्हा एकादा आपली चित्रफीत जिवंत करा. तिचा मनापासून आनंद घ्या. त्या स्वप्नांमध्ये हरवून जा. पाच दहा मिनीटे खरे काय आणि खोटे काय हेच आपल्या अंतर्मनाला कळू नये इतके तल्लीन व्हा.

लॉ ऑफ अट्रॅक्शनची पहिली पायरी व्हिजन बोर्ड बनवणे ही आहे. मनाशी जपलेली सर्व स्वप्ने चित्ररुपात एका भिंतीवर चिटकावून टाकावीत याला व्हिजनबोर्ड म्हणतात. पण जो परिणाम चित्रफित डोळ्यांसमोर जिवंत करुन तिला डोळे, नाक, कान, जीभ आणि त्वचा या पाचही इंद्रियांनी अनुभवण्याने मिळतो, तो परिणाम व्हिजनबोर्ड कडे पाहिल्याने साध्य होत नाही.

अनेक वर्षांच्या अनुभवानंतर मला हेच रहस्य उमगलं आहे की VAF हेच अंतर्मनाशी संपर्क करण्याचं सर्वात प्रभावी माध्यम आहे.

शुभेच्छा आणि धन्यवाद

मनाचे श्लोक

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

2 thoughts on “अंतर्मनाशी संवाद साधण्याचे तीन प्रभावी तंत्र”

  1. ध्यान धारणा करण्यासाठी अतिशय सुरेख माहिती आणि त्याचे फायदे या लेखात दिले आहेत या बद्दल मनापासून धन्यवाद.

    Reply

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय