संकल्प ते सिद्धी : शब्द जे तुमचे आयुष्य घडवतील

मनात येणाऱ्या विचारांमूळे भावनांची निर्मिती होते. तुमच्यासोबतही असं होतं का, की एखाद्या दिवशी उगीचच तुमचा ‘मुड ऑफ’ असतो.

आपली उर्जा कमी झाली असे जाणवताक्षणी तपासून पहा, त्याआधी काही वेळ तुमच्या मनात कोणते विचार रेंगाळत होते?

विचार आपल्या भावनांवर परिणाम करतात. विचार आपल्या शरीरावर परिणाम करतात. ज्या दिवशी आपण थकून भागून दिवसभर काम करुन घरी आलेले असतो त्या दिवशी आपण सहज बोलून जातो, “आजचा दिवस खुपच हेक्टीक होता. आज माझे अंग ठणकत आहे.” हे ऐकल्यानंतर काळजीपोटी आणि अजाणतेपणी आपल्या घरातील इतर सदस्य ‘खराब तब्येत’, ‘अंगदुखी’, ‘डोकेदुखी’ याच विचारांना आपल्यावर प्रक्षेपित करतात.

आपल्या मनातील विचारांमध्ये किंवा व्हायब्रेशन्समध्ये एकमेकांना प्रभावित करायची शक्ती असते याचा अनुभव तुम्ही प्रत्येकाने कधी ना कधी घेतला असेल.

एक प्रयोग करुन पहा. आत्ता या क्षणी मोठ्याने एक वाक्य म्हणा. “मला छान वाटत आहे. मी आनंदी आहे.” असं उच्चारताक्षणी तुमच्या मनामध्ये अदृश्य आनंदलहरींचा उगम झाला.

ही शब्दांची ताकत आहे. ही शब्दांची जादु आहे. विचार भावनांना जन्म देतात. भावना प्रबळ झाली की ती माणसाला कृती करण्यास भाग पाडते. एकच कृती वारंवार करत राहील्यास पुढे ती सवय बनते.

जशा सवयी तसे व्यक्तिमत्व घडते आणि जितके उच्च व्यक्तिमत्व, तितके उच्च ध्येय आपल्याला प्राप्त होते. सगळा खेळ विचारांचा आहे. आपल्या भावी आयुष्याचा उगम विचारांमध्येच दडलेला आहे.

ज्याच्या मेंदुमध्ये विचारांचे अदभूत समीकरण कायमचे फिट झाले त्याच्यासमोर आयुष्याचे गुपितच उलगडले असे मानायला हरकत नाही.

विचार, भावना, दृष्टिकोन, कृती, सवयी, व्यक्तिमत्व, ध्येयप्राप्ती मनात चुकीच्या विचारांची पेरणी झाल्यामूळे अनेकांची आयुष्य कायमची उध्वस्त होतात.

त्याउलट मनात जाणीवपुर्वक चांगल्या आणि उत्तमोत्तम उदात्त विचारांचे सर्जन केल्यामूळे अनेकांच्या आयुष्याला अभुतपुर्व अशी कलाटणी मिळते. विचारच परिस्थितीचं सर्जन करतात हे रहस्य भारतीय संस्कृतीमध्ये हजारो वर्षांपुर्वी सांगून ठेवले आहे.

श्रीमदभगवतगीतेमध्येसुद्धा श्रीकृष्ण भगवान अर्जुनाला ‘संकल्पातून सिद्धी प्राप्त होते.’ असे पटवून देतात.

विचार भविष्य घडवत आहेत हे समजले की पन्नास टक्के काम झाले. ‘मनात येणाऱ्या विचारांना नियंत्रित कसे करावे’ हे शिकून घेतले की उरलेले पन्नास टक्के काम फत्ते होते.

मनात येणाऱ्या विचारांना शब्दांचा वापर करुन आपल्या बाजूने वळवता येते. “मी खुप थकलो आहे. मी खुप दमलो आहे. माझा मुड चांगला नाही.” अशी वाक्ये उच्चारण्याऐवजी तुम्ही “मी आनंदी आहे. मी उत्साही आहे. माझ्यामध्ये सकारात्मक उर्जेचा झरा वाहत आहे.” अशी वाक्ये उच्चारुन बघा.

काही क्षणात तुमच्या मुडमध्ये आश्चर्यकारक वेगाने बदल होत असल्याचे तुमच्या लक्षात येईल.

तुमचा थकवा, तुमची निराशा, निरुत्साह कूठल्या कुठे पळून जातील. “माझ्याकडे पुरेसे पैसे नाहीत. मी गरीब आहे. येणारा काळ अवघड आहे. पैसे कमवणे सोपे राहीले नाही. माझ्याकडे काय पैशाचे झाड आहे काय? माझ्या हातात पैसा टिकत नाही.

ही वाक्ये माणसाला गरीबीकडेच घेऊन जातात. त्या ऐवजी “मी संपत्तीवान आहे. मी माझी बुद्धी आणि उर्जा वापरुन मला हव्या तेवढ्या संपत्तीचे सर्जन मी करु शकतो. पैशाला आकर्षित करण्याचे तंत्र मी आत्मसात करत आहे, हा विचार आत्मविश्वासामध्ये भर टाकेल.

हा विचारच आपल्याला उज्ज्वल भविष्यकाळाकडे घेऊन जाईल.

माझे गुरुजी आम्हाला गंमतीत समजाऊन सांगायचे की कधीही तुमच्या तोंडून अशुभ वाक्यांचा उच्चार करु नका.

चोवीस तासात आपण जेवढी वाक्ये बोलतो, त्यापैकी एका वाक्याला सरस्वती ‘तथास्तू’ असा आशिर्वाद देते.

आपण उच्चारलेले शब्द आपल्यासाठी वरदानच बनतील, अशीच वाक्ये बोलण्याचा सराव करा.

एखादा माणूस यशस्वी होतो आणि एखादा माणूस अपयशी राहतो याला कारणीभूत शब्दांचा खेळ आहे.

शब्दांमूळेच आपली इतरांशी दोस्ती होते. शब्दांमूळेच आपली अनेकांशी कायमची दुष्मनी होते. शब्दांमूळे माणसं जोडली जातात आणि शब्दांमूळेच माणसं कायमची दुखावली जातात.

इतरांसारखं आपण मनातल्या मनात उच्चारलेले शब्दसुद्धा आपल्यासाठी संधी निर्माण करतात किंवा आपल्यापुढे असलेल्या समस्यांमध्ये भर टाकतात.

शब्दांमध्ये परिस्थिती बदलण्याचे सामर्थ्य आहे हे समजल्यावर पाश्चात्य लोकांनी ‘स्वीचवर्ड’ नावाचा एक उपाय शोधून काढला.

जो तुफान लोकप्रिय झाला. लाखो लोक आपल्या मनातील भावनांना बदलण्यासाठी आणि हवे तसे परिणाम साधण्यासाठी ‘स्वीचवर्डचा’ वापर करतात.

स्वीचवर्ड हा एक साधा इंग्रजी शब्द असतो. स्वीचवर्ड आपल्या अंतर्मनाला प्रभावित करतात.

एखादा स्वीचवर्डचा जाणीवपुर्वक वारंवार उच्चार करणे म्हणजे एक प्रकारे ती क्रिया करण्यासाठी मनाला आदेश देणे.

स्वीचवर्डचा मनातल्या मनात जप करायचा असतो. कमीत कमी अठ्ठावीस आणि जास्तीत जास्त कितीही वेळा तुम्ही तो शब्द मनातल्या मनात बोलू शकता. त्या शब्दाचा मोठ्याने उच्चारु शकता. स्वीचवर्ड कागदावर वारंवार लिहल्यानेही फायदा होतो.

हातामध्ये पाण्याचा ग्लास घेऊन अंतःकरणपुर्वक त्या स्वीचवर्डचा उच्चार करुन ते पाणी पिऊन टाकले तर फक्त काही मिनिटात उर्जेच्या पातळीमध्ये बदल झाल्याचा अनुभव येतो.

स्वीचवर्डचा वापर केल्यास समस्यांची तीव्रता कमी होते. हळूहळू मुड बदलतो. निराशा आणि तणाव बाजूला सारुन आतमध्ये उर्जेचा झरा प्रवाहित करण्यासाठी स्वीचवर्डसारखा दुसरा सोपा मार्ग नाही.

२०१५ साली मी स्वीचवर्डची किमया शिकलो. याचा वापर करण्याची मी सुरुवात केली. सुरुवातीला लवकर विश्वास बसला नाही. पण नंतर अनेक अवघड प्रसंगांमध्ये स्वीचवर्डची जादु अनुभवायला मिळाली. मी अनेकदा स्वीचवर्डचा उच्चार करण्याचे हे टेक्निक वापरतो.

या सवयीचा मला खुपच फायदा होतो. तुम्हीही स्वीचवर्ड वापरण्याचा सराव करुन पहा. नक्कीच चांगले परिणाम अनुभवायला मिळतील.

प्रत्येक परिस्थितीमध्ये वापरण्यासाठी काही विशिष्ट स्वीचवर्ड आता सर्वमान्य झाले आहेत.

त्यामध्ये रोज नव्यानव्या स्वीचवर्डची भर पडत असते. काही महत्वाच्या स्वीचवर्डसची यादी इथे देत आहे.

१) DIVINE

डिव्हाईन या शब्दाचा अर्थ आहे दैवी. ज्यांना कोणाला आपल्या आयुष्यात चमत्कार घडावेत असे वाटत असते त्यांनी डिव्हाईन हा स्वीचवर्ड वापरावा.

अशक्य वाटणाऱ्या गोष्टीसुद्धा दैवी शक्तीच्या आशिर्वादाच्या बळावर प्राप्त केल्या जाऊ शकतात.

हा एक शक्तिशाली स्वीचवर्ड आहे. डिव्हाईन या शब्दाचा जप केल्याने, उच्चार केल्याने मनातला कचरा निघून जातो. मनात एक पवित्रतेची भावना निर्माण होते.

२) FIND – COUNT – DIVINE –

आपल्या सर्वांनाच खुप पैसे हवे असतात पण पैसे मिळवण्याचे मार्ग सुचत नाहीत. अनेकदा आपले पैसे कोणाकडे ना कोणाकडे अडकून पडलेले असतात.

काही वेळा पैशाच्या कमतरतेमूळे मन बैचेन आणि चिंताक्रांत होते.

अशावेळी ‘फाईंड – काऊंट – डिव्हाईन’ हा स्वीचवर्ड मनातील भावनांना बदलून टाकण्यासाठी आणि संपत्तीला आपल्याकडे आकर्षित करुन घेण्यासाठी मोलाची भुमिका बजावतो.

३) Do –

ज्या लोकांना कामांमध्ये चालढकल करण्याची सवय आहे किंवा ज्यांच्या कामांमध्ये कसली ना कसली विघ्ने येतात त्यांनी ‘डु’ हा स्वीचवर्ड वापरावा. आळस आणि टंगळमंगळ करण्याच्या सवयीवर मात करण्यासाठी हा प्रभावी उपाय आहे. आत्ताच्या आत्ता हे काम कर किंवा हे काम व्हावे ही आज्ञा दिल्यानंतर काम तात्काळ पुर्ण होते, हा अनुभव चकित करणारा असतो.

४) REACH –

अनेक लोकांना सतत काही ना काही वस्तू विसरण्याची सवय असते. हरवलेल्या वस्तूंचा शोध घेण्यासाठी ‘रिच’ हा स्वीचवर्ड वापरतात.

कधी आपल्या हातून चावी हरवते, कधी महत्वाची कागदं कूठे ठेवली ते लक्षात येत नाही अशा वेळी चिंताग्रस्त न होता शांत मनाने ‘रीच’ या शब्दाचा अखंड उच्चार करावा. लवकरच ती हरवलेली वस्तू कोठे आहे याचे स्मरण होते.

५) GIVE –

जेव्हा तुम्ही एखादी बिजनेस डिल करत असता, तुमच्या ग्राहकाशी संवाद साधत असता, आपली वस्तू किंवा सेवा यांचे मार्केटींग करत असता आणि ग्राहकाने तुमच्याशी व्यवसाय करावा अशी तुमची तीव्र इच्छा असते तेव्हा मनातल्या मनातन ‘गिव्ह’ या शब्दाचा उच्चार करावा. तुम्ही ग्राहकाला सेवा देता आणि त्याबदल्यात ग्राहक तुम्हाला त्याचा योग्य मोबादला देतो. अशा प्रकारे ‘गिव्ह’ हा शब्द दोघांनाही लागू होतो. ‘द्या म्हणजे मिळेल’, याची प्रचिती देणारा हा स्वीचवर्ड आहे.

झोप येत नसेल मनात नको ते विचार रेंगाळत असतील तर OFF अशी कमांड द्यावी. आरोग्याच्या समस्या असतील तर REACH-HEALTHY-BE असा स्वीचवर्ड प्रभावी ठरतो. आणीबाणीच्या
परिस्थितीमध्ये WOLF-MAGIC-BEGIN-NOW अशी शब्दावली कामाला येते.

इतर कोणते शब्द तुम्हाला आठवले नाहीत तर GOLDEN SUNRISE हा शब्द वापरावा, याचा उच्चार केल्याक्षणी उगवत्या सुर्याचे प्रतिबिंब डोळ्यासमोर उभा राहते आणि सर्व नकारात्मक उर्जा नाहीशी होते.

आभार आणि शुभेच्छा!

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

1 thought on “संकल्प ते सिद्धी : शब्द जे तुमचे आयुष्य घडवतील”

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय