कमी वयात केस गळणे सुरु होण्याची आठ कारणे

कमी वयात केस गळणे सुरु होण्याची आठ कारणे

घनदाट लांबसडक केस असावेत असं प्रत्येकाला वाटत असतं.

पण या केसांची गळती सुरू झाली की मन हळहळतं.

खरं तर रोज थोडेसे केस गळणं हे नैसर्गिक आहे.

पण जर केस गळून तिथं पुन्हा नवे केस निर्माण झाले नाहीत तर समस्या सुरु होतात.

वेगवेगळ्या वयात वेगवेगळ्या कारणानं केस गळतात.

आपण वेगवेगळी तेलं आणि सौंदर्य प्रसाधनं वापरून ही केसगळती थांबवण्याचा प्रयत्न ही करत असतो.

अनुवंशिकता, गरोदरपण, व्यसन, दीर्घ आजारपण, त्वचारोग, कँन्सरसारखे आजार यामुळे केसगळती होऊ शकते.

अनुवंशिक किंवा कँन्सरसारख्या आजारात गळलेले केस वेळीच काळजी घेतली तर कालांतराने पुन्हा वाढू शकतात.

केसगळती नेमकी कशामुळे होते आहे हे समजून घेऊनच त्यावर उपचार करायला हवेत.

एकदा कारण लक्षात आलं की केस गळती थांबवण्यासाठी काही सोपे उपाय करता येतात.

केस गळण्याची कारणे

1) प्रोटीनची कमतरता

तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयींचा तुमच्या केसांच्या आरोग्याशी तसचं केसांच्या मुळाशी असणाऱ्या त्वचेच्या आरोग्याशी ही थेट संबंध असतो.

केशग्रंथी या केराटीन नावाच्या प्रथिनांपासून तयार होत असतात.

त्यामुळेच आहारातील प्रथिनांची कमतरता हे केस गळतीमधलं प्रमुख कारण ठरत़ं.

हे कारण वेळीच लक्षात घेऊन आहारात योग्य प्रथिनांचा आणि अमिनो अ‍ॅसिड असणाऱ्या पदार्थांचा समावेश केला तर ही केसगळती तुम्ही थांबवू शकता.

त्यासाठी तुमच्या आहारात अंडी, काजू, मासे, दुग्धजन्य पदार्थ आणि सोयाबीनचा समावेश आवर्जून करावा.

2) व्हिटॅमिन A ची कमतरता

केसांची वाढ चांगल्या पद्धतीने होण्यासाठी रेटीनॉइडसची आवश्यकता असते.

रेटीनॉइडसचा मुख्य स्त्रोत म्हणजे व्हिटॅमिन ‘ए’

व्हिटॅमिन ए युक्त पदार्थ तैलग्रंथी निर्माण करून केस वाढायला मदत करतात त्याचबरोबर केसांच्या मुळाशी असणा-या त्वचेचं आरोग्य उत्तम ठेवतात.

रताळी, पालक आणि ढोबळी मिरचीतून आपल्याला व्हिटॅमिन ‘ए’ मोठ्या प्रमाणात मिळतं

3) मल्टीविटामिन्स ची कमतरता

मल्टीविटामिन्सविषयी अनेक गैरसमज प्रचलित आहेत.

मात्र मल्टीविटामिन सेवन करणे पुर्णपणे सुरक्षित आहे.

जीवनसत्त्वे ए, बी, सी, डी, लोह, सेलेनियम आणि जस्त हे पोषण करणारे घटक आहेत.

ज्यामुळे केसांचे आरोग्य छान सुधारतं आणि केसांची घनता वाढते

हे सर्व घटक मल्टीविटामिनमध्ये भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात.

4) बायोटिनची कमतरता

चरबीयुक्त आम्ल म्हणजेच फॅटी ऍसिडवर होणारी रासायनिक प्रक्रिया ही केसांच्या चक्रात महत्त्वाची भूमिका बजावणारी ठरते.

बायोटिन किंवा बी7 हे फॅटी ऍसिडवर रासायनिक प्रक्रिया करण्याची गुरुकिल्ली आहे आणि त्याची जर कमतरता असेल केस गळती होऊ शकते.

तुमच्या डॉक्टरांचा किंवा त्वचारोगतज्ञांचा सल्ला घेऊन तुमची B7 पातळी तपासू शकता.

बायोटिनची कमतरता असल्याचं दिसून आलं तर ही, समस्या कमी होईपर्यंत तुम्हाला दररोज 3 ते 5 मिलीग्राम बायोटिनचा डोस घेण्याचा सल्ला ही दिला जातो.

5) केसांची स्वच्छता

केस स्वच्छ ठेवण्यासाठी दररोज धुतले पाहिजेत.

अनेक जण केस रोज धुण्याकडे साफ दुर्लक्ष करतात.

पण केस जर रोज धुतले नाहीत तर धूळ कोंडा केसांत साचून केस गळणे, पांढरे होणे, पातळ होणे, टाळूच्या त्वचेला संसर्ग होणे असे प्रकार घडतात.

हे प्रकार थांबवण्यासाठी केस नियमित स्वच्छ धुवायलाच हवेत.

पण लक्षात ठेवा उग्र शांपू टाळून नेहमीच सौम्य नैसर्गिक शाम्पूची निवड करावी.

शाम्पुचा वापरही दर तीन दिवसानंतर करावा. बाकी रोज साध्या पाण्यानंच केस धुवायला हवेत.

6) खोबरेल तेलाचा वापर न करणे

खोबरेल तेल हा केसांच्या आरोग्यासाठी उत्तम नैसर्गिक उपाय आहे.

खोबरेल तेलामुळे तुमच्या केसांचा अल्ट्राव्हायोलेट किरणांपासून बचाव होतो.

नारळाच्या तेलामध्ये लॉरिक ऍसिड असते ज्यामुळे केसांमध्ये प्रोटीन रूजण्याची महत्त्वाची भूमिका बजावली जाते.

केस तुटणे, पातळ होणे आणि करडे होणे यापासून सुद्धा खोबरेल तेलामुळे संरक्षण होते.

दोन दिवसांतून एकदा खोबरेल तेलाने केस आणि टाळूची ही मालिश करावी.

यामुळे टाळूमधला रक्त प्रवाह सुरळीत होतो आणि टाळूच्या त्वचेचं आरोग्य सुधारतं.

7) ऑलीव्ह ऑईल

ऑलीव्ह ऑईल हे केसांच्या आरोग्यासाठी उत्तम आहे.

ऑलीव्ह ऑईलमुळे केसांवर उत्तम संस्कार घडतात आणि केसांचा पोत सुधारतो.

ऑलीव्ह ऑईलने केलेली मालिश केसांचा रुक्षपणा कमी करून केस तुटणे आणि बाकीच्या समस्या दूर करते.

ऑलीव्ह ऑईल लावून हलक्या हाताने मालीश करावी. अर्धा तासाने केस स्वच्छ धुवावेत.

केसांवर ऑलीव्ह ऑईलचा वापर करण्याबरोबर स्वयंपाकातही आपण याचा वापर करू शकतो.

आहारात ऑलीव्ह ऑईलच्या वापरामुळे केसांच्या अनुवंशिक समस्या कमी होतात.

8) प्लेटलेट्स प्लाझमा थेरपी

नैसर्गिक उपाय आणि व्यायाम आणि योग्य आहारानंतर ही केसाचं आरोग्य सुधारलं नाही, केस गळती सुरुच राहिली तर तुम्ही प्लेटलेट युक्त प्लाझ्मा थेरपीचा पर्याय निवडू शकता.

एखाद्या विशिष्ट भागात केसांच्या वाढीला चालना देण्यासाठी टाळूमध्ये प्लेटलेट प्लाझ्मा दिला जातो.

टाळूवर जिथं टक्कल पडलेलं असतं त्या पॅचवर उपचार करण्यासाठी प्लेटलेट रक्तापासून वेगळे केले जातात आणि टाळूमध्ये इंजेक्शनद्वारे दिले जातं.

टक्कल पडायला सुरवात झाल्या झाल्या ही थेरपी अत्यंत उपयुक्त ठरू शकते.

साधारण 5,000 ते 10,000 रुपये एका सेशनला अशी या थेरपीची किंमत असते.

केसांचं आरोग्य राखणं हा सर्वांसाठी कळीचा मुद्दा असतो.

स्वच्छ निरोगी केस सर्वांचच मन मोहून टाकतात.

त्यामुळे केसांची काळजी वेळीच घेणं महत्त्वाचं ठरतं.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.