जगण्यात जादू करणारी ‘पुनरावृत्तीची शक्ती’ / ‘पॉवर ऑफ रिपीटेशन’

law of attraction power of repetition marathi

जुन्या चित्रपटांची गाणी खुपच कर्णमधूर असायची. त्या गाण्यांचे शब्द, त्या गाण्याचं संगीत काळजाचा ठाव घ्यायचं. आजकाल मात्र तशी आवर्जून ऐकावीत, पुन्हा पुन्हा गुणगुणावीत अशी श्रवणीय गाणी खुपच कमी बनतात. आजकाल अर्थहीन आणि धांगडधिंगा गाणी बनवण्याचे प्रमाण खूप वाढले आहे.

एकदिड वर्षांखाली आमचा टी.व्ही चालू होता तेव्हाची गोष्ट! तेव्हा हाऊसफूल चार नावाचा अक्षयकुमार आणि इतर मंडळींचा एक विनोदी चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला होता. त्यामध्ये बाला, बाला, बाला असे एक गाणे होते. मी ते गाणे पहिल्यांदा ऐकले आणि अक्षयकूमारला त्यावर चित्रविचित्र अंगविक्षेप करताना पाहिले मला खरोखर त्या गाण्याची किळसच आली.

पण म्युझिक चॅनेलवर प्रत्येक पाच मिनिटाला त्या गाण्याची क्लिप चालवली जायची. युट्युबला कोणताही व्हिडीओ लावले की ‘बाला’च पुढे येऊन नाचू लागायचा. इंडियन आयडॉल, डान्स इंडिया डान्स वगैरे शो मध्ये बाला व्हायचंच.

त्या दिवसांमध्ये मी ‘बाला, बाला, बाला’ हे गाणं इतक्या वेळा कानावर पडलं (की लादलं), मी शांत बसलेलं असतानाही माझ्या कानात मला ‘बाला, बाला’च बोल ऐकू यायला लागले. एकेकाळी त्या गाण्याचा हेट करणारा मी पण मला चक्क ते अर्थहीन आणि बेसुरं गाणं ऐकायची इच्छा होऊ लागली आणि मी ते गाणं लूपमध्ये ऐकू लागलो.

तुमच्यासोबत कधी अशी घटना घडली आहे का? जी गोष्ट आपल्याला आवडत नाही तीच गोष्ट सतत सतत मनावर बिंबवल्यामूळे ती आपल्याला हवीहवीशी वाटू लागते आणि पुढे पुढे आपण त्यासाठी ऍडिक्ट होतो. यालाच म्हणतात पॉवर ऑफ रिपिटेशन.

याला म्हणतात पुनरावृत्तीची शक्ती. तुम्ही ऐकले असेल की रोज रोज एकाच गोष्टीचा प्रचार करुन लोकांचे वेगवेगळ्या कारणांसाठी ब्रेनवॉश केले जाते. आकर्षणाच्या सिद्धांत सुद्धा आपल्या उदात्त ध्येयांसाठी पुनरावृत्ती करायला शिकवतो. एकदा दोनदा किंवा दहावेळा रिपीट केली ती फक्त इच्छाच असते.

शेकडो वेळा किंवा हजारो वेळा जो पुन्हा पुन्हा स्मरण केला जातो, मनःपटलावर घोटून घोटून गिरवला जातो त्याला संकल्प म्हणतात. पुनरावृत्ती केल्यामूळे संकल्प अंतर्मनात खोलवर रुतून बसतात.

माणूस तीन प्रकारे व्यक्त होवू शकतो.

१) बोलणे.

२) ऐकणे.

३) लिहणे.

आपण दिवसभर बोलत असतो. आपली ध्येय इतरांना पुन्हा पुन्हा सांगावीत हे बऱ्याच वेळा शक्य नसते. एकतर इतक्या भरवशाचे लोक आपल्याजवळ नसतात.

प्रत्येक माणसामध्ये अहंकार आणि मत्सर हे गूण असल्यामूळे तुमच्या मोठमोठ्या स्वप्नांना समोरची व्यक्ती भरभरुन प्रोत्साहन देईल असे खूपच कमी वेळा घडते.

अंतर्मनाशी संवाद करण्याचे दुसरे प्रभावी तंत्र म्हणजे ऐकणे. आपण आपली ध्येय मोबाईलमध्ये मंद संगीताच्या पार्श्वभूमीवर, शांत आणि प्रसन्न आवाजात रेकॉर्ड करावीत आणि वॉकिंग करताना, रात्री झोपण्याआधी ती आवर्जून ऐकावीत. रोज रोज स्वतःला योग्य त्या मार्गावर नेण्याचा आणि रस्ता भटकलाच तर परत रुळावर आणण्याचा हा एक अफलातून मार्ग आहे.

पुनरावृत्ती करुन स्वैर कल्पनाविलासाला साकार रुपात प्रकट करण्याचा तिसरा आणि सर्वात प्रभावी रस्ता आहे तो म्हणजे लिहणे. आपण जेव्हा एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा शेकडो वेळा लिहतो, तेव्हा आपण आपली नियतीच जणू आपल्या स्वतःच्या हातांनी लिहत असतो.

आजही अनेक घरांमध्ये फावल्या वेळांमध्ये कोऱ्या कागदांवर राम, राम लिहणारे वयोवृद्ध आज्जी आजोबा तुम्हाला दिसतील.

शीख धर्मामध्ये वाहे गुरु, वाहे गुरु असे लक्षावधी वेळा लिहल्याने मोक्षप्राप्ती मिळते अशी मान्यता आहे. कागदावर लिहणे किंवा तोंडाने लक्षावधी कोट्यावधी वेळा देवाच्या नामाचा जप करणे हे थोतांड नाही. हे विज्ञान आहे. हे दुसरे तिसरे काही नसून ही पुनरावृत्तीची शक्ती आहे.

एखाद्या गोष्टीवर मन एकाग्र करायचं असेल रिपिटेशन म्हणजे पुनरावृत्ती सारखा दुसरा सोपा आणि परिणामकारक टुल उपलब्ध नाही. हे खूप प्रभावी साधन आहे. भगवंताचं नाम अखंडपणे न कंटाळता लिहल्याने इतर इच्छा गळून पडतात आणि उठता बसता, खाताना पिताना मन फक्त देवातच एकरुप होते.

जर नाम लिहून लिहून भगवंताची प्राप्ती केली जाऊ शकते तर आपले ध्येय उत्साहाने पुन्हा पुन्हा शेकडो वेळा लिहून काढून आपल्या इच्छा, आपली स्वप्ने, आपल्याला हव्या आहेत त्या भौतिक वस्तु का प्राप्त करता येणार नाहीत?

आज मी तुम्हाला ज्या टेक्निकबद्द्ल सांगणार आहे त्याला आकर्षणाच्या सिद्धांतामध्ये पंचावन्न गुणिले पाच अशा नावाने ओळखतात. आपल्यापैकी कोणाला त्याचा ड्रीम जॉब हवा असेल.

एखाद्याची व्यापार-व्यवसाय वाढावा अशी मनोमन तीव्र इच्छा असेल. कोणी आपल्यासाठी अनुरुप अशा जोडीदाराच्या शोधात असेल. एखाद्याने आर्थिक स्वतंत्र बनण्याचे ध्येय समोर ठेवले असेल.

तुमची सर्वात महत्वाची एक इच्छा निवडा आणि चालू वर्तमानकाळात ती इच्छा पुर्ण होत आहे असे एक वाक्य बनवा.

१) मला टाटा कन्सल्टंसी सर्व्हिसेस या कंपनीमध्ये माझा ड्रिमजॉब मिळाला आहे.

२) चालू वर्षात मला माझ्या व्यवसायातून दहा कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

३) सुंदर, प्रेमळ आणि मला अनुरुप अशा जोडीदाराशी माझे लग्न होत आहे.

