मूड चांगला करणारे, सुखाच्या भावना वृद्धिंगत करणारे हार्मोन्स वाढवण्याचे उपाय

पेहले मै परेशान थी..
फिर मै ‘अमुक अमुक’ फन पार्क मे गई..
और फिर मेरा मूड अच्छा हुवा..!!

अशा मजेदार जाहिराती आपण बघतो.. मूड चांगला करण्यासाठी ते फन पार्क, हा कार्यक्रम, तो कॉमेडी शो अशा बऱ्याच जाहिराती दिवसभर टीव्ही वर चालू असतात..

आर्ट क्लासेस, हॉबी क्लासेस असेही मन रिझवण्यासाठी काही उद्योग आपण करू शकतो.. कोणा खास मित्रा मैत्रिणीशी आपले गाऱ्हाणे शेअर करून आपला मूड चांगला करण्याचा प्रयत्नही करतो..

पण हा मूड मुळात खराबच का होतो..??

आनंदी राहणे हा माणसाचा स्थायी भाव.. छोट्या छोट्या गोष्टीतून आपण आनंद मिळवायचा प्रयत्न करतो..

मात्र आयुष्याची गणिते सोडवता सोडवता होतो कधी तरी मूड खराब.. काही तणाव, झोपेची कमतरता, शारीरिक दुखणी, तर कधी शरीरातील प्रथिनांची कमतरता..

ह्या सगळ्या गोष्टी आपल्या मूड स्विंगला कारणीभूत असतात.. आणि त्यासाठी आपण आपले मन रमवण्याचा प्रयत्न करतो..

कोणाला बोर होत असेल, राग आला असेल किंवा उदास वाटत असेल तर त्या व्यक्तीचा मूड ठीक करण्यासाठी आपण धडपडतो.. (याबद्दलच्या लेखाची लिंक शेवटी दिलेली आहे.)

घरातल्या लोकांसाठी चमचमीत पदार्थ बनवले, आणि त्यांना सगळ्यांना ते आवडले तरी त्यांचा आणि आपला मूड छान होतो..

मग आपण स्वतः जेव्हा खराब मूड मध्ये असतो तेव्हा काही पदार्थ खाऊन झटपट स्वतःला ‘बॅक टू हॅपी मूड’ मध्ये आणले तर..??

खाबूगिरी कोणाला आवडत नाही..??

त्यातून कोणाच्या मदतीशिवाय स्वतःला उदास झोन मधून हॅपी झोन मध्ये आणू शकलो तर..?? हे अवघड नाहीये बरं…

काही अन्नपदार्थात आहेतच मुळी असे गुण.. जे तुम्हाला छान तरतरी देतील..

काही पदार्थ जे खाण्यास हानिकारक नाहीत, किंबहुना हेल्दीच असतात ते आपल्या मूड डिसऑर्डर वर मात करण्यास मदतही करतात.. ते कोणते, वाचा या लेखात.

सुरुवातच अशा पदार्थाने करू की तुमचा मूड झटक्यात मस्त होईल..

१. कॉफी: आपल्या सगळ्यांची आवडती कॉफी..

गरम गरम उकळत्या कॉफीचा सुवासही आपल्याला आनंदित करतो.. कॉफी मधले कॅफेन आपल्याला मेंदूला थकव्यापासून दूर करतं आणि तरतरी देतं..

कारण कॉफी प्यायल्यावर मूड सुधारणारे न्यूरोट्रान्समीटर्स शरीरात उफाळून येतात..

डोपामाईन आणि नोरेपाईनफ्राईन, नावं अवघड असली तरी हे दोघे आहेत जे आपल्या मनाचे कल बदलण्यास मदत करतात..

त्यामुळे स्वभाव लहरींना काबूत ठेवसायचे असेल तर एखादी कॉफी होऊन जाऊद्या…

२. डार्क चॉकलेट:

चॉकलेट खाऊन दात किडतात किंवा वजन वाढते ह्या संकल्पना आपल्या डोक्यात चांगल्याच फिट बसलेल्या असतात..

पण चॉकलेट मूड बूस्टर आहे हे कोणीच नाकारू शकत नाही..

रडणाऱ्या लहान मुलांसमोर एक चॉकलेट धरून पहा.. कसे खुदकन हसतील.. झटक्यात रडणे गायब..!!

पण भरपूर साखरयुक्त चॉकलेट न खाणे योग्य.. ह्या अतिगोड चॉकलेट्स पेक्षा मुलांनाही डार्क चॉकलेटची सवय लावा.

एकदा ह्या डार्क चॉकलेटची टेस्ट डेव्हलप झाली तर अतिगोड साखरयुक्त चॉकलेट खावे लागणार नाहीत.

चॉकलेट वजनवाढीस कारणीभूत असले तरी डार्क चॉकलेट्स चे एक दोन तुकडे खाणे गिल्ट फ्री आहे..

डार्क चॉकलेट आपल्या मेंदूतील ‘हॅपी न्यूरोट्रान्समीटर्स’ वाढवतात आणि आपला मूड पटकन ठीक करतात..

३. केळी आणि बेरी (Berry):

न्यूरोट्रान्समीटर्स, डोपामाईन आणि सेरोटीन हे मूड बुस्टर्स आहेत.. जे व्हिटॅमिन ब-६ मुळे वाढीस लागतात..

हे ब-६ तुम्हाला केळ्यातून भरपूर प्रमाणात मिळते..

गोड पदार्थातली साखर नेहमीच आपली भावस्थिती बदलतात.. केळ्यातही फायबर सोबत, साखर असते..

एखादे केळे मूड खराब असता खाल्ले तर फरक आपल्याला लगेच जाणवतो.

रक्तातली साखर कमी झाली असली तरी आपल्याला खूप वैताग, इरिटेशन जाणवते.. ते केळ्याने दूर होते..

कोणत्याही प्रकारची ‘बेरीज् (berries)’ हे चांगले अँटीऑक्सिडेंटस असतात. जे आपल्या शरीराला डीटॉक्सिफाय म्हणजेच हानिकारक द्रव्यातून मुक्त करतात..

‘बेरी’ ह्या जातकुळीतली फळे डिप्रेशन घालवायलाही मदत करतात.. त्यामुळे आपला मूड फ्रेश राहतो..

४. सुका मेवा:

सुका मेवा हा प्रोटिनचा स्रोत आहे. त्याचबरोबर उपयुक्त स्निग्धांश आणि पचनास उपयुक्त फायबर हे दोन्ही त्यातून मिळते.

बदाम, काजू, अक्रोड ह्यांच्या बरोबर कलिंगडातील बिया, तीळ, सुर्यफुलाच्या बिया, लाल भोपळ्याच्या बिया देखील आपल्या शरीराला आणि मनस्वास्थ्याला उत्तम असतात..

ह्यातून अमिनो ऍसिड, हॅपी न्यूरोट्रान्समीटर्स उत्पन्न होतात जे आपल्या उदास मनस्थितीला आनंदी करतात..

५. ओट्स:

डायट करून फिट राहणाऱ्यांना ओट्स चे फायचे माहीतच आहेत..

ओट्स बऱ्याच प्रकारात मिळते जसे ओट्स, म्युसली, ग्रॅनोला.

ह्यापैकी कोणत्याही प्रकारचे ओट्स खाल्ले तरी ते शरीराला फायबरचा पुरवठा करतात..

फायबर हळूहळू आपल्या रक्तातील साखर वाढवतात त्यामुळे आपली एनर्जी लेव्हल योग्य प्रमाणात राहायला मदत होते..

ओट्स मध्ये आयर्न असते जे ऍनिमिया, आळस दूर करते.. शरीरातील इतर तक्रारी दूर झाल्या तर त्यावर अवलंबून असणारा मूड आपोआपच ठीक होतो..

ह्या खास पदार्थांसोबत इतर अन्न पदार्थ जे आपल्या रोजच्या जेवणात असतातच ते देखील आपला मूड प्रसन्न करण्यास उपयोगी ठरतात..

६. शेंगभाज्या आणि कडधान्य:

व्हिटॅमिन ‘बी’ हे मूड बदलणाऱ्या न्यूरोट्रान्समीटर्सना शरीरात वाढवते.

बी-१२ चे प्रमाण शरीरात योग्य असणे तर फार गरजेचे आहे..

जे नसल्यास डिप्रेशन, मूड डिसऑर्डर, स्मरणशक्तीचा नाश संभवतो..

झिंक, मॅग्नेशियम, सेलेनियम अशी मिनरल्स सुद्धा शरीराला आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी फार गरजेचे आहेत..

आणि ही सगळी गरज भरून काढण्यासाठी आपल्या आहारात शेंगभाज्या आणि सगळ्या प्रकारची कडधान्य असणे फार फार आवश्यक आहे.. करण शेंगभाज्या आणि कडधान्य व्हिटॅमिन ‘बी’ चे मुख्य स्रोत आहेत..

७. फरमेंटेड अन्नपदार्थ:

शरीराला उपयुक्त अशा विविध बॅक्टेरियांमुळे फरमेन्टेशन होते. दही, डोश्याचे पीठ, मद्य हे फरमेंटेड पदार्थ आहेत..

त्यातील दही हे रोज खाल्ले पाहिजे. हे उपयुक्त बॅक्टेरिया पोट, पचन आणि सरतेशेवटी मूड ह्या सगळ्यांचीच काळजी घेतात..

पोटाच्या तक्रारी नसतील तर हॅपी न्यूरोट्रान्समीटर्स आपल्याआपण निर्माण होतात. आणि सुदृढ शरीर, मन आनंदी ठेवण्यास मदत करते..

८. ओमेगा-३ फॅटी ऍसिड देणारे मासे:

ओमेगा-३ मेंदूच्या वाढीला चालना देते, मेंदूचे आरोग्य राखण्यास मदत करते..

मेंदूचे आरोग्य उत्तम असल्यास मूड ताजातवाना करणारे न्यूरोट्रान्समीटर्स सतत निर्माण होत रहातात. आणि इव्हेंच्युअली आपण आनंदात असतो..

हे ओमेगा-३ मिळवण्याचा महत्वाचा सोर्स म्हणजे हे फॅटी ऍसिड असणारे मासे..

रावस (Salmon) आणि टुना फिश हे दोन्ही मासे तुमच्या आहारात असणे फायद्याचे आहे..

खाणे पिणे आणि मूड ह्यांचा एकमेकांशी घनिष्ठ संबंध आहे. डिप्रेशनचे शिकार झालेली माणसे आपले अनुभव सांगताना हे आवर्जून सांगतात की कित्येकवेळा खात राहिल्याने त्यांना बरे वाटलेले आहे..

पण ज्यांचे वजन पटकन वाढते किंवा ज्यांचे वजन खूप जास्ती आहे त्यांनी मूड आनंदी करण्यासाठी खाताना स्वतःवर ताबा ठेवणे गरजेचे आहे..

गोड पदार्थ मूड नक्कीच चांगला करतात मात्र रक्तातली साखरही वाढवतात. त्यामुळे डायबेटीस असणारे किंवा अतीलठ्ठ माणसांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच असे पदार्थ खावेत.

पदार्थाचा सुवास, त्याचे प्रेझेन्टेशन सुद्धा जर आपला मूड चांगला करत असेल तर ते खाल्ल्यावर आपण नक्कीच प्रसन्न होऊ.. त्यामुळे वर दिलेले पदार्थ प्रमाणात सेवन केल्यास तुम्हाला फरक नक्कीच जाणवेल.. म्हणून असे पदार्थ खाल्लेच पाहिजेत..

इट द फूड दॅट चेंजेस युवर मूड..!!

द ग्रेट इंडियन डाएट (सर्वोत्तम भारतीय आहार) हे पुस्तक ऑनलाईन खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय