तोंडाला चव नसणे ‘Aguesia’ – कारणे, लक्षणे आणि त्यावरील घरगुती उपाय 

aguesia marathi

तोंडाला चव नसणे (loss of taste -Taste disorders) हा आजार आहे का? जाणून घ्या काय आहेत त्याची कारणे, लक्षणे आणि त्यावरील घरगुती उपाय

तुम्ही असा कधी विचार केला आहे का की आपले अतिशय आवडते असे एखादे आईस्क्रीम, एखादी भाजी किंवा एखादा चटपटीत पदार्थ ह्यांची जर आपल्याला चवच कळली नाही तर काय होईल?

इंग्रजीत ज्याला ‘लॉस ऑफ टेस्ट’ म्हणतात म्हणजे तोंडाला चव नसणे हे नक्की आहे तरी काय? आज आपण हे सविस्तर पणे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.

तसे तर सर्दी खोकला झाला, ताप आला किंवा कानामध्ये इन्फेक्शन झाले तर तोंडाची चव जाते. तोंडात एक प्रकारची कडवट चव येते आणि खाल्लेल्या पदार्थाची मूळ चव आपल्याला समजत नाही. परंतु हे तात्कालिक असते. झालेला आजार बरा झाला की तोंडाची चव पूर्ववत होते आणि खाल्लेल्या पदार्थांची चव देखील आपल्याला समजू शकते.

परंतु आज आपण ज्या विषयाबद्दल जाणून घेणार आहोत ते आहे तोंडाची चव घेण्याची क्षमता संपूर्णपणे नष्ट होणे ज्याला वैद्यकीय भाषेत ‘एग्युजिया’ असे म्हणतात. हा आजार झालेली व्यक्ती पदार्थाची गोड, तिखट, कडू, आंबट, खारट, मसालेदार अशी वेगवेगळी चव ओळखण्याची क्षमता गमावून बसते.

बऱ्याच लोकांचा ‘एग्यूजिया’ झाला म्हणजे वास घेण्याची क्षमता देखील नाहीशी होते असा समज असतो. परंतु वास घेण्याची क्षमता नाहीशी होण्याला ‘एनोस्मिया’ असे म्हणतात. बरेचदा हे दोन्ही आजार एकाच वेळी एकाच व्यक्तीला होऊ शकतात. परंतु ते वेगवेगळे आहेत हे निश्चित.

एग्युजिया वेगवेगळ्या कारणांमुळे होऊ शकतो. एखाद्या गंभीर आजाराचा साईड-इफेक्ट म्हणूनही तो होऊ शकतो. परंतु त्याबरोबरच वाढत्या वयाचा परिणाम म्हणून देखील हा आजार होऊ शकतो. ज्याप्रमाणे वाढत्या वयाबरोबर दिसण्याची, ऐकण्याची क्षमता कमी होते त्याच प्रमाणे चव ओळखण्याची क्षमता देखील कमी होऊ शकते.

एग्युजिया या आजाराचे वेगवेगळे प्रकार 

१. एग्युजिया – चव ओळखण्याची क्षमता संपूर्णपणे नष्ट होणे

२. हायपोएग्युजिया – चव ओळखण्याची क्षमता काही अंशी नष्ट होणे

३. डिसएग्युजिया – पदार्थाची मूळ चव न लागता एखादी निराळीच सवय लागणे उदाहरणार्थ तोंडात एखाद्या धातूची चव लागणे.

तोंडाची चव नसणे याची लक्षणे 

१. खाल्लेल्या पदार्थांची किंवा पेयांची मूळ चव ओळखता न येणे

२. फक्त मिठाची चव ओळखता न येणे.

३. तोंडात सतत खारट अथवा कडवट चव जाणवणे

४. तोंडात एखाद्या धातूची चव जाणवणे

५. चवीचे प्रमाण कमी जाणवणे

एग्युजिया किंवा तोंडाची चव नसण्याची कारणे 

१. वाढते वय 

सर्दी, खोकला, सायनस, श्वसन संस्थेचे आजार, लाळीच्या ग्रंथींचे आजार, गळ्याला सूज येणे अशासारख्या आजारांच्या इन्फेक्शन मुळे चव घेण्याची क्षमता कमी होऊ शकते.

३. नाकाचा कॅन्सर 

नाकाचा कॅन्सरसारखा गंभीर आजार झाला असता ओळखण्याची क्षमता नष्ट होऊ शकते.

४. तोंडाची स्वच्छता

तोंडाची तसेच दातांची नीट स्वच्छता न राखल्यास, दातांचे, हिरड्यांचे वेगवेगळे आजार झालेले असल्यास किंवा दात किडलेले असल्यास चव ओळखण्याच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो.

५. मेंदूशी निगडीत आजार 

मेंदूशी निगडीत असणारे अल्जाइमर्स, पार्किन्सन्स, सेरेब्रल पाल्सी सारखे आजार झाले असल्यास ओळखण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो.

६. कोविड -१९

तोंडाची ओळखण्याची क्षमता नष्ट होणे हे कोविड १९ चे प्रमुख लक्षण मानले गेले आहे.

७. धूम्रपान 

सातत्याने धूम्रपान केल्यास जिभेवरील चव ओळखणाऱ्या ग्रंथी नष्ट होतात. त्यामुळे त्या व्यक्तीची चव ओळखण्याची क्षमता नष्ट होते.

एग्युजिया वरील वैद्यकीय उपाय 

एग्युजिया तात्कालिक आहे का परमनंट याचे निदान तज्ञ डॉक्टरांकरवी करून घेणे आवश्यक आहे. तात्पुरत्या झालेल्या आजारांचा साईड इफेक्ट म्हणून जर हा आजार झाला असेल तर तो आपोआप बरा होतो.

परंतु जर हा आजार वृद्धापकाळामुळे किंवा इतर कुठल्या गंभीर आजारामुळे होत असेल तर त्यावर योग्य ते औषध उपचार करणे आणि त्या आजारावर नियंत्रण मिळवणे अतिशय आवश्यक असते. नाहीतर हळूहळू हा आजार वाढत जाऊन त्यावर उपचार करणे कठीण होते आणि त्या व्यक्तीची चव ओळखण्याची क्षमता संपूर्णपणे नष्ट होऊन ती पुन्हा परत मिळवणे अशक्य होते.

याव्यतिरिक्त काही घरगुती उपाय करणे देखील शक्य आहे.

१. तोंडाची स्वच्छता ठेवणे,

२. जिभेवरील चव ओळखणाऱ्या ग्रंथी कार्यरत राहण्यासाठी जीभ स्वच्छ ठेवणे,

३. धुम्रपान न करणे,

४. वेळोवेळी दात आणि तोंडाची दंतरोग तज्ञांकडून तपासणी करून घेणे

५. तात्पुरते आजार योग्य औषधे घेऊन लवकरात लवकर बरे करणे.

तर ही आहेत एग्युजिया या आजाराची कारणे आणि लक्षणे. जर तुम्हाला अशी काही लक्षणे आढळली असतील तर त्याचे कारण नक्की शोधून काढा. आवश्यक असल्यास तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या. वर सांगितल्याप्रमाणे तोंडाची स्वच्छता ठेवा.

ह्या आजाराबद्दल फारशी माहिती अजूनही लोकांपर्यंत पोहोचली नाही. त्यामुळे ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी हा लेख शेयर करायला विसरू नका.

Manachetalks

लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजांचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी./ The information is not a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

Manachetalks

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!