तुमचे बँक खाते बंद करताय? आधी ‘हे’ केले असल्याची खात्री करा

banking information in marathi

बँक खाते बंद करण्याआधी कोणत्या गोष्टी करणे गरजेचे आहे, ह्या बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

आपल्याजवळ असणाऱ्या पैशांची बचत व्हावी तसेच त्यावर काही व्याज मिळून त्या पैशात वाढ व्हावी यासाठी आपणा सर्वांचा बँकेमध्ये बचत खाते उघडण्याकडे कल असतो.

परंतु बचत खाते उघडून झाले की बरेचदा आपण त्याबाबत निष्क्रिय बनतो. किंवा सॅलरी अकाउंट असेल तर नोकरी सोडल्यानंतर ते डॉरमंट होण्याची शक्यता असते. शिवाय बरेचजण बँकेच्या नियमांची नीट माहिती करून घेत नाही आणि त्यामुळे काही वेळा नुकसान देखील सोसावे लागते.

आज आपण याबाबत अधिक माहिती जाणून घेणार आहोत.

बचत खात्याबाबत वेगवेगळ्या बँकांचे वेगवेगळे नियम असतात. या नियमा अंतर्गत बचत खात्यामध्ये योग्य ती रक्कम कायम जमा ठेवणे (मिनीमम बॅलन्स मेंटेन करणे) आणि वर्षभरात ठराविक वेळा ट्रांझॅक्शन करून खाते निष्क्रिय होऊ न देणे हे बचत खाते धारकासाठी कंपल्सरी असते.

परंतु या नियमांची नीट माहिती नसल्यामुळे अनेक बचत खातेधारक खात्यामध्ये योग्य ती मिनिमम बॅलन्स अमाऊंट ठेवत नाहीत.

तसेच बरेचदा खात्यामध्ये बराच काळ काहीही ट्रांझॅक्शन न झाल्यामुळे बचत खाते निष्क्रिय बनू शकते. असे झाल्यास बँक बचत खाते धारकाकडून मोठा दंड वसूल करते.

फायनान्स अँड कॉर्पोरेट अफेअर्सच्या राज्यमंत्र्यांच्या सांगण्यानुसार गेल्या तीन वर्षात देशभरात बचत खाते धारकांनी रु. ९७२१ करोड इतका दंड सरकारी आणि खासगी बँकांमध्ये मिळून भरला आहे.

हा दंड मिनिमम बॅलन्स मेंटेन न ठेवणे किंवा खाते निष्क्रिय बनवणे यासाठी केला गेला आहे तसेच हा दंड वसूल करणाऱ्या बँकांमध्ये १८ पब्लिक सेक्टर मधील बँका आणि ४ मोठ्या खासगी बँकांचा समावेश होतो. यावरून या विषयाचे गांभीर्य आपल्या लक्षात येते.

बरेचदा खातेधारकाला आपल्या बचत खात्यावर काही ट्रांझॅक्शन होत नाही किंवा सदर खात्याची आता गरज नाही असे लक्षात आल्यावर खाते बंद करायची इच्छा असते.

परंतु असे बचत खाते बंद करण्याआधी जर बँकेने त्या खात्यावर अशा प्रकारचा दंड आकारलेला असेल तर असे खाते बंद करता येत नाही. आधी दंडाचे संपूर्ण चार्जेस भरून मगच असे खाते बंद करता येते.

याचा अर्थ आपल्या खात्यावर काही रक्कम शिल्लक नाही किंवा खाते निष्क्रिय बनले आहे असे म्हणून खातेधारक खाते बंद करून दंडापासून सुटका मिळवू शकत नाही. त्यामुळे बँकिंग सेक्टर मधील एक्सपर्टस् नेहमी खात्यामध्ये मिनिमम बॅलन्स ठेवण्याचा सल्ला देतात.

याच बरोबर बँकेतील बचत खाते बंद करण्याबाबत आणखीही काही नियम आहेत. ते कोणते ते आता पाहूया.

१. जर तुम्ही तुमचे बचत खाते सुरू केल्यापासून एक वर्षाच्या आत बंद करत असाल तर खाते बंद करण्याबद्दल बँकेकडून काही रक्कम दंड म्हणून आकारली जाते.

मात्र खाते उघडल्यापासून चौदा दिवस पर्यंत खाते बंद करण्यासाठी कोणताही दंड आकारला जात नाही. त्यामुळे तुमच्याकडून जर चुकीने एखादे बचत खाते उघडले गेले असेल तर ते उघडल्यापासून १४ दिवसांच्या आत बंद करा.

त्यानंतर हे खाते चालू राहिल्यास मात्र त्यात मिनिमम बॅलन्स मेंटेन करा आणि खाते निष्क्रिय बनू देऊ नका. याव्यतिरिक्त सुरु केल्यापासून एक वर्षानंतर खाते बंद करायचे असेल तर कोणताही दंड आकारला जात नाही.

२. बँकांकडून फक्त मिनिमम बॅलन्स मेंटेन न करणे किंवा खाते निष्क्रिय बनणे यावरच दंड आकारला जात नाही तर त्या व्यतिरिक्त दिलेल्या प्रमाणापेक्षा जास्त वेळा एटीएम मधून पैसे काढणे, किती प्रमाणात कॅश ट्रांझॅक्शन केली जातात, किती प्रमाणात डिजिटल ट्रांझॅक्शन केली जातात यावर देखील चार्जेस आकारले जातात.

त्याचबरोबर बँकेकडून मिळणारी एसएमएस सर्व्हिस देखील चार्जेबल असते. त्यामुळे बँकांकडून मिळणाऱ्या या सुविधा कितीही सोयीच्या असल्या तरी बरेचदा कस्टमरच्या नकळत त्याला वेगवेगळ्या प्रकारचे बरेच चार्जेस भरावे लागतात.

आपले बचत खाते बंद करण्या आधी अशा प्रकारचे सर्व चार्जेस देखील भरलेले असणे आवश्यक असते. तोपर्यंत बचत खाते बंद करता येत नाही.

तर मित्र-मैत्रिणींनो अशाप्रकारे आपलेच बचत खाते बँकेतून आपल्याला बंद करायचे असेल तर त्या आधी या सर्व गोष्टींची आपल्याला खात्री करून घ्यावी लागते. त्यामुळे बँकेत बचत खाते उघडताना खात्याबद्दलची आणि बँकांच्या नियमांची संपूर्ण माहिती करून घ्या आणि मगच बचत खाते उघडा.

घाईघाईने कोणताही निर्णय घेऊ नका. वेळोवेळी बँकांकडून लावल्या जाणाऱ्या दंडाच्या रकमेची शहानिशा करून घ्या. तसेच त्या बाबतीत सजग राहा. वेगवेगळ्या बँकांच्या दंडाच्या रकमा वेगवेगळ्या असतात. त्यामुळे सर्वात कमी दंड / चार्जेस आकारणारी बँक निवडण्याचा आपल्याला पूर्ण हक्क असतो.

ही माहिती सर्व लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी हा लेख जास्तीत जास्त शेअर करा.

बँक ऍव्हरेज मंथली बॅलन्स, म्हणजेच महिन्याची सरासरी शिल्लक कशी ठरवते

बँकांमध्ये आपला पैसा असुरक्षित वाटतो? आपली ठेव सुरक्षित ठेवण्याचे अन्य मार्ग वाचा

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.