श्रीमंत व्हायचं असेल तर, हर्षद मेहता कडून शिकण्यासारख्या काही चांगल्या गोष्टी

लेखाचे शीर्षक वाचून थक्क झालात ना? “हर्षद मेहता“ हे नाव भारतीयांच्या चांगलेच परिचयाचे आहे. मध्यंतरी आलेल्या “द बिग बूल” सिनेमा आणि “स्कॅम १९९२“ ह्या वेब सिरीज मुळे हे नाव पुन्हा एकदा चांगलेच चर्चेत आले आहे.

सामान्य गुंतवणूकदार ते शेअर मार्केट मधील अनभिषिक्त सम्राट हा हर्षद मेहताचा प्रवास थक्क करणारा आहे. परंतु सहजपणे मिळणाऱ्या पैशाची त्याला हाव सुटली आणि नंतर त्याच्या वागणुकीला गुन्हेगारी वळण लागले हे मात्र खरे आहे.

द बिग बूल हा सिनेमा आणि स्कॅम १९९२ ही वेब सिरीज हर्षद मेहताच्या जीवनात घडलेल्या सर्व नाट्यमय प्रसंगांचे आपल्याला दर्शन घडवतात.

हर्षद मेहताच्या जीवनाला पुढे गुन्हेगारी वळण लागले असले तरीही सुरुवातीला शेअर मार्केटच्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी त्याने केलेले प्रयत्न नाकारता येणार नाहीत.

प्रत्येक गोष्टीतील चांगले तेवढे घ्यायचे या न्यायाने आज आपण हर्षद मेहता कडून शिकण्यासारख्या चांगल्या गोष्टी कोणत्या आहेत हे पाहणार आहोत.

१. Learning is life – सतत शिकत राहा.

सतत नवीन-नवीन काहीतरी शिकणे हा जीवनात यशस्वी होण्याचा मार्ग आहे. हर्षद मेहताने जेव्हा स्टॉक मार्केट मध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली तेव्हा त्याला या क्षेत्राबद्दल शून्य माहिती होती. परंतु या क्षेत्रातील सर्व बारकावे शिकून घेण्याच्या उद्देशाने त्याने सुरुवातीला जॉबर म्हणून या क्षेत्रात नोकरी घेतली.

शेअर मार्केट क्षेत्रातील सर्व बारकावे भराभर शिकून घेऊन त्याने स्वतःचे ट्रेडिंग अकाउंट उघडले आणि पैसे कमावण्यास सुरुवात केली. यातून आपल्याला शिकण्यासारखी गोष्ट अशी की जे ज्ञान आपल्या जवळ नाही ते मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावे मगच आपण जीवनात यशस्वी होऊ शकतो.

२. The biggest risk is not taking any risk – कोणतीही जोखीम न पत्करणे हीच मोठी जोखीम आहे.

हे प्रसिद्ध वाक्य मार्क झुकेरबर्ग यांचे आहे. परंतु हर्षद मेहताच्या जीवनात या वाक्याचे फार मोठे महत्त्व दिसून येते. फारसे काही नॉलेज नसताना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचे धाडस हर्षद मेहताने दाखवले.

जर अशा प्रकारचे धाडस त्यांनी दाखवले नसते तर इतक्या मोठ्या प्रमाणावर पैसा कमावण्यात तो यशस्वी ठरला नसता. जीवनात योग्य प्रकारची जोखीम स्वीकारली तरच यश मिळू शकते हे खरे आहे. यातून आपल्याला शिकण्यासारखी गोष्ट अशी की जर समोर संधी उपलब्ध असेल परंतु त्यात थोडीफार जोखीम असेल, धाडस दाखवणे आवश्यक असेल तर ते जरूर करावे. अर्थात योग्य तो बॅकअप प्लॅन ठेवूनच.

३. Money attracts money – पैसा पैशाकडेच जातो.

स्टॉक मार्केटच्या मदतीने ही गोष्ट हर्षद मेहताने सिद्ध करून दाखवली. जवळ असलेल्या पैशातून आणखीन पैशाची निर्मिती करता येऊ शकते हे त्याने दाखवून दिले. आपल्याजवळ असलेला पैसा योग्य प्रकारे गुंतवला तर त्याची वाढ होते हे निश्चित.

यातून आपल्याला शिकण्यासारखी गोष्ट ही की आपल्याजवळ असलेला थोडा पैसा देखील योग्य प्रकारे गुंतवला तर त्याची निश्चितपणे वाढ होऊन आपल्याला मोठी रक्कम मिळू शकते. परंतु आपण जर पैसे गुंतवले नाही तर ते वाढण्याची शक्यता नसते.

४. Team is important – यश मिळवायचे असेल तर चांगल्या सहकाऱ्यांची जोड आवश्यक असते.

कोणताही व्यवसाय अथवा स्टॉक मार्केट मधील गुंतवणूक यशस्वी करायची असेल तर ते एकट्या-दुकट्याचे काम नव्हे. कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी हुशार आणि कामात तत्पर असणाऱ्या सहकाऱ्यांची जोड मिळणे फार आवश्यक असते.

यावरून शिकण्यासारखी गोष्ट अशी की कोणत्याही नव्या गोष्टीची सुरुवात करताना आपली एक टीम तयार करणे फार आवश्‍यक असते. त्यामुळे एकट्या वरच कामाचा सगळा भार न पडता कामे वाटली जाऊन ती जास्त इफेक्टिवेली होतात.

५. Become expert in the subject – आपल्या क्षेत्रातील तज्ञ बना.

तुम्ही ज्या क्षेत्रात काम करणार आहात त्या क्षेत्रातील सर्वोत्तम तज्ञ तुम्ही असणे हे यशस्वी होण्यासाठी अतिशय आवश्यक असते. स्टॉक मार्केट मध्ये उतरताना हर्षद मेहताने त्या क्षेत्राची संपूर्ण माहिती मिळवून तो त्यातील तज्ञ बनला होता.

त्यामुळे त्याला कॅलक्युलेटेड रिस्क घेऊन योग्य स्टॉक मध्ये श्रीमंत होता आले. यातून आपण शिकण्यासारखी गोष्ट ही की कोणत्याही क्षेत्रात पाऊल टाकताना त्या क्षेत्राची संपूर्ण माहिती आधी मिळवणे आणि त्यातील तज्ञ बनणे ही यशस्वी होण्याची गुरुकिल्ली आहे.

६. Trust is everything – विश्वास अतिशय महत्त्वाचा असतो.

हर्षद मेहताच्या आयुष्यातून शिकण्यासाठी ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. सुरुवातीला स्टॉक मार्केट मध्ये यशस्वी होत असताना तो अनेकांचा हीरो होता. लोक त्याच्याकडे आदर्श म्हणून पाहत होते.

परंतु जेव्हा त्याने काही बेकायदेशीर गोष्टी केल्या, घोटाळे केले तेव्हा लोकांचा त्याच्यावरील विश्वास त्याने गमावला. तो करत असलेल्या व्यवहारांची विश्वासार्हता गेल्यामुळे तो पकडला जाऊन त्याला जेलची हवा खावी लागली.

यातून आपल्याला शिकण्यासारखी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जे काही व्यवहार करू ते सर्व सचोटीने आणि योग्य प्रकारे केले पाहिजेत. चुकीच्या मार्गाने मिळालेले यश तात्पुरते असते. त्याचे पर्यवसान शिक्षेमध्येच होते. बेकायदेशीर रीतीने कमावलेला पैसा कधीही उपयोगी पडू शकत नाही. व्यवसायामध्ये माणसाची पत, त्याची सचोटी हीच जास्त महत्त्वाची ठरते.

७. Never make investment by taking loan – कोणतीही गुंतवणूक करताना ती कर्ज काढून करू नका.

कोणतीही गुंतवणूक करताना ती आपल्याजवळ शिल्लक असलेल्या रकमेतून करणे अतिशय आवश्यक असते. हर्षद मेहताने मोठ मोठी लोन घेऊन स्टॉक मार्केट मध्ये गुंतवणूक केली. त्यासाठी त्याने बेकायदेशीर मार्गांचा अवलंब केला.

परंतु स्टॉक मार्केट अतिशय सेन्सिटिव्ह असल्यामुळे सतत यश मिळेल आणि पैसा वाढेल याची त्या क्षेत्रात खात्री नसते. हर्षद मेहताच्या बाबतीत असेच झाले. शेअर बाजारात फटका बसल्यामुळे घेतलेले कर्ज तो फेडू शकला नाही. आणि त्यामुळे तो स्वतः केलेल्या चुकांमध्ये अडकत गेला आणि त्याचे पर्यवसान जेलमध्ये जाण्यात झाले.

यातून आपण शिकण्यासारखी गोष्ट ही की कोणतीही गुंतवणूक करताना आपल्याजवळ जेवढी रक्कम शिल्लक असेल तीच रक्कम गुंतवावी आणि ती रक्कम वाढवण्याचा प्रयत्न करावा. उधार उसनवार करून, कर्ज काढून केलेली गुंतवणूक जर योग्य प्रमाणात वाढली नाही तर त्याची परतफेड करणे आपल्याला शक्य होणार नाही आणि आपल्यावरील कर्जाचा बोजा वाढत जाईल.

तर मित्र-मैत्रिणींनो या आहेत अशा सात गोष्टी ज्या हर्षद मेहताच्या जीवनाकडून आपल्याला शिकण्यासारख्या आहेत. यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बेकायदेशीर मार्गाने, चुकीच्या पद्धतीने पैसा कमावण्याचा प्रयत्न कधीही करू नये. अशा प्रकारे यशस्वी होणे भल्याभल्यांना शक्य होत नाही. सुरुवातीला जरी यश मिळाले तरी चुकीच्या मार्गाने मिळवलेले यश याचा शेवट नेहमी वाईटच असतो.

सचोटीने केलेली गुंतवणूक नेहमीच वाढते आणि भरपूर यश देते. तर मित्र-मैत्रिणींनो तुम्ही देखील योग्य प्रकारे गुंतवणूक करा आणि श्रीमंत बना.

असेच मनाचेTalks चे विविध लेख तुम्ही ऍमेझॉन किंडल वर जाहिरातींविना वाचू शकाल.

रहस्य जगण्याचे : समाधानी आयुष्याचे पुस्तक अमेझॉनवर खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.

रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ Instagram वर मनाचेTalks ला फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय