गिऱ्हाईक

customer

“अरे …..!! तीच ना त्यादिवशीची हिरोईन…?? झकपक कपडे आणि मेकअप करून बाहेर पडणाऱ्या मायाला पाहून तो पुटपुटला. नेहमीसारखा गिऱ्हाईकाची वाट पहात असताना ती त्याला दिसली. काही न बोलता तो तिच्यासमोर जाऊन उभा राहिला. त्यालासमोर पाहून माया चपापली.

सकाळी सहाचा गजर होताच मायाने सवयीनुसार डोळे उघडले आणि तिचे लक्ष त्याच्याकडे गेले. क्षणभर तिला कळलेच नाही कोण आहे हा.. ??? आपण कुठे आहोत… .?? मग हळू हळू तिला कालच्या घटना आठवल्या. शांतपणे बाजूला झोपलेल्या त्याच्याकडे पाहत ती एकदम उठली आणि कमरेत जोरात लाथ मारून त्याला उठवले.

“उठ हरामी ….चल निघ इथून. संपली तुझी ड्युटी….” तिने चिडून सांगितले.

तसा तो खडबडून जागा झाला. ओशाळवाणे हसत आपले कपडे गोळा केले. तिने पर्समधून काही नोटा काढून त्याच्या अंगावर फेकल्या.

“चल निकल अभी…..

त्याने नोटा मोजल्या आणि बस इतनाही असा प्रश्नार्थक चेहरा केला.

“तो…? दो घंटेका किताना दु तुझे …?? साला छे घंटा तो सोया इधर आरामसे. त्याला फटकारले.

त्याचा चेहरा बघून तिला आतमध्ये आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या.

साली … पूर्ण रात्रभर घोरत होती. तोंडाला गुटख्याचा वास मारत होता. मध्येच मारत ही होती तरी सहन केले हिला तरी वर पैसेही कमी देते…… मनातल्या मनात चरफडत त्याने कपडे घातले आणि पैसे गोळा करून तो बाहेर पडला.

एका महिन्यानंतर……

“अरे …..!! तीच ना त्यादिवशीची हिरोईन…?? झकपक कपडे आणि मेकअप करून बाहेर पडणाऱ्या मायाला पाहून तो पुटपुटला. नेहमीसारखा गिऱ्हाईकाची वाट पहात असताना ती त्याला दिसली. काही न बोलता तो तिच्यासमोर जाऊन उभा राहिला. त्यालासमोर पाहून माया चपापली.

“मॅडम…. तुम्ही पण माझ्याचसारखे की काय ..?? त्याने छद्मीपणे विचारले.

काही न बोलता ती नुसती हसली. बाजूच्या गार्डन रेस्टॉरंटमध्ये त्याला घेऊन गेली.

कोल्डड्रिंकचा एक सीप घेऊन म्हणाली….”होय….. मी तुझ्यासारखीच आहे. धंदा करते. गिऱ्हाईकाच्या शिव्या खाते. मारही खाते. घामट शरीराचा, गुटका दारूच्या तोंडाचा वास सहन करते. मनाविरुद्ध घाणेरडे प्रकार करते. काय करू शेवटी धंदा आहे ना ??? पण त्यादिवशी वाटले नेहमी आपणच का गिऱ्हाईक शोधायचे, अंगावर घ्यायचे. त्यापेक्षा आपणच गिऱ्हाईक बनवू एखादा कधीतरी….. त्याला हवे तसे नाचवू आपल्या तालावर. त्यालाही कळू दे घामाचा वास कसा असतो. दारू आणि गुटख्याच्या तोंडात तोंड घालताना कसे वाटते. सर्व करून झाल्यावर शिव्या ऐकताना आणि फेकलेले पैसे गोळा करताना काय वाटते ??? तू आलास नशिबात माझ्या. मग सगळी चीड तुझ्यावर निघाली. त्या दिवशी जे जे काही मनात होते ते सर्व मी तुझ्याशी केले. पैश्याची मस्ती काय असते ते अनुभवले. एक गिऱ्हाईक बनून त्याचा आनंद उपभोगला मी. खूप खुश होते त्या दिवशी. दर महिन्यातून एकदा हा आनंद उपभोगायला काय हरकत आहे….”

आलेल्या वेटरला बिल देऊन त्याला डोळा मारत ती बाहेर पडली.

वाचण्यासारखे आणखी काही…..

आमचा हरी
सिझरिंग
तिची ही होळी


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.