तुम्ही बनवलेले ध्येयवाक्य साधे सोपे नेमके आणि शक्य तितके छोटे असावे. तुम्हाला हवे तर तुम्ही डिटेल सुद्धा बनवू शकता. हे वाक्य तुम्हाला लिहून लिहून अंतर्मनात मुरवायचे असेल तर तुम्हाला थोडेसे कष्ट घ्यावे लागतील पण रिझल्ट्स शंभर टक्के मिळतील.

हे वाक्य लवकरात लवकर खरे व्हावे, साकार व्हावे, अशी तुमची इच्छा असेल येत्या पाच दिवसांमध्ये दररोज पंचावन्न वेळा तुम्हाला हे वाक्य पेनने एका रजिस्टरमध्ये लिहायचे आहे. शक्यतो एका बैठकीत पंचावन्न वेळा हे वाक्य लिहून काढा. पाच मिनिटांचा ब्रेक घेतला तर हरकत नाही पण आपण जेव्हा सलगपणे लिहतो तेव्हा एका प्रकारच्या भावसमाधीत जातो.

तुमच्या मनातील इतर सर्व विचारांचा गोंधळ, कलकलाट आणि गोंगाट नाहीसा होवून तुमच्या चित्तवृत्ती फक्त त्या एकाच वाक्यावर एकाग्र होतात. तुमच्या शरीरातील पेशीपेशींमध्ये तुमचे ते ध्येय झिरपते. एडमंड हिलरीला एव्हरेस्ट सर करायचा होता. १९८३ च्या विश्वकप सामन्याच्या अंतिमसामन्याच्या दिवशी सचिन फक्त सात वर्षांचा होता. पण त्या रात्री तो झोपला नाही. मी ही एके दिवशी असाच विश्वकप उंचावीन असे स्वप्न त्याने रंगवले होते आणि अखेर सहा वेळा हुलकावण्या दिल्यानंतर २०११ मध्ये त्याने ते खरे करुनच दाखवले.

गेल्या पंचवीस वर्षात विराट कोहलीने गोड पदार्थाचा तुकडा आपल्या जीभेवर ठेवला नाही. जगातला सर्वात उत्कृष्ट दर्जाचा एथलिट बनण्याचे त्याचे स्वप्न त्याने साकार केले आहे.

ज्या लोकांकडे स्पष्टता असते तेच आयुष्यात प्रगती करु शकतात. ध्येयवाक्य बनवणे आणि ते एका आठवड्यात दोनशे पंच्याहत्तर वेळा लिहून काढणे आपल्या अंतर्मनाला स्पष्ट दिशा देते. त्यानूसार पुढचे काम अंतर्मनाकडून पार पाडले जाते.

अनेक लोकांना वाटते मला लॉ ऑफ अट्रॅक्शन माहित आहे. पाच वर्षांपुर्वी माझा जेव्हा या क्षेत्रात प्रवास सुरु झाला होता मला माझ्या गुरुजींनी एक वाक्य सांगितले होते.

“आकर्षणाचा सिद्धांत मला पुर्णपणे कळाला अशा भ्रमात कधीही राहू नको. प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्ट नव्याने ऐकतो आहेस, नव्याने वाचतो आहेस असा अविर्भाव ठेवशील तर खरी प्रगती करशील.”

एखादी गोष्ट नुसतीच जाणून घेणे आणि ती खरोखर वापरणे यामध्ये जमीन अस्मानचा फरक आहे. आकर्षणाच्या सिद्धांताच्या बाबतीत ही गोष्ट जरा जास्तच लागू होते.

आभार आणि शुभेच्छा

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

Manachetalks

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

You may also like...

3 Responses

  1. Pankaj Gangadhar Jadhav says:

    मी तुमचा नियमित वाचक आहे. खूप खूप धन्यवाद तुमच्या कडून खूप काही शिकायला मिळाले…

  2. pankaj kotalwar says:

    आपले मन:पूर्वक आभार!..

  3. सागर पाटील says:

    खुपच सुंदरलेख👌🏻

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!