दैनंदिन वेळापत्रक गरजेचं का आहे आणि ते तंतोतंत पाळण्याची सवय लावण्याचे तंत्र!

निसर्गाने प्रत्येकाला अगदी एकसारखा वेळ दिलेला आहे.

प्रत्येकाला दिवसाचे चोवीस तासच मिळालेले असतात.

पण या चोवीस तासात कुणी कामाचे डोंगर उपसूनसुद्धा स्वतःसाठी वेळ काढू शकतात.

तर काही जणांना थोडीशी कामं करायलासुद्धा हे चोवीस तास ही अपुरे पडतात.

असं का होत असेल ?

जी व्यक्ती आपल्याला मिळालेल्या वेळेचा पुरेपूर उपयोग करते तीच व्यक्ती यशस्वी ठरते.

वेळेचे महत्व

आपल्या वेळेचा चांगल्या पद्धतीने उपयोग करून घेण्यासाठी रोजचं एक वेळापत्रक तयार करणं आणि ते काटेकोरपणे फॉलो करणं महत्त्वाचं असतं.

या दैनंदिन वेळापत्रकाचे काय फायदे असतात तेच आज जाणून घेऊया.

पुर्वीच्या काळी पहाटे लवकर उठणे, घरकाम, शाळा, किंवा बाहेरची कामं यांची एक वेळ ठरलेली असायची.

त्या त्या वेळेत ती ती कामं सहज होऊन जायची.

सध्याच्या काळात आपण बघतोय की कामाची घडी बसवणं, एका शिस्तीत काम करणं किंवा वेळापत्रक तयार करणं अवघड होतयं.

जर आपल्याकडे आजच्या दिवसाचं, येत्या आठवड्याचं, महिन्याचं नियोजन, वेळापत्रक तयार नसेल तर आयुष्य दिशाहीन होऊन जाईल.

रिटायर्ड झालेल्या माणसांसमोर एक मोठा प्रश्न ‘आ’ वासून उभा राहिलेला असतो.

या दिवसभराच्या वेळेचं करायचं काय ?

डिप्रेशन, चिंता, ताण यांचा आपल्या आयुष्यात प्रवेश होतो तोच मुळी आयुष्याला वळण शिस्त किंवा वेळापत्रक नसल्यामुळे.

म्हणूनच वेळापत्रक, शिस्त महत्त्वाची ठरते.

एखादया सुदृढ वयस्कर व्यक्तीच्या उत्साहाचं जीवन भरभरून जगण्याचं आणि उत्तम आरोग्याचं रहस्य ही नियोजनबद्ध जीवनशैली असते.

आपल्या आजुबाजुला अशा अनेक व्यक्ती असतात ज्या न कंटाळता दिवसभराचं एक रूटीन फॉलो करत असतात.

आजच्या न्यूक्लिअर फँमिलीमध्ये आपल्याला कुणी रागावणारं नसतं, किंवा वेळापत्रक बिघडलय याची जाणीव करुन देणारं नसतं.

मुक्त जगण्याचा आपण आनंद घेत असतो.

अशावेळी काटेकोर शिस्तीचं वेळापत्रक त्रासदायक ठरेल असं आपल्याला वाटतं.

पण जर हे वेळापत्रक आयुष्याला आकार देऊ शकत असेल तर याच्या फायद्यांविषयी समजून घ्यायला तुम्हांला नक्कीच आवडेल.

कुठलाही बदल क्षणात होत नाही.

मात्र 21 दिवसाचं लक्ष्य ठेवून तुम्ही बदल करायला सुरवात केलीत तर या बदलांचं रुपांतर सवयीत होईल.

अशा सवयी ज्या जीवनभर तुम्हांला साथ देतील.

21 दिवसांनंतर तुम्ही यापूर्वी कधीही न अनुभवलेल्या मनःशांतीचा अनुभव घेऊ शकाल.

कारण एक नियमित वेळापत्रक आपल्याला अधिक कार्यक्षम बनवते.

रोज उठल्यानंतर आज काय काय कामं करायची याचा विचार करून वेळ आणि उर्जा वाया घालवण्यापेक्षा तयार वेळापत्रकामुळे लगेच कामाला लागता येत़.वेळ वाचतो.आत्मविश्वास वाढतो.

एखादं किचकट कामही केंव्हा सुरू करायच़ं ते केंव्हा संपवायचं याचं समीकरण डोक्यात असल्यामुळे ताण येतच नाही.

व्यवस्थित आखलेली जीवनशैली आपल्या जीवनाला सुनिश्चित, सुंदर आकार देते.

रोजच्या आयुष्याचं ठरलेलं वेळापत्रक आपल्याला कुठल्या प्रॉब्लेममध्ये बांधून न ठेवता प्रवाही बनवतं.

या वेळापत्रकामुळे आयुष्य आरामदायी होतं.

नातेसंबंधात पुरेशी स्पेस आणि पुरेसा वेळ देता आल्यामुळं आपुलकी ही निर्माण होते

आपण निश्चित केलेल्या ध्येयाजवळ आपण वेगाने पोहोचू शकतो.

दिवसभराच्या ठराविक रुटीननंतर ही संध्याकाळी पुरेशी उर्जा आणि उत्साह तुमच्यामध्ये टिकू शकतो.

याचं कारण कोणतीही कामं साचलेली नसतात. ती कामं कधी होणार हे आपल्याला पक्कं माहिती असतं.

साहजिकच ताणतणाव तुमच्या आसपासही फिरकणार नाही.

अतिशय गतिमान आयुष्यात तुम्ही तयार केलेल्या वेळापत्रकामुळे कामाच्या डेडलाईन अतिशय सहजपणे आनंदाने पुर्ण करू शकता.

पुरेसा वेळ नेहमीच तुमच्याजवळ असेल. स्वतःसाठी तुमच्याकडे वेळ असेल.

या कठोर वेळापत्रकाची फक्त 21 दिवस तुम्हांला प्रँक्टिस करायची आहे.

कारण या 21 दिवसात हे वेळापत्रक तुमच्या अंगवळणी पडेल.

छोट्या मोठ्या ध्येयापर्यंत तुम्हांला सहज घेऊन जाणारं हे वेळापत्रक आयुष्यात तुम्हांला “यशस्वी व्यक्तीमत्व” अशी ओळख मिळवून देऊ शकतं.

चला तर मग दोस्तांनो, कागद पेन घ्या किंवा मोबाईलची मदत घ्या आणि रोजच्या आयुष्याचं वेळापत्रक आधी कागदावर तयार करा मग डोक्यात पक्कं बसवा.

आता तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या चांगल्या गोष्टींचं हात पसरून स्वागत करायला सज्ज व्हा.

वेळेच्या नियोजनाबद्दल महत्त्वाच्या सात टिप्स

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय