लॅक्टोज इंटॉलरन्स म्हणजे नक्की काय? त्याची कारणे, लक्षणे आणि उपाय

लॅक्टोज इंटॉलरन्स म्हणजे नक्की काय? काय असतात त्याची कारणे आणि लक्षणे? ह्या समस्येवर काय उपाय करता येणे शक्य आहे? जाणून घेऊया ह्या लेखात

लॅक्टोज इंटॉलरन्स ही एक पचना संबंधीची समस्या आहे. ज्या व्यक्तीला लॅक्टोज इंटॉलरन्स हा त्रास असतो, त्या व्यक्तीचे शरीर लॅक्टोज हे द्रव्य पचवू शकत नाही. लॅक्टोज ही एक प्रकारची साखर असते जी दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये तसेच इतर डेअरी उत्पादनांमध्ये उपलब्ध असते.

लॅक्टोज इनटॉलरन्स असणाऱ्या व्यक्तींना ज्या पदार्थांमध्ये लॅक्टोज नावाचे द्रव्य असते असे पदार्थ खाल्ले की गॅसेस, पोट फुगणे, जुलाब होणे अशा प्रकारच्या पचनाशी संबंधीत समस्यांना सामोरे जावे लागते. दूध आणि दुग्धजन्य पदार्थ तसेच इतर डेअरी प्रोडक्ट यांचे सेवन केले असता अशा लोकांना पचनाच्या समस्या उद्भवतात.

लॅक्टोज इंटॉलरन्स का होतो?

आपल्या लहान आतड्यामध्ये लॅक्टोज या प्रकारच्या साखरेचे पचन करणारे द्रव्य असते. काही लोकांमध्ये ह्या द्रव्याची मात्रा कमी असते किंवा त्यांच्या लहान आतड्यामध्ये तितक्या प्रमाणात ते द्रव्य निर्माण होऊ शकत नाही.

त्यामुळे अशा लोकांमध्ये लॅक्टोज ह्या साखरेचे पचन योग्य प्रकारे होत नाही. शरीरात असणारी इतर पाचन द्रव्ये ह्या साखरेचे पचन करतात परंतु ते विशिष्ट द्रव्य नसल्यामुळे योग्य पचन न होऊन ही साखर पोटाचे, पचनाचे विकार निर्माण करते.

लॅक्टोज इंटॉलरन्सची लक्षणे

लॅक्टोज इंटॉलरन्सचे प्रमुख लक्षण अपचन हे आहे.

पोट फुगणे, पोट दुखणे, गॅसेस, जुलाब होणे, अतिसार होणे असा त्रास वारंवार होत असेल तर ते लॅक्टोज इनटॉलरन्सचे लक्षण असू शकते.

विशेषतः असा त्रास जर दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, डेअरी प्रोडक्टस ह्यांचे सेवन केल्यानंतर होत असेल तर ते निश्चितपणे लॅक्टोज इनटॉलरन्समुळे होऊ शकते.

अर्थात ज्यांच्या लहान आतड्यात लॅक्टोजचे पचन करणारे द्रव्य कमी असते अशा सर्वांना हा त्रास होईलच असे काही नाही. काही जणांना असे द्रव्य कमी असूनही दूध आणि दुधाचे पदार्थ पचवता येतात. तर काही जणांना द्रव्य योग्य प्रमाणात असूनही अपचन होऊ शकते. त्यामुळे ह्या त्रासाची लक्षणे तज्ञ डॉक्टरांना सांगून योग्य निदान करून घेणे आवश्यक असते. स्वतः कोणतेही निष्कर्ष काढून मनाने औषधे घेऊ नयेत.

लॅक्टोज इंटॉलरन्सवरचे उपाय

लॅक्टोज इनटॉलरन्सवर सध्यातरी थेट कोणताही उपाय उपलब्ध नाही. जे पदार्थ खाल्ल्यामुळे असा त्रास होतो त्या पदार्थांचे सेवन न करणे किंवा अगदी कमी प्रमाणात करणे हा उपाय काही अंशी फायदेशीर ठरू शकतो.

त्यासाठी दूध आणि दुधाचे पदार्थ, मिठाई, डेअरी उत्पादने ह्यांचे सेवन अगदी कमी प्रमाणात करावे.

त्याचप्रमाणे कॅल्शियम आणि विटामीन ‘डी’ च्या गोळ्या घेणे फायदेशीर ठरू शकते. विटामीन ‘डी’ मुळे दुधातील कॅल्शियम शरीरात शोषले जाऊन त्याचे व्यवस्थित पचन होते.

तसेच पचन सुधारणारे औषध किंवा गोळ्या देखील डॉक्टरांच्या सल्ल्याने घेता येतात. परंतु पथ्य पाळणे हा या समस्येवरील सर्वात प्रभावी उपाय आहे.

तर ही आहेत लॅक्टोज इंटॉलरन्स होण्याची कारणे आणि लक्षणे. ही माहिती जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोचवण्यासाठी हा लेख शेअर करायला विसरू नका.

Manachetalks

लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजांचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी./ The information is not a substitute for professional medical advice, diagnosis, ortreatment.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय